Friday, March 5, 2021
Online Tushar
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
Online Tushar
No Result
View All Result

ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा?

Tushar Bhambare by Tushar Bhambare
28 April 2019
in वर्डप्रेस
Reading Time: 4min read
A A
2
blogger-to-wordpress-migration-in-marathi
100
SHARES
473
VIEWS
व्हाटसॲपवर शेअर कराफेसबुकवर शेअर कराट्विटरवर शेअर करा
ADVERTISEMENT

गेल्या खूप दिवसांपासून अनेकांचे माझ्या फेसबुक पेजवर मेसेज येत होते कि आम्ही आधी ब्लॉगरवर ब्लॉग तयार केलाय. आता तो आम्हाला वर्डप्रेसवर स्थलांतरित (Migrate) करायचा आहे कसा करू? तर हे अतिशय सोपे आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि तुमच्या गुगल रँक अथवा इतर गोष्टींना धक्का न पोहचवता ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा हे जाणून घेऊ.

अनुक्रमणिका

  • ब्लॉगर आणि वर्डप्रेस यामध्ये नेमका फरक काय?
  • १. वर्डप्रेस ब्लॉग तयार करणे
  • २. ब्लॉगरवरील डेटा एक्स्पोर्ट करा
  • ३. वर्डप्रेसवर इम्पोर्ट करणे
  • ४. परमालिंक्स सेटअप करणे
  • ५. ब्लॉगर ते वर्डप्रेस रिडायरेक्शन

ब्लॉगर आणि वर्डप्रेस यामध्ये नेमका फरक काय?

ब्लॉगर हे एक गुगलचे प्रोडक्ट आहे. ब्लॉगरवरील आपल्या ब्लॉगवर आपल्यापेक्षा गुगलचे अधिक कण्ट्रोल आहे. कस्टमायझेशन, सपोर्ट, अपडेट्स यांचा विचार केल्यास वर्डप्रेस हे ब्लॉगरला वरचढ ठरते.

ब्लॉगस्पॉटवरून वर्डप्रेसवर स्थलांतरित होण्याअगोदर खालील ब्लॉग नक्की वाचा.

१. वर्डप्रेस की ब्लॉगर?
२.वेब होस्टिंग म्हणजे काय?

१. वर्डप्रेस ब्लॉग तयार करणे

सर्वप्रथम तुम्हाला एक वर्डप्रेस ब्लॉग तयार करावा लागेल. यासाठी होस्टिंग, डोमेन आणि थीम या प्राथमिक गोष्टी लागतील. वर्डप्रेस ब्लॉग कसा तयार करावा याविषयीचा ब्लॉग तुम्ही येथे क्लिक करून वाचू शकता.

२. ब्लॉगरवरील डेटा एक्स्पोर्ट करा

तुमच्या ब्लॉगरवरील ब्लॉगच्या सेटिंगमध्ये जाऊन Other क्लिक करा. खाली स्क्रिनशॉटमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही Back up Content वर क्लिक करून तुमच्या ब्लॉगवरील सर्व डेटाचा बॅकअप घेऊ शकता. Save to your computer वर क्लिक केल्यावर एक .xml फाईल डाउनलोड होईल.

३. वर्डप्रेसवर इम्पोर्ट करणे

आता ज्या वर्डप्रेस वेबसाईटवर तुम्हाला हा ब्लॉगरचा डेटा हवा आहे त्या वर्डप्रेसच्या डॅशबोर्डमधून Tools मधील Import वर क्लिक करा. यानंतर पहिल्याच Blogger खालील Install वर क्लिक करून प्लगइन इन्स्टॉल करा. Run Importer वर क्लिक करून स्टेप २ मध्ये डाऊनलोड केलेली .xml फाईल निवडून इम्पोर्ट करा. पुढील १-२ स्टेप्स फॉलो केल्यावर तुमच्या सर्व ब्लॉगरवरील ब्लॉग पोस्ट वर्डप्रेसवर येतील.

ADVERTISEMENT

४. परमालिंक्स सेटअप करणे

ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर स्थलांतरित झाल्यावर परमालिंक्स नीट न सेट केल्यामुळे तुमच्या गुगल रँकिंगवर परिणाम होऊ शकतो. यासाठी ब्लॉगरवर तुमच्या परमालिंक्स जशा होत्या तशाच वर्डप्रेसवर देखील सेट करणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्या वर्डप्रेस ब्लॉगच्या Settings मध्ये जाऊन Permalinks वर क्लिक करा. यातील Custom Structure वर क्लिक करून पुढील प्रकारे मजकूर (Text) टाका.

 /%year%/%monthnum%/%postname%.html

५. ब्लॉगर ते वर्डप्रेस रिडायरेक्शन

ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर स्थलांतरित झाल्यावर देखील जुन्या ब्लॉगरच्या लिंक्स वर्डप्रेसच्या त्याच ब्लॉगवर रिडायरेक्ट करणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या ब्लॉगरवरील सध्याच्या गुगल रँक आणि ट्राफिकचा पूर्णपणे फायदा नवीन वर्डप्रेस ब्लॉगला होईल.

ब्लॉगर ते वर्डप्रेस रिडायरेक्शनसाठी तुम्हाला Blogger To WordPress हे प्लगिन इन्स्टॉल करावे लागेल. वर्डप्रेस ब्लॉगवर प्लगिन कसे इन्स्टॉल करावे हे जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा.

Blogger To WordPress प्लगिन इन्स्टॉल केल्यावर Tools मधून Blogger to WordPress Redirection या नवीन पर्यायावर क्लिक करा. Start Configuration वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या ब्लॉगर ब्लॉगचा URL दिसेल त्यासमोरील Get Code वर क्लिक करा. यात दिसणारा कोड कॉपी करा.

यानंतर ब्लॉगरवरील Theme मध्ये जाऊन Edit HTML वर क्लिक करा. यातील सर्व कोड डिलीट करून वर्डप्रेसवरील कॉपी केलेला कोड टाकून Save Theme वर क्लिक करा.

शेजारील मोबाईल Theme च्या सेटिंगमध्ये जाऊन  No. Show desktop theme on mobile devices. हा पर्याय निवडा.

आता पुन्हा वर्डप्रेसवरील Blogger to WordPress Redirection मध्ये जाऊन Verify Configuration वर क्लिक करून तुमचे रेडायरेक्शन नीट सेट झाले का हे तपासा.

अशा प्रकारे तुम्ही तुमचा ब्लॉगर ब्लॉग वर्डप्रेसवर स्थलांतरित करू शकता. हा ब्लॉग वाचल्यानंतरही तुमच्या काही शंका, सूचना असल्यास नक्की कमेंट करा. आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद!

तुषार भांबरे.

Tags: BloggerBlogger To WordPressBlogspotWordPressब्लॉगरब्लॉगस्पॉटवर्डप्रेस
SendShare83Tweet7
ADVERTISEMENT
Previous Post

टॉप ५ वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स कोणते?

Next Post

नंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा?

Tushar Bhambare

Tushar Bhambare

६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.

Related Posts

digital-ocean-wordpress-marathi
वर्डप्रेस

DigitalOcean VPS वापरून ५ मिनिटात तयार करा वर्डप्रेस वेबसाईट

22 June 2020
874
hostinger-wordpress-hosting-review-marathi
वर्डप्रेस

स्वस्त आणि मस्त वर्डप्रेस होस्टिंग : होस्टिंगर

21 June 2020
361
how-to-install-wordpress-on-Namecheap-EasyWP-hosting
वर्डप्रेस

Namecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे?

15 September 2019
342
Next Post
chat-on-whatsapp-without-saving-number

नंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा?

Comments 2

  1. Ashok says:
    2 years ago

    खूप छान माहिती दिली.

    Reply
    • तुषार महेश भांबरे says:
      2 years ago

      अशोकजी धन्यवाद!

      Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माझ्याविषयी

Online Tushar

तुषार महेश भांबरे

पत्रकार, ब्लॉगर

नमस्कार,
मी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.




How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

  • how-to-rank-1-on-google-marathi-guindance

    आपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची?

    186 shares
    Share 133 Tweet 22
  • नंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा?

    205 shares
    Share 156 Tweet 21
  • वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा?

    124 shares
    Share 78 Tweet 19
  • प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स

    207 shares
    Share 167 Tweet 17
  • गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे?

    181 shares
    Share 141 Tweet 17

© 2019. Made with ❤️ using WordPress

No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल

© 2019. Made with ❤️ using WordPress