---Advertisement---

वर्डप्रेस शिकण्यासाठी १० सर्वोत्तम ऑनलाईन स्रोत

Updated On:
learn-wordpress-online
---Advertisement---

ब्लॉगिंग करण्यासाठी केवळ ब्लॉग लिहता येऊन उपयोग होत नसतो. यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म विषयी कामापूर्ती का असेना माहिती असावी लागते. कारण बऱ्याचदा आपल्याला ब्लॉगवर काही बदल करावयाचे असतात आणि त्यासाठी आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते.

वर्डप्रेस शिकणे तसे फार सोपे आहे त्याचमुळे वर्डप्रेस इतके झपाट्याने लोकप्रिय होत आहे. मी स्वतः कोणताही कोर्स न करता ऑनलाईन वर्डप्रेस शिकलो आहे. आज आपण असे १० ऑनलाईन स्रोत पाहणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही घर बसल्या मोफत वर्डप्रेस शिकू शकता.

१. WPBeginner

मला सर्वप्रथम WPBeginner वरून वर्डप्रेस शिकायला मिळाले. यावर अतिशय सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे. WPBeginner हे नवीन तसेच प्रगत (Advance) अशा सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी उपयोगी आहे.

WPBeginner वर वर्डप्रेस ब्लॉग कसा तयार करावा? पासून वर्डप्रेसवर नेहमी सामना कराव्या लागणाऱ्या एररपर्यन्त अनेक विषयांवर ब्लॉग्स व्हिडीओसह उपलब्ध आहेत. तुम्ही येथे क्लिक करून WPBeginner च्या युट्युब चॅनेलला भेट देऊ शकता.

२. WordPress Codex

WordPress Codex हे वर्डप्रेसचे अधिकृत मोफत माहिती भांडार (Repository) आहे. येथे तुम्हाला वर्डप्रेस विषयी सर्व काही वाचायला मिळेल. हे एकप्रकारे वर्डप्रेसचे मॅन्युअल आहे. यात तुम्हाला वर्डप्रेसविषयी सध्यासोप्या गोष्टींपासून डेव्हलपमेंट पर्यंत सर्व काही जाणून घ्यायला मिळेल.

WordPress Codex वर वर्डप्रेस कसे वापरावे यापासून वर्डप्रेस थीम्स, प्लगिन्स आणि डेव्हलपमेंट अशा अनेक गोष्टींबद्दल वाचायला मिळेल. याद्वारे तुम्ही सहजपणे वर्डप्रेस शिकू शकता.

३. WordPress.tv

वर्डप्रेस समुदायातर्फे (Community) तर्फे जगभरात वर्डकॅम्प घेतले जातात. या वर्डकॅम्पमधील विविध सत्रांचे व्हिडीओ WordPress.tv वर तुम्ही घरबसल्या पाहू शकता.

तुम्ही स्वतः वर्डप्रेस तज्ञ असाल तर तुमचे व्हिडीओ देखील अपलोड करू शकता. WordPress.tv पूर्णपणे मोफत असून यासाठी तुम्हाला अकाउंट उघडण्याची देखील गरज नाही. फक्त WordPress.tv ला भेट द्या आणि सर्व व्हिडीओ मोफत पहा.

४. Udemy

Udemy वरून मी स्वतः अनेक अभ्यासक्रम (Courses) विकत घेतले आहेत. येथे वर्डप्रेस विषयी हजारो मोफत व विकत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सर्व विषयांचे मिळून १ लाखांपेक्षा जास्त कोर्सेस युडेमीवर उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे तुम्ही अभ्यासक्रम घेतल्यावर तुम्ही त्याला कधीही कुठून हि पाहू शकता. भविष्यात त्या कोर्समध्ये काही अपडेट्स असतील तर ते देखील तुम्हाला मोफत मिळतात. यात तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही त्या कोर्सच्या फोरममध्ये प्रश्न विचारू शकता.

अनेकदा येथे विशेष ऑफर असल्यास ७०० रुपयांमध्ये देखील कोर्सेस उपलब्ध असतात.

५. WP101

WP101 हि एक वर्डप्रेला समर्पित (Dedicated) तसेच पूर्णपणे विकत असणारी व्हिडीओ सेवा आहे. यात तुम्ही वर्डप्रेसविषयी सर्व काही शिकू शकता. २ तासात वर्डप्रेस विषयी मूलभूत माहिती देण्याचा दावा यांच्यातर्फे करण्यात येतो.

बऱ्याचदा युट्युबवर असणारे अनेक व्हिडीओ कालबाह्य (Outdated) झालेले असतात. WP101 वर हि समस्या तुम्हाला येत नाही. येथील सर्व व्हिडीओ हे अद्ययावत वर्डप्रेसशी सुसंगत असतात. $19 पासून यांचे अभ्यासक्रम सुरु होतात.

६. LinkedIn Learning (Lynda)

Lynda आता LinkedIn Learning म्हणून ओळखले जाते. येथे तुम्ही वेब डेव्हलपमेंटपासून फोटोग्राफी पर्यंत खूप काही शिकू शकता. येते वर्डप्रेस संबंधित ५० पेक्षा अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

LinkedIn Learning वर तुम्हाला सुरवातीला १ महिना मोफत मिळतो. यानंतर तुम्हाला १,४०० रुपये महिन्याला द्यावे लागतात.

७. Smashing Magazine

वेब डिझायनिंग, कोडींग, ग्राफिक्स डिझायनिंग यासारख्या विषयांवरील लेख तुम्ही Smashing Magazine वर वाचू शकता. यांच्या वर्डप्रेस कॅटेगरीमध्ये तुम्ही वर्डप्रेसविषयी वाचू शकता.

Smashing Magazine चे ब्लॉग मोफत असले तरी त्यांचे मेम्बरशिप प्लॅन्स देखील आहेत. यात तुम्हाला त्यांचे इव्हेंट्सचे तिकिट्स, Smashing TV, ई-बुक्स यासारख्या अनेक सुविधांचा लाभ मिळू शकतो.

८. WPMU DEV Blog

WPMU DEV हि एक आघाडीची वर्डप्रेस एजन्सी आहे. यांचे WP Smush हे प्लगिन प्रसिद्ध आहे. यांच्या ब्लॉगवर वर्डप्रेसविषयी सविस्तर अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध करतात. WPMU DEV वर तुम्हाला वर्डप्रेस प्लगिन, थीम्स, मार्केटिंग यासह अनेक विषयांवरील लेख वाचता येईल.

याचे ब्लॉग मोफत असले तरी यांचा एक विकत प्लॅन देखील आहे. पहिला महिना मोफत वापरल्यानंतर तुम्हाला $49 रुपये महिन्याचे द्यावे लागतील. ज्यात तुम्हाला त्यांचे व्हिडीओ पाहता येईल तसेच त्यांचे सर्व प्लगिन्स मोफत वापरता येईल.

९. WordPress.com Learn

जर तुमचा ब्लॉग WordPress.com वर असेल तर इथं तुम्ही त्याविषयी शिकू शकता. हि WordPress.com ची अधिकृत वेबसाईट आहे जेथे तुम्हाला वर्डप्रेस विषयी प्राथमिक माहिती शिकता येईल.

येथे तुम्हाला खूप ऍडव्हान्स शिकायला मिळणार नसलं तरी ऍडव्हान्स शिकण्यासाठी जे आधी बेसिक लागत ते नक्कीच शिकायला मिळेल.

१०. Online Tushar 😉

माझं वर्डप्रेसवर फार प्रेम आहे. वर्डप्रेसने खूप काही दिलंय. २०१२-१३ पासून वर्डप्रेसच्या मदतीने डिजिटल मीडियामध्ये काम करतोय. मराठीत वर्डप्रेस विषयी काही सर्च केल्यावर काहीच दिसत नव्हतं. त्याचमुळे वर्डप्रेसविषयी पूर्णपणे मराठीतून माहिती देण्यासाठी मी हा ब्लॉग सुरु केला आहे.

माझ्या या ब्लॉगवर तुम्हाला वर्डप्रेससोबतच डिजिटल मार्केटिंग, ब्लॉगिंग यासारख्या विषयांवर वाचायला मिळेल. तुम्ही मला फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.

वरील सर्व स्रोत माझे स्वतःचे आवडते आहेत. याव्यतिरिक्त वर्डप्रेस ऑनलाईन शिकण्यासाठी तुम्हाला आवडणारी कोणती वेबसाईट अथवा ऑनलाईन सेवा असल्यास कमेंट करून नक्की कळवा. ब्लॉग उपयोगी वाटल्यास मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेयर करा. धन्यवाद!

तुषार भांबरे

Follow Us On

---Advertisement---

Leave a Comment