Wednesday, December 16, 2020
Online Tushar
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
Online Tushar
No Result
View All Result

वेब होस्टिंग म्हणजे काय?

Tushar Bhambare by Tushar Bhambare
14 April 2019
in वर्डप्रेस
Reading Time: 3min read
A A
5
वेब होस्टिंग म्हणजे काय? । मराठी टेक ब्लॉग
94
SHARES
579
VIEWS
व्हाटसॲपवर शेअर कराफेसबुकवर शेअर कराट्विटरवर शेअर करा
ADVERTISEMENT

डोमेन नेम / वेब होस्टिंग म्हणजे काय? अनेकांना हा प्रश्न पडत असतो. ब्लॉग अथवा वेबसाईट तयार करत असतांना सर्वात बेसिक गोष्ट म्हणजे डोमेन आणि होस्टिंगची गरज पडत असते. बऱ्याचदा होस्टिंग आणि त्याच्या प्रकाराविषयी माहिती नसल्यांने काहींची फसगत होते. आजच्या लेखात सोप्या भाषेत आपण होस्टिंग म्हणजे नेमकं काय असतं? होस्टिंग कशी काम करते? त्याचे प्रकार कोणते? याविषयी जाणून घेऊ.

आपल्या ब्लॉगच्या वाचकांसाठी होस्टगेटोरतर्फे विशेष ५०% सवलत आहे. विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.

अनुक्रमणिका

  • वेब होस्टिंग म्हणजे काय?
  • वेब होस्टिंगचे प्रकार कोणते?
    • होस्टिंगचे प्रामुख्याने ३ प्रकार पडतात.
  • लिनक्स किंवा विंडोज होस्टिंग म्हणजे काय?

वेब होस्टिंग म्हणजे काय?

या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. आपल्याला घर बांधायचे असेल तर नेमकी कशाची गरज पडते?

१. आपल्याला कोणतं लोकेशन योग्य आहे आपण ते ठरवतो.
२. हव्या असणाऱ्या लोकेशनवर जागा ठरवतो.
३. त्याची योग्य ती किंमत देऊन जागा विकत घेतो.
४. यानंतर त्या जागेवर घर बांधतो.

वेबसाईटच देखील असंच असतं. आपल्याला हवं असणार लोकेशन (पत्ता) म्हणजे डोमेन नेम. जागा म्हणजे होस्टिंग ज्यावर आपलं घर उभं असतं. आणि घर म्हणजेच होस्टिंग. आता आपल्याला तितकं मोठं घर हवं तितकी मोठी जागा देखील हवी. याचप्रमाणे जितकी मोठी वेबसाईट तितकी मोठी होस्टिंग त्यासाठी आवश्यक असते. आपल्या वेबसाईटवरील सर्व कोड, फोटो, लेख हे होस्टींगवर सेव्ह होत असतात.

वर्डप्रेस विषयी मराठीतून सर्व काही जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

ADVERTISEMENT

वेब होस्टिंगचे प्रकार कोणते?

होस्टिंगचे प्रामुख्याने ३ प्रकार पडतात.

१. शेअर्ड होस्टिंग
२. व्हीपीएस होस्टिंग
३. डेडीकेटेड होस्टिंग

वेब होस्टिंगचे प्रकार समजून घेण्यासाठी अजून एक सोपं उदाहरण पाहता येईल.

१. शेअर्ड होस्टिंग म्हणजे एक कुटुंब समजा. अशा वेळी तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी सर्व जण मिळून घेतात. यामुळे येणारा खर्च विभागला गेल्यामुळे प्रत्येकाच्या वाटेला कमी येतो. याच्या नावातच शेअर्ड आहे. चांगली शेअर्ड होस्टिंग घेण्यासाठी येथे क्लिक करा.

२. व्हीपीएस होस्टिंग म्हणजे एक अपार्टमेंट समजून घेता येईल. यात जागा अधिक मिळते परंतु यासाठी थोडी जास्त किंमत मोजावी लागते. विश्वसार्ह व्हपीएस सर्व्हर घेण्यासाठी येथे क्लिक करा.

३. डेडीकेटेड होस्टिंग म्हणजे एक कॉलनी. यात खूप जास्त स्पेस असला तरी सर्व सुरळीत चालावं यासाठी जास्त मेहनत लागते. यामुळे यासाठी येणारा खर्च देखील अधिक असतो. मॅनेज्ड डेडीकेड सर्व्हर घेण्यासाठी येथे क्लिक करा.

लिनक्स किंवा विंडोज होस्टिंग म्हणजे काय?

लिनक्स आणि विंडोज हे ऑपरेटिंग स्टिस्टीमचे प्रकार आहेत. दोघांच काम जवळपास सारखंच असतं. किमतीचा विचार केला असता लिनक्स होस्टिंग विंडोज होस्टिंगपेक्षा स्वस्त असते. पूर्वी लिनक्स होस्टिंग मॅनेज करणं थोडं किचकट टेक्निकल होत. परंतु आता ओपन सोर्स टूल्सच्या मदतीने जास्तीत जास्त काम वन क्लिक शक्य झालं आहे.

मला वाटत आता तुम्हाला होस्टिंग म्हणजे नेमकं काय हे कळालं असेलच. यानंतर हि होस्टिंग विषयी काही शंका असल्यास खाली कमेंट करा. ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद!

तुषार भांबरे
Tags: BlogDedicated HostingHostingShared HostingVPS HostingWeb HostingWebisteवेब होस्टिंग
SendShare73Tweet9
ADVERTISEMENT
Previous Post

जीमेलवरून चुकून पाठवलेला मेल अन्सेंड कसा करावा?

Next Post

वापरायला हवेच असे १० वर्डप्रेस प्लगिन्स

Tushar Bhambare

Tushar Bhambare

६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.

Related Posts

digital-ocean-wordpress-marathi
वर्डप्रेस

DigitalOcean VPS वापरून ५ मिनिटात तयार करा वर्डप्रेस वेबसाईट

22 June 2020
515
hostinger-wordpress-hosting-review-marathi
वर्डप्रेस

स्वस्त आणि मस्त वर्डप्रेस होस्टिंग : होस्टिंगर

21 June 2020
258
how-to-install-wordpress-on-Namecheap-EasyWP-hosting
वर्डप्रेस

Namecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे?

15 September 2019
298
Next Post
top-10-useful-wordpress-plugins-list-in-marathi

वापरायला हवेच असे १० वर्डप्रेस प्लगिन्स

Comments 5

  1. devgandate.wordpress.com says:
    2 years ago

    मी गेल्या 8 वर्षापासून वर्डप्रैस आणि blogger मध्ये वर्क करतोय. वर्डप्रेस मधे काही वेबसाईट devlop केल्या. आपल्या मराठी माहितीमुळे अभ्यासात भर पडली. धन्यवाद

    Reply
    • तुषार महेश भांबरे says:
      2 years ago

      धन्यवाद…!

      Reply
  2. Rajendra says:
    2 years ago

    Dhanyawad apan maràthimadye sapurn mahiti dilyabaddal ,tumhi dilelya mahitimule nakkich anakhi khup kahi navin Marathi bhashetun shikayala miltil .
    Krupaya ek video ha Google AdWords baddal Marathi madhe sanga ki.

    Reply
    • तुषार महेश भांबरे says:
      2 years ago

      धन्यवाद राजेंद्रजी… व्हिडीओबद्दल नक्कीच लवकरच काही तरी करतो.

      Reply
  3. Pingback: ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग स्थलांतरित (Migrate) कसा करायचा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माझ्याविषयी

Online Tushar

तुषार महेश भांबरे

पत्रकार, ब्लॉगर

नमस्कार,
मी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.




How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

  • chat-on-whatsapp-without-saving-number

    नंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा?

    195 shares
    Share 152 Tweet 18
  • आपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची?

    165 shares
    Share 125 Tweet 17
  • वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा?

    113 shares
    Share 73 Tweet 17
  • प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स

    198 shares
    Share 163 Tweet 15
  • गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे?

    171 shares
    Share 137 Tweet 14

© 2019. Made with ❤️ using WordPress

No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल

© 2019. Made with ❤️ using WordPress