वर्डप्रेसमध्ये कॅटेगरी कशा तयार कराव्यात?
वर्डप्रेसमध्ये आपल्या पोस्ट कॅटेगरी आणि टॅगच्या मदतीने वर्गीकरण करता येते. कॅटेगरी आणि टॅगमधील महत्त्वाचा फरक म्हणजे कॅटेगरीमध्ये तुम्हाला सबकॅटेगरी करता येतात. आजच्या ब्लॉगमध्ये आपण कॅटेगरी कशा तयार कराव्यात हे जाणून घेऊ. कॅटेगरीच्या मदतीने तुम्हाला तुमची वेबसाईट अधिक सुटसुटीत करता येते. उदाहरणार्थ जर तुमचे न्यूज पोर्टल असेल तर त्यावरील बातम्या तुम्ही राज्यानुसार दाखवू शकता. त्यातल्या त्यात…
वर्डप्रेसमध्ये आपल्या पोस्ट कॅटेगरी आणि टॅगच्या मदतीने वर्गीकरण करता येते. कॅटेगरी आणि टॅगमधील महत्त्वाचा फरक म्हणजे कॅटेगरीमध्ये तुम्हाला सबकॅटेगरी करता येतात. आजच्या ब्लॉगमध्ये आपण कॅटेगरी कशा तयार कराव्यात हे जाणून घेऊ.
कॅटेगरीच्या मदतीने तुम्हाला तुमची वेबसाईट अधिक सुटसुटीत करता येते. उदाहरणार्थ जर तुमचे न्यूज पोर्टल असेल तर त्यावरील बातम्या तुम्ही राज्यानुसार दाखवू शकता. त्यातल्या त्यात तुम्हाला अजून वर्गीकरण करायचे असल्यास तुम्ही राज्याच्या पॅरेन्ट कॅटेगरीमध्ये जिल्ह्याची सब कॅटेगरी तयार करू शकता.
कॅटेगरी कशी तयार करावी?
वर्डप्रेसमध्ये २ प्रकारे कॅटेगरी तयार करता येते. पहिला प्रकार म्हणजे Posts -> Categories मध्ये जाणून तयार करणे. दुसरे म्हणजे पोस्ट तयार करत असतांना तिथंच तयार करणे.
पहिल्या प्रकाराने कॅटेगरी तयार करणे कधीही योग्य आहे. परंतु अनेकदा घाईघाईत अचानक एखादी कॅटेगरी तयार करायची असल्यास पोस्टमधूनच तयार केली तरी चालते. कॅटेगरी तयार करत असतांना सुटसुटीत करण्याच्या नादांत विनाकारण जास्त कॅटेगरी तयार होणार नाही याची काळजी घ्यावी.
कॅटेगरी तयार करण्यासाठी Posts मधील Categories या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या थीममध्ये कॅटेगरी पेजवर डिस्क्रिप्शन दिसत असल्यास डिस्क्रिप्शन देखील टाकावे.
सब कॅटेगरी कशी तयार करावी?
अनेकदा पॅरेन्ट कॅटेगरीमध्ये सब कॅटेगरी तयार करावी लागते. यासाठी कॅटेगरी तयार करतांना खालील ड्रॉप डाऊनमधून पॅरेन्ट कॅटेगरी सिलेक्ट करावी.
पोस्ट करता करतांना तेथून देखील कॅटेगरी तयार करता येते. त्यासाठी उजव्या बाजूला असणाऱ्या साईडबार मधून कॅटेगरी तयार करावी.
यानंतर तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट करा. ब्लॉग आवडल्यास नक्की शेयर करा.
तुषार भांबरे.