वर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा?

तुम्हाला तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाईटवर कॉन्टॅक्ट फॉर्म तयार करायचा आहे का? प्रत्येक वेबसाईटवर कॉन्टॅक्ट फॉर्म असणे आवश्यक आहे. जर तुम्ही वर्डप्रेसचा वापर करत असाल तर तुम्ही सहजपणे कॉन्टॅक्ट फॉर्म वेबसाईटवर जोडू शकता. आजच्या ब्लॉगमध्ये आपण वर्डप्रेस वेबसाईटवर कोणत्याही प्रकारची कोडिंग न करता WPForms हे प्लगिन वापरून कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करावा हे जाणून घेऊ.

वेबसाईटवर कॉन्टॅक्ट फॉर्म का असावा?

अनेकांना वाटत कि जर वेबसाईटवर ई-मेल आयडी, मोबाईल नंबर देता येतो तर कॉन्टॅक्ट फॉर्म ठेवण्याची गरज काय? हा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न आहे. मुळात कॉन्टॅक्ट फॉर्म जोडण्यासाठी खूप काही करावं लागत या भीतीमुळे आपल्या मनात हा प्रश्न येतो. जर तुम्ही वर्डप्रेस वापरात असाल तर फक्त ५ मिनिटात तुम्ही कॉन्टॅक्ट फॉर्म तयार करू शकता.

वेबसाईटवर ई-मेल आयडी ऐवजी कॉन्टॅक्ट फॉर्म का जोडावा याची कारणे आपण जाणून घेऊ.

 • स्पॅम प्रोटेक्शन : स्पॅम बॉट्स वेबसाईटवर असणारे mailto: टॅग नियमित शोधत असतात. यामुळे तुम्ही जर असा ई-मेल आयडी वेबसाईटवर टाकल्यास तुम्हाला येणारे स्पॅम मेल वाढू शकतात.
 • हवी ती माहिती : बऱ्याच फक्त ई-मेल आयडी दिल्यास समोरचा अपूर्ण माहिती पाठवतो. कॉन्टॅक्ट फॉर्मच्या मदतीने तुम्हाला अपेक्षित असणारी सर्व माहिती अगोदरच मागवू शकता. जसे कि, मोबाईल नंबर, पत्ता
 • ऑटोमेशन : कॉन्टॅक्ट फॉर्मचा वापर करून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी स्वयंचलित (Automatically) करू शकता. जसे कि, कॉन्टॅक्ट फॉर्म मधून आलेल्या मेलला उत्तर देणे, त्यांना SMS पाठवणे.

१. कॉन्टॅक्ट फॉर्मसाठी कोणते प्लगिन वापरावे?

वर्डप्रेस वेबसाईटवर कॉन्टॅक्ट फॉर्म तयार करण्यासाठी शेकडो मोफत आणि विकत प्लगिन्स उपलब्ध आहेत. यापैकी कोणते प्लगिन निवडावे हा प्रश्न अनेकांना पडतो. वर्डप्रेस प्लगिन निवडतांना फार काळजी घ्यावे घेणे आवश्यक आहे. चुकीचे प्लगिन निवडल्यामुळे वेबसाईट सेक्युरिटी, वेबसाईट स्पीड – लोडींग टाईम याविषयी अडचणी उद्भवण्याची शक्यता असते.

माझ्यामते तुम्ही खालील काही प्लगिन्स वापरायला हरकत नाही.

 1. WPForms
 2. Contact Form 7
 3. Ninja Forms
 4. Gravity Forms

आजच्या ब्लॉगमध्ये नमुना म्हणून WPForms या प्लगिनच्या मदतीने कॉन्टॅक्ट फॉर्म कसा सेटअप करावा हे आपण पाहणार आहोत. WPForms हे प्लगिन WPBeginner चे संस्थापक सैयद बल्खी यांनी तयार केले आहे. जवळपास सर्व प्लगिनमध्ये कॉन्टॅक्ट फॉर्म तयार करण्यासाठी याच प्रकारची पद्धत असते. यात नाममात्र बदल असू शकतो.

२. WPForms कॉन्टॅक्ट फॉर्म प्लगिन कसे इन्स्टॉल करावे?

वर्डप्रेसवर प्लगिन्स कसे इन्स्टॉल करावे याविषयी मी यापूर्वी लिहलेला सविस्तर ब्लॉग तुम्ही येथे क्लिक करून वाचू शकता. प्लगिन इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला वर्डप्रेस डॅशबोर्डमध्ये Plugins -> Add New वर क्लिक करायचे आहे. यानंतर सर्च बॉक्समध्ये WPForms सर्च करा. Install बटनावर क्लिक करून प्लगिन इन्स्टॉल करा. अधिक माहितीसाठी खालील स्क्रिनशॉट तपासा.

३. WPForms वापरून कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करावा?

WPForms प्लगिन इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या वर्डप्रेस डॅशबोर्डमध्ये WPForms नावाचा पर्याय दिसेल. त्यात Add New वर क्लिक करा.

यात तुम्हाला फॉर्मसाठी काही पर्याय दिसतील. जसे की, Blank form, Simple Contact From, Newslatter Signup Form, Suggestion Form. याच्यामदतीने तुम्हाला आपोआप तयार कॉन्टॅक्ट फॉर्म भेटेल.

यात Simple Contact Form वर क्लिक करा. यात तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉपच्या मदतीने तुम्हाला हवा तसा कॉन्टॅक्ट फॉर्म तयार करू शकता. तुम्हाला हवा तास फॉर्म तयार केल्यावर Save बटनावर क्लिक करून तुमचा फॉर्म सेव्ह करा.

यानंतर तुम्हाला तुम्ही तयार केलेल्या कॉन्टॅक्ट फॉर्मचा Shortcode मिळेल. आता यानंतर तुम्हाला जिथं कुठे कॉन्टॅक्ट फॉर्म हवा असेल तिथं हा Shortcode टाकायचा आहे. अशा रीतीने तुम्ही ५ मिनिटात वर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म तयार करू शकता.

जर तुम्हाला वेबसाईटच्या साईडबारमध्ये देखील कॉन्टॅक्ट फॉर्म जोडू शकता. याकरिता तुम्हाला Appearance -> Widgets मध्ये जाऊन Text Widgets मध्ये फक्त WPForms चा फक्त Shortcode टाकायचा आहे.

या ब्लॉगमुळे तुम्ही आता सहजपणे तुमच्या वर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म तयार करू शकता. ब्लॉग उपयोगी वाटल्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद!

तुषार भांबरे
आवडल्यास नक्की शेअर करा:

६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.

2 thoughts on “वर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा?”

 1. मी आपले ब्लॉग वाचले आहे. डिजिटल ओशियन होस्टिंग घ्यायाची आहे. काही प्रश्न आहेत.
  जर डिजिटल ओशियनची होस्टिंग घेतली तर दिवसाला किती विजिटर्स मर्यादा आहे.

  Reply
  • कोणता प्लॅन घेत आहेत यावर अवलंबून आहे. आमच्या एका वेबसाईटला दिवसात १५-२० लाख व्हिजिटर येतात. डिजिटल ओशनवर ते सहज मॅनेज झाले आहेत.

   Reply

Leave a Comment