Thursday, December 17, 2020
Online Tushar
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
Online Tushar
No Result
View All Result

वर्डप्रेसमध्ये प्लगिन कसे इन्स्टॉल करावे?

Tushar Bhambare by Tushar Bhambare
11 March 2019
in वर्डप्रेस
Reading Time: 3min read
A A
6
how-to-install-wordpress-plugin-marathi
11
SHARES
180
VIEWS
व्हाटसॲपवर शेअर कराफेसबुकवर शेअर कराट्विटरवर शेअर करा
ADVERTISEMENT

वर्डप्रेस प्लगिन्सच्या मदतीने वेबसाईटवर नवनवीन फीचर्स वाढवता येतात. वर्डप्रेसवर सध्या हजारो मोफत आणि विकत प्लगिन्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर wordpress.com वापरत असला तर तुम्हला प्लगिन इन्स्टॉल करता येणार नाही. आजच्या ब्लॉगमध्ये आपण wordpress.org वर प्लगिन कसे इन्स्टॉल करावे हे पाहणार आहोत.

टॉप १० वर्डप्रेस प्लगिन जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

वर्डप्रेसवर तुम्ही ३ प्रकारे प्लगिन इन्स्टॉल करू शकता : वर्डप्रेस प्लगिन सर्चद्वारे, अपलोड करून, FTP द्वारे

१. वर्डप्रेस प्लगिन सर्चद्वारे प्लगिन इन्स्टॉल करणे

वर्डप्रेस प्लगिन हि प्लगिन इन्स्टॉल करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. परंतु याद्वारे तुम्ही केवळ वर्डप्रेस डिरेक्टरीमध्ये उपलब्ध असणारे मोफत प्लगिन्स इन्स्टॉल करू शकता.

वर्डप्रेस डॅशबोर्डवरील प्लगिन्स टॅबमधील Add New वर क्लिक करून सर्च बॉक्समध्ये तुम्हाला हवे असलेले प्लगिन सर्च करा. Install Now वर क्लिक करून हवे असणारे प्लगिन इन्स्टॉल करा. ऍक्टिव्हेट केल्याशिवाय वर्डप्रेस प्लगिन काम करत नाही त्यामुळे इन्स्टॉल केल्यावर प्लगिन ऍक्टिव्हेट करा.

२. अपलोड करून प्लगिन इन्स्टॉल करणे

विकत आणि प्रीमियम व्हर्जन असलेले प्लगिन पहिल्या पद्धतीने इन्स्टॉल करता येत नाहीत. तुम्ही जर एखादे प्लगिन विकत घेतलेले असेल तर तुम्हाला ते अपलोड करून इन्स्टॉल करावे लागेल.

वर्डप्रेस डॅशबोर्डमधील प्लगिन ऑप्शनवर क्लिक करून स्क्रिनशॉटमध्ये दाखवलेल्या Upload Plugin वर क्लिक करा.

ADVERTISEMENT

Choose file वर क्लिक करून प्लगिन फाईल निवडून Install Now वर क्लिक करून प्लगिन इन्स्टॉल व ऍक्टिव्हेट करा. यापद्धतीने प्लगिन इन्स्टॉल करतांना ते प्लगिन विश्वासार्ह्य आहे कि नाही हे नीट तपासावे.

३. FTP द्वारे प्लगिन इन्स्टॉल करणे

बऱ्याचदा होस्टिंगवरील काही लिमिटेशन्समुळे वरील दोघे पद्धतीने प्लगिन इन्स्टॉल करता येत नाही. अशा वेळी एफटीपीद्वारे प्लगिन इन्स्टॉल करावे लागते. तुम्ही जर cPanel होस्टिंग वापरात असला तर त्यातील फाईल मॅनेजरच्या मदतीने तुम्ही प्लगिन अपलोड करू शकता.

cPanel होस्टिंग फाईल मॅनेजर

cPanel होस्टिंग नसेल तर FileZilla, Cyberduck सारखे FTP client वापरू शकता. FTP युजरनेम आणि पासवर्डसाठी तुमच्या होस्टिंग कंपनीशी संपर्क साधा.

FileZilla FTP Client

तुमच्या वर्डप्रेस पाथमधील /wp-content/plugins/ या फोल्डरमध्ये तुमची प्लगिन फाईल अपलोड करा. फाईल पूर्ण अपलोड झाल्यावर वर्डप्रेस डॅशबोर्डद्वारे प्लगिन्समध्ये जाणून अपलोड केलेलं प्लगिन ऍक्टिव्हेट करा. यापद्धतीने प्लगिन इन्स्टॉल करतांना ते प्लगिन विश्वासार्ह्य आहे कि नाही हे नीट तपासावे.

ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा.

Continue Reading
Tags: WordPressWordPress PluginsWordPress Tutorials in Marathiवर्डप्रेसवर्डप्रेस प्लगिन्स
SendShare4Tweet3
ADVERTISEMENT
Previous Post

वापरायला हवेच असे १० वर्डप्रेस प्लगिन्स

Next Post

लोकलहोस्टवर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे?

Tushar Bhambare

Tushar Bhambare

६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.

Related Posts

digital-ocean-wordpress-marathi
वर्डप्रेस

DigitalOcean VPS वापरून ५ मिनिटात तयार करा वर्डप्रेस वेबसाईट

22 June 2020
520
hostinger-wordpress-hosting-review-marathi
वर्डप्रेस

स्वस्त आणि मस्त वर्डप्रेस होस्टिंग : होस्टिंगर

21 June 2020
259
how-to-install-wordpress-on-Namecheap-EasyWP-hosting
वर्डप्रेस

Namecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे?

15 September 2019
298
Next Post
how-to-install-wordpress-on-localhost-mamp-in-marathi

लोकलहोस्टवर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे?

Comments 6

  1. Pingback: वापरायला हवेच असे १० वर्डप्रेस प्लगिन्स | Tushar Bhambare
  2. Pingback: वर्डप्रेस वेबसाईटवर पुश नोटिफिकेशन कसे सुरु करावे? | Tushar Bhambare
  3. Pingback: ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग स्थलांतरित (Migrate) कसा करायचा?
  4. sandeep k chavan says:
    2 years ago

    sir i am creating my website on wordpress .com
    can i export in wordpress.org

    Reply
    • Tushar Bhambare says:
      2 years ago

      Yes. You can easily migrate your wordpress.com website to wordpress.org.

      Reply
  5. Pingback: DigitalOcean VPS वापरून ५ मिनिटात तयार करा वर्डप्रेस वेबसाईट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माझ्याविषयी

Online Tushar

तुषार महेश भांबरे

पत्रकार, ब्लॉगर

नमस्कार,
मी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.




How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

  • chat-on-whatsapp-without-saving-number

    नंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा?

    195 shares
    Share 152 Tweet 18
  • आपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची?

    165 shares
    Share 125 Tweet 17
  • वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा?

    113 shares
    Share 73 Tweet 17
  • प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स

    199 shares
    Share 164 Tweet 15
  • गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे?

    171 shares
    Share 137 Tweet 14

© 2019. Made with ❤️ using WordPress

No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल

© 2019. Made with ❤️ using WordPress