Wednesday, December 16, 2020
Online Tushar
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
Online Tushar
No Result
View All Result

DigitalOcean VPS वापरून ५ मिनिटात तयार करा वर्डप्रेस वेबसाईट

Tushar Bhambare by Tushar Bhambare
22 June 2020
in वर्डप्रेस
Reading Time: 10min read
A A
1
digital-ocean-wordpress-marathi
117
SHARES
515
VIEWS
व्हाटसॲपवर शेअर कराफेसबुकवर शेअर कराट्विटरवर शेअर करा
ADVERTISEMENT

नमस्कार मित्रांनो,

मी स्वतः गेल्या अनेक वर्षांपासून DigitalOcean चे VPS वापरात आहे. माझ्या मते मार्केटमधील इतर होस्टिंग कंपनींपेक्षा DigitalOcean स्वस्त आणि अधिक विश्वासार्ह आहे. परंतु यासोबत cPanel येत नसल्यामुळे अनेक ज्यांना DigitalOcean वापरतांना अडचण येत होती. आज आपण फक्त ५ मिनिटात DigitalOcean VPS वर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे हे जाऊन घेऊ.

अनुक्रमणिका

  • DigitalOcean च का?
    • स्वस्त आणि मस्त
    • मदत आणि समुदाय (Support and Community)
    • विश्वासार्ह्यता
  • DigitalOcean वर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे?
    • Droplet तयार करणे
    • डोमेन जोडणे
    • डोमेनचे DNS अपडेट करणे
    • वर्डप्रेस इन्स्टॉल करणे

DigitalOcean च का?

२०११ मध्ये सुरु झालेल्या या कंपनीचे आता लाखो ग्राहक असून सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या क्लाउड सर्व्हरपैकी DigitalOcean ही एक कंपनी आहे.

DigitalOcean delivered the best CPU performance per dollar

मी गेल्या ४-५ वर्षांपासून माझ्या अनेक वेबसाइटसाठी डिजिटल ओशनचे व्हपीएस वापरत आहे. सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या इतर VPS पेक्षा हे फार स्वस्त असूनही यांचे सर्व्हर अतिशय जलद आहेत. फक्त यासोबत cPanel येत नसल्याने याला वापरणे थोडे किचकट ठरते.

स्वस्त आणि मस्त

DigitalOcean प्लॅन्स

डिजिटल ओशनचे प्लॅन्स फार स्वस्त आहेत. ५ डॉलर म्हणजे साधारण ३०० रुपयांपासून त्यांचे प्लॅन्स सुरु होतात. सर्वात स्वस्त ५ डॉलरच्या प्लॅनमध्ये तुम्हाला १ कोर CPU, १ टीबी ट्रान्स्फर, २५ जीबी SSD स्टोरेज मिळत. SSD तुमच्या नेहमीच्या हार्ड डिस्कपेक्षा १० पट फास्ट असते. या प्लॅनवर तुम्ही एक सर्वसाधारण वर्डप्रेस वेबसाईट अगदी सहजरित्या चालवू शकता.

येथे क्लिक करून तुम्ही DigitalOcean वर केवळ ५ डॉलर प्रति महिन्याने तुमची वर्डप्रेस वेबसाईट सुरु करू शकता.

मदत आणि समुदाय (Support and Community)

जर DigitalOcean तुमच्यासाठी नवीन असेल तर घाबरण्याचे कारण नाही. कारण DigitalOcean वर सर्व गोष्टींसाठी अतिशय सविस्तर डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही त्यांच्या Community मध्ये त्याबाबत प्रश्न विचारू शकता.

Digital Ocean Community

विश्वासार्ह्यता

गेल्या अनेक वर्षांत डिजिटल ओशनने आपली विश्वासार्ह्यता जपली आहे. वाजवी किंमत आणि उत्कृष्ट सेवा यामुळे अनेक प्रसिद्ध वेबसाईट्स डिजिटल ओशनच्या विविध सेवा वापरतात.

DigitalOcean Customer Review

DigitalOcean वर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे?

DigitalOcean वर वर्डप्रेस इन्स्टॉल करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तिथे अकाऊंड उघडावे लागेल. खालील बटनावर क्लिक करून तुम्ही अकाउंट उघडल्यास तुम्हाला सुरवातीला १०० डॉलरच मोफत क्रेडिट मिळेल. त्याच्या मदतीने तुम्ही एक महिना मोफत होस्टिंग वापरू शकता.

Click here for DigitalOcean FREE 100$ Credit

Droplet तयार करणे

वर्डप्रेस इन्स्टॉल करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Droplet तयार करावे लागेल. यासाठी तुम्ही DigitalOcean वर अकाउंट घडल्यानंतर Droplet तयार करावं लागेल.

Create DigitalOcean Droplet

Droplet तयार करण्यासाठी वर उजव्या बाजूला असणाऱ्या Create वर क्लिक करून त्यात Droplets का पर्याय निवडा.

Create WordPress Droplet on DigitalOcean

आता यात अनेक पर्याय दिसतील. यातून आपल्याला Marketplace मधून वर्डप्रेस निवडायचं आहे. यात तुम्हाला Apache, MySQL, PHP हे सर्व आपोआप इन्स्टॉल करून मिळते. यात नावाप्रमाणेच सर्व १ क्लिक आहे.

पुढील स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या Droplet साठी प्लॅन निवडायचा आहे. यात तुम्ही कमीतकमी ५ डॉलरपासून सुरुवात करू शकता. हे क्लाउड सर्व्हर असल्याने तुम्हाला जशी गरज असेल तसे तुम्ही प्लॅन कमी जास्त करू शकता.

Choose DigitalOcean Droplet Plan

यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व्हरचे स्थान म्हणजेच लोकेशन निवडायचे आहे. जर तुमचे वाचक जास्त करून भारतातून असतील तर बंगळुरू हे स्थान तुम्ही निवडू शकता. SEO आणि साईट स्पीड या गोष्टींसाठी सर्व्हर लोकेशन एक महत्त्वाचा घटक आहे.

Choose a datacenter region

Select additional options आणि Authentication यात तुम्हाला अधिक माहिती असल्यास हे पर्याय निवडावे अथवा सोडून द्यावेत. जर तुम्हाला तुमचा Droplet SSH Key वापरून वापरता येणार असल्यास तुमची SSH Key येथे निवडावी अथवा तुम्ही तुम्हाला हवा असणारा पासवर्ड तयार करू शकता.

तुम्हाला तुमच्या Droplet ला काही ठराविक नाव द्यायचे असल्यास अथवा तुमच्या अकाउंटवर एकापेक्षा अधिक Droplet असल्यास तुम्ही त्यांना टॅग अथवा प्रोजेक्ट याद्वारे त्यांचे वर्गीकरण करू शकता.

ADVERTISEMENT
Droplet Name, Tag, Project

जर तुम्हाला बॅकअप सुविधा हवी असेल तर तुम्ही बॅकअप पर्याय निवडू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या Droplet च्या किमतीच्या २०% पैसे दयावे लागतील. म्हणजे ५ डॉलरच्या Droplet साठी १ डॉलर जास्तीचे लागतील. हे सर्व झाल्यावर तुम्हाला Create Droplet या बटनावर क्लिक करायचे आहे. अशा रीतीने तुमचा ड्रॉपलेट तयार होईल.

डोमेन जोडणे

Add Domain to DigitalOcean

ड्रॉपलेट तयार झाल्यावर तुम्हाला ज्या डोमेनवर वर्डप्रेस इन्स्टॉल करायचे आहे ते तुम्हाला तुमच्या डिजिटल ओशन अकाउंटमध्ये जोडावे लागेल. डोमेन नेम तुमच्या डिजिटल ओशन अकाउंटला जोडण्याकरिता उजव्या बाजूला वर असणाऱ्या Create बटनावर क्लिक करून त्यात Domains/DNS हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर यात तुमचे डोमेन जोडा. डोमेनच्या A रेकॉर्डमध्ये तुमच्या ड्रॉपलेटचा IP ऍड्रेस जोडा.

DNS Records

डोमेनचे DNS अपडेट करणे

डोमेन नेम जोडल्यावर त्याचे DNS रेकॉर्ड्स अपडेट करावे लागतील. यासाठी तुम्ही जेथून डोमेन विकत घेणे आहे त्या पॅनलला लॉगिन करा. यानंतर तुमच्या डोमेनचे Nameserver बदलून तिथं DigitalOcean चे खालील नेमसर्व्हर अपडेट करा.

ns1.digitalocean.com
ns2.digitalocean.com
ns3.digitalocean.com

जर तुम्हाला Nameserver बदलायचे नसतील तर तुम्हाला तुमच्या नवीन ड्रॉपलेटच्या आयपी ऍड्रेसचा A रेकॉर्ड तयार करावा लागेल.

साधारण DNS रेकॉर्ड अपडेट होण्यासाठी ४८ तासांपर्यंतचा वेळ लागू शकतो. रेकॉर्ड अपडेट झालेत अथवा नाही हे तुम्ही WhatsMyDNS या वेबसाइटवरून तपासू शकता.

वर्डप्रेस इन्स्टॉल करणे

हे झाल्यावर तुम्हाला SSH Key असल्यास टर्मिनलमधून तुमचे ड्रॉपलेट लॉगिन करायचे आहे. जर तुम्हाला SSH Key बद्दल जास्त माहिती नसेल तर तुम्ही ड्रॉपलेट तयार करतांना जो पासवर्ड सेट केलाय त्याद्वारे तुम्ही तुमचे Droplet लॉगिन करू शकता.

DigitalOcean डॅशबोर्डमधून तुमच्या ड्रॉपलेटवर क्लिक करा. यात Access मधून Launch Console वर क्लिक करा.

digital-ocean-droplet-access

यानंतर नवीन विंडोमध्ये काळ्या रंगाचे कन्सोल उघडेल. यात तुम्हाला युजरनेम root असे टाकून इंटर करायचे आहे. यानंतर तुम्ही ड्रॉपलेट करतांना तयार केलेला पासवर्ड टाकायचा आहे. लॉगिन झाल्यावर त्यात दिसणाऱ्या सूचनांनुसार तुम्हाला माहिती भरायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचे डोमेन नेम विचारण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला ईमेल, वर्डप्रेस लॉगिन युजरनेम, पासवर्ड, ब्लॉगचे नाव क्रमाक्रमाने विचारण्यात येईल. हे सर्व झाल्यावर तुम्हाला Let’s Encrypt Free SSL इन्स्टॉल करायचे किंवा नाही हे विचारण्यात येईल. Y टाईप करून पुढे विचारली माहिती क्रमाक्रमाने भरत जा. बस इतकंच… झालं वर्डप्रेस इन्स्टॉल…

digital-ocean-wordpress-install-sucessful

आता ब्राउझरमध्ये तुमचे डोमेन उघडा. वर्डप्रेस इन्स्टॉल झालेलं असेल. www.yourdomain.com/wp-admin/ या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमच्या वर्डप्रेस वेबसाईटला लॉगिन करून करू शकता.

आता तुमची वेबसाईट तयार करण्यापूर्वी तुम्ही माझ्या ब्लॉगवरील वर्डप्रेस कॅटेगरीतील लेख वाचू शकता. त्यात तुम्हाला वर्डप्रेसवर थीम कशी इन्स्टॉल करावी?, वर्डप्रेसमध्ये प्लगिन कसे इन्स्टॉल करावे? याविषयी जाणून घेता येईल.

आता तुम्ही सहजपणे डिजिटलओशनवर तुमचा वर्डप्रेस ब्लॉग सुरु करू शकता. यानंतरही काही अडचण असल्यास कमेंट करू शकता अथवा सोशल मीडियावर मला मेसेज करू शकता. धन्यवाद!

तुषार भांबरे
Tags: Digital OceanDigitalOcean MarathiInstall WordPress
SendShare98Tweet8
ADVERTISEMENT
Previous Post

स्वस्त आणि मस्त वर्डप्रेस होस्टिंग : होस्टिंगर

Tushar Bhambare

Tushar Bhambare

६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.

Related Posts

hostinger-wordpress-hosting-review-marathi
वर्डप्रेस

स्वस्त आणि मस्त वर्डप्रेस होस्टिंग : होस्टिंगर

21 June 2020
258
how-to-install-wordpress-on-Namecheap-EasyWP-hosting
वर्डप्रेस

Namecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे?

15 September 2019
298
wpforms-how-to-create-contact-from-in-wordpress-marathi-tutorial
वर्डप्रेस

वर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा?

16 September 2019
302

Comments 1

  1. लक्ष्मीकांत शाम भुमकर says:
    3 months ago

    भन्नाटच की..! मराठीत इतक्या छान पणे आपण डिजिटलओशन आणि वर्डप्रेस बद्दल मांडणी केली आहे. आपला ब्लॉग पाहून खूप सुखावलो.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माझ्याविषयी

Online Tushar

तुषार महेश भांबरे

पत्रकार, ब्लॉगर

नमस्कार,
मी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.




How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

  • chat-on-whatsapp-without-saving-number

    नंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा?

    195 shares
    Share 152 Tweet 18
  • आपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची?

    165 shares
    Share 125 Tweet 17
  • वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा?

    113 shares
    Share 73 Tweet 17
  • प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स

    198 shares
    Share 163 Tweet 15
  • गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे?

    171 shares
    Share 137 Tweet 14

© 2019. Made with ❤️ using WordPress

No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल

© 2019. Made with ❤️ using WordPress