टॉप १० वर्डप्रेस ब्लॉग थीम्स

नमस्कार मित्रांनो,

या आधीच्या ब्लॉगमध्ये आपण वर्डप्रेसवर ब्लॉग कसा करावा हे  जाणून घेतले. होस्टिंग आणि डोमेन पलीकडे ब्लॉग सुरु करण्यासाठी इतरही काही गोष्टी आवश्यक असतात. यातील पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ब्लॉगची थीम.

वर्डप्रेसवर व्यक्तिगत ब्लॉग व्यतिरिक्त न्यूजपेपर, ई-कॉमर्स अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्स बनवता येतात. ज्यांना कोडींग येत नाही अशांसाठी नेटवर लाखो मोफत थीम्स  उपलब्ध आहेत. आजच्या लेखात आपण व्यक्तिगत ब्लॉगसाठी उपयोगात येतील अशा टॉप १० थीम्स पाहणार आहोत.

१. WordPress Default Themes :

वर्डप्रेसच्या काही डीफॉल्ट मोफत थीम्स आहेत. या वर्डप्रेससोबत आधीपासूनच इन्स्टॉल असतात. या बेसिक थीम्स असून यात तुम्हाला चेंजेस करायला खूप वाव आहे. परंतु यासाठी थोडीफार कोडींग येणे आवश्यक आहे.

२. GeneratePress :

generatepress-wordpress-theme

जनरेटप्रेस लाइटवेट आणि सिम्पल फ्री थीम आहे. या थीमचे १ लाखांहून अधिक ऍक्टिव्ह इन्स्टॉलस आहेत. जनरेटप्रेस मोबाईल रिस्पोन्सिव्ह असून नियमित वापराच्या सर्व प्लगिन्स सोबत सुसंगत आहे. जनरेटप्रेसचे फ्री व्हर्जन तसेच प्रीमियम व्हर्जन 39.95 डॉलर म्हणजे जवळपास २,६०० रुपयांना उपलब्ध आहे.

३. Genesis Framework :

genesis-framword-wordpress-theme

जेनेसिस फ्रेमवर्क वर्डप्रेस ब्लॉगर्समध्ये खूप प्रसिद्ध आहे. हे फ्रेमवर्क खूप पॉवरफुल असून यात कस्मायजेशनसाठी खूप वाव आहे. याच्या अनेक चाईल्ड थीम्स देखील उपलब्ध आहेत.

४. Voice by meks :

voice-wordpress-theme

व्हॉइस हि माझी स्वतःची एक आवडती थीम असून माझ्या ब्लॉग देखील याच थीमवर आहे. यात अनेक नवनवीन फीचर्स असून डेव्हलपरकडून यात नियमित अपडेट येत असतात. थीमफॉरेस्टवरून ६९ डॉलर्स म्हणजे जवळपास ४,५०० रुपयांना हि थीम घेता येईल. यात असणाऱ्या फीचर्सचा विचार केला तर हि थीम व्हॅल्यू फॉर मनी आहे.

५. Vlog by meks :

Vlog-by-meks-wordpress-theme

तुमचं स्वतःच युट्युब चॅनेल असेल तर व्हिलॉग हि तुमच्यासाठी परफेक्ट थीम आहे. YouTube, Vimeo यासारख्या साईट्सवरून तुमचे व्हिडीओ ऑटोमॅटिक ट्रान्स्फर करण्याची सुविधा आहे. यात २०० हुन अधिक लेआऊट्स आहेत.  सिनेमा मोड, स्टिकी व्हिडीओ यासारखे युनिक फीचर्सदेखील या थीम सोबत मिळतात. हि थीम तुम्हाला थीमफॉरेस्टवरून ६९ डॉलरला म्हणजे जवळपास ४,५०० रुपयांना विकत घेता येईल.

६. Studio by Catch Themes :

Studio_free_blog_wordpress-theme

कॅचथीम्सच्या अनेक थीम्सपैकी स्टुडिओ हि एक सिम्पल, क्लीन व रिस्पोन्सिव्ह थीम आहे. स्टुडिओ पूर्णपणे मोफत थीम आहे.

७. Hueman by Nicolas GUILLAUME :

hueman-wordpress-theme

ह्युमन हि एक टॉप रेटेड थीम असून ७० हजारांहून अधिक वेबसाईटवर वापरण्यात आली आहे. हि मल्टी कॉलम थीम असून यात कस्मायजेशनसाठी असंख्य पर्याय आहेत.

८. Nisarg by Falguni :

nisarg-wordpress-theme

निसर्ग हि एक मोफत थीम असून क्लीन सुटसुटीत लेआऊट आहे. थीम मोबाईल रिस्पोन्सिव्ह असून बुटस्ट्रॅप ३ वापरून हि थीम बनवण्यात आली आहे.

९. ColorMag by ThemeGrill :

color-mag-wordpress-theme

कलरमॅग हि ब्लॉगसोबत न्यूजपोर्टसाठीदेखील प्रसिद्ध आहे. १ लाखाहून अधिक वेबसाईट आणि ब्लॉगसाठी हि थीम वापरण्यात आली आहे. या थीमचे फ्री व प्रीमियम व्हर्जन उपलब्ध आहे. थीम पॅनलमध्ये फॉन्ट्स, लेआऊटसाठी अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. ब्लॉगरसाठी फ्री व्हर्जन देखील पुरेसे आहे.

१०. Ashe by WP Royal :

Ashe-Blog-WordPress-Theme

मॉर्डन ब्लॉग स्टाईल आवडणाऱ्यांसाठी हि एक छान थीम आहे. याच्या प्रो व्हर्जनमध्ये अनेक रंगसंगती व लेआऊट ऑप्शन्स उपलबध आहेत. अशेचे प्रो व्हर्जन २९ डॉलर म्हणजेच २ हजार रुपयांपासून उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त तुमच्या आवडीच्या काही थीम्स असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सुचवा.

आवडल्यास नक्की शेअर करा:

६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.

4 thoughts on “टॉप १० वर्डप्रेस ब्लॉग थीम्स”

 1. हॅलो सर.
  सर मी पण एक ब्लॉगर आहे, मी माझे लेख ब्लॉगरवर प्रकाशित करतो. सर सध्या मी ब्लॉगचे काही मोफत असलेले थीम्स वापरतो सर मला अगदी तुमच्या ब्लॉग्स सारखी थीम्स हवी आहे . तरी मी ती माझ्या ब्लॉगवर कशी आपलाय करू शकेल. हो मला अगदी तुमच्या ब्लॉग प्रमाणे माझं ब्लॉक create करायचं आहे. सर मी तुमचे ब्लॉग नियमित वाचतो तुमच्या माहितीचे मला खूप मदत झाली. धन्यवाद सर तुम्ही माहिती ब्लॉगवर दिल्याबद्दल कुठेच ब्लॉग विषयी मराठी माहिती मिळत नाही तुम्ही उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद. सर आशा करतो की माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्याल .

  Reply
  • नमस्कार प्रल्हादजी,

   ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. मी माझ्या ब्लॉगवर JNews हि थीम वापरतोय. ती तुम्हाला विकत घ्यावी लागेल. या शिंचे मोफत व्हर्जन अजून तरी उपलब्ध नाही.

   Reply
 2. Great blog best thing is its in mrathi, loved it but i dont know how to write above lines in mrathi . I just can read and soon learning to write.

  By the way the article is superb

  Reply

Leave a Comment