Tuesday, April 6, 2021
Online Tushar
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
Online Tushar
No Result
View All Result

२०२० मधील टॉप ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म

Tushar Bhambare by Tushar Bhambare
27 April 2020
in ब्लॉगिंग
Reading Time: 7 mins read
A A
2
top-5-blogging-platform-marathi-list-ब्लॉगिंग-प्लॅटफॉर्म
129
SHARES
836
VIEWS
व्हाटसॲपवर शेअर कराफेसबुकवर शेअर कराट्विटरवर शेअर करा
ADVERTISEMENT

अनेकांना स्वतःचा ब्लॉग सुरु करायचा असतो. पण नेमका कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी योग्य आहे हे कळत नसत. ऑनलाईन अनेक विकत व मोफत असे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. परंतु प्रत्येकाचे काही फायदे व काही तोटे आहेत. आजच्या ब्लॉगमध्ये आपण२०२० मधील टॉप ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची तुलना करणार आहोत. यात त्यांचे फायदे, तोटे याविषयी सविस्तर लिहण्याचा प्रयत्न असेल.

अनुक्रमणिका

    • हा ब्लॉग वाचून तुम्ही तुमच्यासाठी योग्य ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ठरवू शकाल हि अपेक्षा आहे.
  • १. WordPress.org (सेल्फ होस्टेड)
    • WordPress.org चे फायदे
    • WordPress.org चे तोटे
  • २. ब्लॉगर
    • ब्लॉगरचे फायदे
    • ब्लॉगरचे तोटे
  • ३. WordPress.com
    • WordPress.com चे फायदे
    • WordPress.com चे तोटे
  • ४. Wix
    • Wix चे फायदे
    • Wix चे तोटे
    • ५. Medium
    • Medium चे फायदे
    • Medium चे तोटे
  • निष्कर्ष

हा ब्लॉग वाचून तुम्ही तुमच्यासाठी योग्य ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ठरवू शकाल हि अपेक्षा आहे.

१. WordPress.org (सेल्फ होस्टेड)

वर्डप्रेस.ऑर्ग माझा स्वतःचा सर्वात आवडता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. जगातील ३०% वेबसाईट्स या वर्डप्रेसवर आहेत. माझा हा ब्लॉगदेखील वर्डप्रेसवर आहे. हा एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म असल्याने यावर तुम्हाला हवं तसं कस्टमाझेशन करणे शक्य होते. माझ्यामते वर्डप्रेस ओपन सोर्स असल्याकारणाने ब्लॉगिंगचे खरे फ्रिडम तुम्ही यावर अनुभवू शकता. वर्डप्रेस मोफत उपलब्ध असले तरी यासाठी तुम्हाला डोमेन, होस्टींग यावर खर्च करावा लागतो. वर्डप्रेस विषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या ब्लॉगवरील वर्डप्रेस या कॅटेगरीला भेट देऊ शकता.

WordPress.org चे फायदे

  • मोफत आणि ओपन सोर्स
  • अमर्यादित थीम्स डिझाइन्स
  • ५० हजारांपेक्षा जास्त प्लगिन्स
  • वापरायला सोपे
  • नियमित अपडेट्स
  • फार मोठी आणि ऍक्टिव्ह कम्युनिटी

WordPress.org चे तोटे

  • डोमेन – होस्टिंग विकत घेणे आवश्यक
  • जास्त ऍडव्हान्स कस्टमायझेशनसाठी कोडींगचे ज्ञान आवश्यक
  • सेल्फ होस्टेड असल्याने वेबसाईट सुरक्षा, बॅकअप यासाठी पेड सर्व्हिस घ्यावी लागते
वर्डप्रेस.ऑर्ग अधिकृत वेबसाईट

२. ब्लॉगर

ब्लॉगर पूर्णपणे मोफत असून ते एक गुगलचे प्रोडक्ट आहे. यात तुम्ही स्वतःचे डोमेन देखील जोडू शकता. ब्लॉगरच्या भरपूर थीम्स उपलब्ध असल्या तरी त्यात कस्टमाझेशनला इतका वाव नाही. जर तुम्ही नवीन ब्लॉगर असाल तर तुच्यासाठी हा योग्य प्लॅटफॉर्म आहे. याआधी मी वर्डप्रेस की ब्लॉगर? या ब्लॉगद्वारे वर्डप्रेस व ब्लॉगर मधील फरक अधिक सविस्तररित्या समजावून सांगितला आहे.

ADVERTISEMENT

ब्लॉगरचे फायदे

  • पूर्णपणे मोफत
  • वापरायला सोपे
  • गुगल सर्वकाही मॅनेज करत असल्याने सुरक्षिततेची चिंता नाही
  • गुगल ऍडसेन्सच्या मदतीने ब्लॉगिंगमधून तुम्ही पैसे कमावू शकता

ब्लॉगरचे तोटे

  • मर्यादित टूल्स उपलब्ध
  • लिमिटेड थीम्स
  • विशेष असे अपडेट्स नाही
  • गुगलची मालकी असल्याने ते हवं तेव्हा हवा तो निर्णय घेऊ शकता
ब्लॉगर अधिकृत वेबसाईट

३. WordPress.com

WordPress.com या कंपनीची मालकी Automattic या कंपनीकडे आहे. यात सेल्फ होस्टेड वर्डप्रेस इतकं कस्टमायझेशन करता येत नाही. यात तुम्ही wordpress.com च्या सबडोमेनवर पूर्णपणे मोफत ब्लॉग सुरु करू शकता. स्वतःच डोमेन जोडायचं असेल तर तुम्हाला त्यांचे प्लॅन्स विकत घ्यावे लागतील. वर्डप्रेस.कॉमवर आपल्याला वर्डप्रेस.ऑर्ग इतकं कंट्रोल ठेवता येत नाही. यावर तुम्ही थर्ड पार्टी थीम्स इन्स्टॉल करू शकता नाही. १५० रुपयाने महिन्यांपासून वर्डप्रेस.कॉमचे पेड प्लॅन्स सुरु होतात.

WordPress.com चे फायदे

  • सुरु करतांना कोणत्याही प्रकारच्या सेटअपची आवश्यकता नाही
  • वापरायला सोपे
  • मोफत होस्टींग
  • अनेक मोफत थीम्स

WordPress.com चे तोटे

  • सेल्फ होस्टेड वर्डप्रेसच्या तुलनेत कमी कस्टमाझेशन
  • मोफत असणाऱ्या प्लॅन सोबत तुम्ही जाहिराती दाखवू शकत नाही
  • WordPress.com कडे संपूर्ण मालकी असल्याने त्यांच्या अटींचा भंग झाल्यास ते ब्लॉग बंद करू शकता.
  • थर्ड पार्टी थीम्स लावता येत नाही
वर्डप्रेस.कॉम अधिकृत वेबसाईट

४. Wix

Wix हे त्याच्या AI साठी प्रसिद्ध आहे. Wix AI च्या मदतीने तुम्ही टेक्निकल माहिती नसतांना देखील ब्लॉग सुरु करू शकता. यातील सोप्या ड्रॅग अँड ड्रॉप पद्धतीमुळे ब्लॉगमध्ये कस्टमाझेशन करणे सहज शक्य होते. Wixच्या सबडोमेनवर तुम्ही मोफत ब्लॉग सुरु करू शकता. प्रिमिअम प्लॅन विकत घेण्यासाठी तुम्हाला महिन्याला ७० रुपये खर्च करावे लागतील. त्यात तुम्हाला मोफत डोमेनसह अनलिमिटेड ब्रँडविड्थ असलेली १० जीबी होस्टिंग देखील मिळते.

Wix चे फायदे

  • ड्रॅग अँड ड्रॉप एडिटर
  • Wix AI च्या मदतीने सोपा सेटअप
  • थर्ड पार्टी अप्स वापरून कस्टमायझेशन शक्य

Wix चे तोटे

  • मोफत असणाऱ्या प्लॅनमध्ये Wix ची ब्रॅण्डिंग असते
  • मर्यादित मोफत थर्ड पार्टी अप्स
  • एकदा लावलेले टेम्प्लेट नंतर बदलता येत नाही
  • बाहेरील जाहिराती घेता येत नाही
Wix अधिकृत वेबसाईट

५. Medium

Medium-logo

ट्विटरचा फाउंडर इवान विलियम्स याने २०१२ साली Medium सुरु केले. जर तुम्हाला डिजाईन, कस्टमाझेशन सोडून केवळ लिखाणावर फोकस करायचा आहे तर Medium तुमच्यासाठी योग्य आहे. खासकरून ब्लॉगर्स, लेखक, पत्रकार अशांचाच विचार करून Medium सुरु करण्यात आले आहे. याततुमच्या ब्लॉगचा ऍड्रेस https://medium.com/@yourname असा असेल. यात स्वतःचे डोमेन जोडता येत नाही.

Medium चे फायदे

  • वापरायला सोपे व प्रकारच्या सेटअपची गरज नाही
  • कोडिंगच्या ज्ञानाची आवश्यकता नाही
  • ६० मिलीयनपेक्षा जास्त वाचक

Medium चे तोटे

  • अतिशय मर्यादित फीचर्स
  • स्वतःच डोमेन वापरू शकत नाही
  • बाहेरील जाहिराती लावणे अशक्य
Medium अधिकृत वेबसाईट

निष्कर्ष

अनेक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असले तरी मला आवडणाऱ्या ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म विषयी मी येथे लिहलं आहे. मी स्वतः वर्डप्रेस.ऑर्गच्या प्रेमात आहे. कारण वर्डप्रेस इतकं स्वातंत्र्य मला दुसऱ्या कुठल्याच प्लॅटफॉर्मवर जाणवत नाही. वर्डप्रेसवर काम करणारी खूप मोठी कम्युनिटी जगभरात असल्याने यात वेळोवेळी फार बदल होत आहेत. दिवसेंदिवस वर्डप्रेस अधिक युजर फ्रेंडली होत आहे. आधी फक्त ब्लॉगिंगसाठी तयार झालेल्या या प्लॅटफॉर्मवर आता न्यूज पोर्टल, बिजनेस, ई-कॉमर्स अशा अनेक प्रकारच्या वेबसाईट तयार होत आहेत.

तुमचा आवडता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कोणता? हे कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत शेयर करा. तुम्ही मला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.

तुषार भांबरे
Tags: BloggerBlogging in MarathiBlogging PlatformsMediumWixWordPress
SendShare99Tweet13
ADVERTISEMENT
Previous Post

प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स

Next Post

वर्डप्रेस शिकण्यासाठी १० सर्वोत्तम ऑनलाईन स्रोत

Tushar Bhambare

Tushar Bhambare

६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.

Related Posts

google-adsense-marathi-website
ब्लॉगिंग

गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे?

21 June 2020
1.2k
google-adsense-now-for-marathi
ब्लॉगिंग

अखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु

22 June 2020
556
must-have-chrome-extensions-for-bloggers-marathi
ब्लॉगिंग

प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स

7 May 2019
1.1k
Next Post
learn-wordpress-online

वर्डप्रेस शिकण्यासाठी १० सर्वोत्तम ऑनलाईन स्रोत

Comments 2

  1. Prafulla says:
    2 years ago

    फारच छान तुषार सर,
    मनोज लुल्हे कडून आपल्या ब्लॉग बद्दल समजले.
    मी आत्ताच ब्लॉग सुरु केलेला आहे आपल्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे.
    https://lifecoachprafulla.blogspot.com/

    Reply
  2. Rohit says:
    7 months ago

    धन्यवाद तुषार. अतिशय उपयुक्त माहिती अगदी सोप्या शब्दात. मी नवीनच सुरुवात केली आहे आणि तंत्राद्यानाविषयी लिहितो. आपले मार्गदर्शन असावे. वेबसाईट http://www.alotmarathi.com

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माझ्याविषयी

Online Tushar

तुषार महेश भांबरे

पत्रकार, ब्लॉगर

नमस्कार,
मी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.




How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

  • how-to-rank-1-on-google-marathi-guindance

    आपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची?

    194 shares
    Share 136 Tweet 24
  • नंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा?

    210 shares
    Share 158 Tweet 22
  • वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा?

    130 shares
    Share 80 Tweet 21
  • गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे?

    185 shares
    Share 143 Tweet 18
  • प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स

    209 shares
    Share 168 Tweet 17

© 2019. Made with ❤️ using WordPress

No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल

© 2019. Made with ❤️ using WordPress