वर्डप्रेसमध्ये पोस्ट आणि पेज यात काय फरक आहे?
अनेक नवीन वर्डप्रेस युजर्स पोस्ट आणि पेज यामध्ये गोंधळून जातात. मला खूप जण विचारतात जर पेजवर पण पोस्टसारखेच लिहता येत तर आम्ही पेजवरच का लिहू नये? पेज कधी तयार करावे? पोस्ट व पेज हे दिसायला सारखे असले तरी त्यात खूप अंतर आहे. दोघांचे उपयोग वेगवेगळे आहेत. यासाठीच आजच्या ब्लॉगमध्ये आपण वर्डप्रेस पोस्ट व ब्लॉग यातील…
अनेक नवीन वर्डप्रेस युजर्स पोस्ट आणि पेज यामध्ये गोंधळून जातात. मला खूप जण विचारतात जर पेजवर पण पोस्टसारखेच लिहता येत तर आम्ही पेजवरच का लिहू नये? पेज कधी तयार करावे? पोस्ट व पेज हे दिसायला सारखे असले तरी त्यात खूप अंतर आहे. दोघांचे उपयोग वेगवेगळे आहेत. यासाठीच आजच्या ब्लॉगमध्ये आपण वर्डप्रेस पोस्ट व ब्लॉग यातील फरक सविस्तर समजून घेऊन.
वर्डप्रेसमध्ये पोस्ट म्हणजे काय?
वर्डप्रेस पोस्टचे तुम्ही कॅटेगरी, टॅगनुसार वर्गीकरण करू शकता. तुमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेल्या पोस्ट उतरत्या क्रमाने दिसतात. उतरत्या क्रमाने पोस्ट पब्लिश होत असल्याने तुम्ही त्या महिना, वर्ष यानुसार देखील वर्गीकृत करू शकता. तुमचे वाचक RSS Feed च्या मदतीने पोस्टचे अपडेट्स मिळवू शकता.
पोस्ट वेळेनुसार सॉर्ट होत असल्याने त्याचा SEO साठी देखील फायदा होतो. सर्च इंजिन वर्गीकृत केलेल्या पोस्टला विशेष प्राधान्य देते. त्यामुळे पेजपेक्षा पोस्टला SEO चा अधिक फायदा होतो.वर्डप्रेसमध्ये पोस्टला सोशल शेअरिंग आणि कमेंटचा पर्याय असल्याने पोस्टवर वाचक अधिक व्यक्त होतात.
वर्डप्रेसमध्ये पेज म्हणजे काय?
वर्डप्रेसमध्ये पेज प्राव्हसी पॉलिसी, टर्म कंडिशन यासाठी वापरण्यात येते. अशा पेजेसवर सोशल शेअरिंग अथवा कमेंटची आवश्यकता नसते. त्यामुळे वर्डप्रेसमध्ये पेजेसला सोशल शेअरिंग आणि कमेंट हे पर्याय बंद असतात. तुम्हाला हवे असल्यास सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ते सुरु करू शकता.
वर्डप्रेस थीम्समध्ये पेजेस होमपेज, लँडिंग पेज तयार करण्यासाठी देखील वापरले जाते. पेजेसमध्ये पोस्टसारखं कॅटेगरी अथवा टॅग नसले तरी त्यात पॅरेण्ट पेज आणि सबपेज असे पर्याय असतात. पेजेस RSS Feed मध्ये नसतात त्यामुळे त्याचे अपडेट्स वाचकांना मिळत नाही. आता या माझ्या ब्लॉगवरील माझ्या बद्दल हे एक पेज आहे.
जर तुम्ही वर्डप्रेसवर मीडिया वेबसाईट बनवत असला तर तुम्हाला पोस्टची जास्त आवश्यता लागेल. परंतु जर तुम्ही बिजनेस वेबसाईट बनवत असाल तर तुम्हाला पेजेसची गरज भासेल.
आशा आहे तुम्हाला हा ब्लॉगवाचून वर्डप्रेसमधील पोस्ट आणि पेज यातील फरक समजला असेल. यानंतर ही काही शंका असल्यास कमेंट करा. ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर करा.
तुषार भांबरे.