Tuesday, April 6, 2021
Online Tushar
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
Online Tushar
No Result
View All Result

टॉप १० न्यूजपेपर / मॅगझीन वर्डप्रेस थीम

Tushar Bhambare by Tushar Bhambare
3 June 2019
in वर्डप्रेस
Reading Time: 7 mins read
A A
2
top-10-newspaper-Magazine-wp-themes
124
SHARES
691
VIEWS
व्हाटसॲपवर शेअर कराफेसबुकवर शेअर कराट्विटरवर शेअर करा
ADVERTISEMENT

वर्डप्रेस हे सुरवातीला खरं तर ब्लॉगर, पब्लिशर यांनाच समोर ठेऊन तयार करण्यात आलं होत. न्यूजपोर्टलसाठी माझ्यामते वर्डप्रेस हीच सर्वोत्तम कंटेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम (CMS) आहे. सध्या राष्ट्रीय पातळीवरील इंडियन एक्सप्रेसपासून स्थानिकपातळीवरील जनशक्तिपर्यन्त अनेक मीडिया हाऊसमध्ये वर्डप्रेस वापरले जाते.

वर्डप्रेसवर न्यूजपोर्टल सुरु करणे अतिशय सोपे व कमी खर्चिक आहे. माझ्या ब्लॉगवर याआधी मी वर्डप्रेसवर वेबसाईट कशी सुरु करावी याविषयी लिहले आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण न्यूजपोर्टलसाठी चांगल्या व मला स्वतःला आवडणाऱ्या १० थीम्स पाहणार आहोत.

अनुक्रमणिका

  • १. Newspaper
  • २. JNews
  • ३. MH Magazine
  • ४. Voice
  • ५. Goodnews
  • ६. Sahifa
  • ७. ColorMag

१. Newspaper

Newspaper हि थेमेफॉरेस्ट ThemeForest वरून मॅगझीन कॅटेगरीमधून सर्वाधिक विकत घेतलेली थीम आहे. नियमित अपडेटसाठी हि थीम प्रसिद्ध आहे. ५० हुन अधिक डेमो यावर उपलब्ध आहेत. यात तुम्ही न्यूजपेपर, रिव्ह्यू वेबसाईट, ब्लॉग यासारख्या वेबसाईट अतिशय उत्तमपणे बनवू शकता.

यासोबत तुम्हाला ८ प्रीमियम प्लगिन मोफत मिळतात. जेटपॅक, WooCommerce, WPML, bbPress, Contact Form 7 यासारख्या सर्व प्रसिद्ध वर्डप्रेस प्लगिन्ससोबत हि थीम सुसंगत आहे.

यात इनबिल्ट रिव्ह्यू सिस्टीम आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगवर कोणत्याही गोष्टींचे रिव्ह्यू अतिशय पद्धतशीरपणे दाखवू शकता. यात असंख्य फॉन्ट्स असून यासोबत तुम्ही गुगल फॉन्ट्स देखील वापरू शकता.

नवीन व्हर्जनमध्ये WPBakery Page Builder for WordPress ऐवजी त्यांचे स्वतःचे tagDiv Composer हे पेज बिल्डर वापरावे लागते. व्यक्तिगत मला ते मुळीच आवडलेलं नाही.

Newspaper थीम सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) साठी पूर्णपणे सुसंगत आहे. तसेच कोडींग देखील ऑप्टिमाइझ असल्याने यावर लोडींग स्पीड देखील चांगला आहे.

येथे क्लिक करून तुम्ही ThemeForest वरून Newspaper थीम $45 मध्ये खरेदी करू शकता.

२. JNews

JNews हि वर्डप्रेससाठीची मला सर्वात जास्त आवडणारी मॅगझीन प्रकारातील थीम आहे. माझा स्वतःचा ब्लॉग देखील याच थीमवर आहे.

पेज बिल्डर म्हणून यासोबत तुम्हाला WPBakery व Elementor हे दोघ प्रसिद्ध प्रीमियम प्लगिन्स मोफत मिळतात. तसेच YellowPencil हे Visual CSS Editor हे प्लगिन देखील मोफत मिळते.

अतिशय सुटसुटीत आणि स्वच्छ लेआऊट असणारी JNews थीम SEO साठी सुसंगत असल्याचा दावा थीम डेव्हलपरकडून करण्यात येतो. यात तुम्हाला इनबिल्ट Google AMP सपोर्ट मिळत असल्याने तुम्ही AMP मोडमधील रंगसंगती सहजपणे बदलवू शकता.

JNews सोबत तुम्हाला Infinite Scroll, Review System, View Counter, Frontend Submit यासारख्या सुविधा मिळतात.

4.77 सरासरी रेटिंग जाणारी JNews थीम तुम्ही $35 मध्ये विकत घेऊ शकता.

३. MH Magazine

MH Magazine हि सुद्धा माझी एक आवडती वर्डप्रेस थीम आहे. जर तुम्ही तुमच्या वेबसाइटवर जास्त खर्च करू शकत नसाल तर MH Magazine Lite हे मोफत व्हर्जन देखील तुम्ही वापरू शकता.

अतिशय सुटसुटीत आणि सोपी असणारी हि थीम मोबाईल रिस्पोन्सिव्ह देखील आहे. तुम्ही नवीनच वर्डप्रेस शिकत असाल तर तुम्ही या थीम पासून सुरवात करावी असा सल्ला मी तुम्हाला देईल.

हे देखील वाचा : टॉप १० वर्डप्रेस ब्लॉग थीम्स

जर तुम्ही MH Magazine चे प्रीमियम व्हर्जन विकत घेतल्यास त्यात तुम्हाला Google Webfonts, चाईल्ड थीम यासारखे फीचर्स मिळतील.

$49 मध्ये MH Magazine विकत घेण्याकरिता येते क्लिक करा.

मोफत व्हर्जन येथून डाउनलोड करू शकता.

४. Voice

Voice हि सुद्धा माझी एक आवडती वर्डप्रेस थीम आहे. सुरवातीला या ब्लॉगवर तीच थीम मी वापरात होतो. मोबाईल रिस्पोन्सिव्ह असून यात वेगवेगळ्या प्रकारचे १५० पोस्ट लेआऊट आहेत.

तुम्ही यात तुमच्या ब्लॉगचे हेडर, फुटर तुम्हाला हवे तसे बनवू शकता. यात असंख्य संगसंगती उपलब्ध आहेत. Voice २ आधीपेक्षा ३०% अधिक जलद असल्याचा दावा थीम डेव्हलपरकडून करण्यात येतो आहे.

आजवर ६ हजारांपेक्षा जास्त वेळा हि थीम विकली गेलीली आहे. थीमफॉरेस्टवर या टीमला ९.४१ रेटिंग आहे. $69 मध्ये Voice विकत घेण्याकरिता येते क्लिक करा.

ADVERTISEMENT

५. Goodnews

Goodnews हि मी विकत घेतलेली सर्वात पहिली थीम आहे. गेल्या ३-४ वर्षांपासून हि थीम मी वापरत आहे. यात असणारी ऍड मॅनेजमेंट सिस्टीम खूप खूप जास्त चांगली आहे. यासारखी ऍड मॅनेजमेंट सिस्टीम मी अजून कुठल्या दुसऱ्या थीममध्ये पहिली नाहीये.

गुडन्यूज २०११ पासून नियमितपणे अपडेट होत आहे. यात ड्रॅग अँड ड्रॉपच्या मदतीने तुम्ही होमपेज वगैरे सहजच तयार करू शकता. यात साईडबार वगैरे तयार करणे देखील सहज शक्य आहे.

गुडन्यूज वर्डप्रेस थीम WooCommerce सोबत सुसंगत असल्यामुळे तुम्ही यावर तुमचे ई-कॉमर्स स्टोर देखील तयार करू शकता.

ThemeForest वरून $59 मध्ये Goodnews विकत घेण्याकरिता येथे क्लिक करा.

६. Sahifa

Sahifa हि एक साधी सोपी आणि थीमफॉरेस्टवरील बेस्ट सेलर थीम आहे. आजवर १० हजारांपेक्षा जास्त लायसन्स विकले गेले आहेत.

WooCommerce सोबत हि थीम सुसांगत आहे. यात तुम्हाला होमपेज तयार करण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी पेज बिल्डर प्लगिनची आवश्यकता नाही. यात मेगा मेनू, पोस्टमध्ये स्लाईडशो असे सर्व फीचर्स मिळतात.

Sahifa मध्ये तुम्हाला ३६ प्रकारचे विविधे विजेट्स मिळतात. यात तुम्ही ६५० पेक्षा अधिक गुगल फॉन्ट्स वापरू शकता.

$59 मध्ये ThemeForest वरून Sahifa विकत घेण्याकरिता येथे क्लिक करा.

७. ColorMag

ColorMag हि थीम मोफत आणि विकत अशा दोघ पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला जर काही जास्त खर्च करायचा नसल्यास तुम्ही ColorMag चे मोफत व्हर्जन नक्कीच वापरून पाहायला हवे.

यात तुम्हाला फॉन्ट्स किंवा काही विजेट्स हवे असल्यास ColorMag चे प्रीमियम व्हर्जन विकत घ्यावे लागेल.

हे देखील वाचा : वर्डप्रेस की ब्लॉगर?

येथे क्लिक करून तुम्ही ColorMag चे मोफत व्हर्जन डाउनलोड करू शकता. ThemeGrill च्या वेबसाइटवरून तुम्ही $99 मध्ये एका वर्षासाठी अथवा $249 इकडे देऊन आयुष्यभरासाठी विकत घेऊ शकता.

मला स्वतःला व्यक्तिगत आवडणाऱ्या या काही न्यूजपेपर / मॅगझीन स्टाईल वर्डप्रेस थीम्स आहेत. तुमची आवडती थीम जर या यादीत नसेल तर कमेंट करून नक्की सुचवा. ब्लॉग आवडल्यास मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

तुषार भांबरे
Tags: Magazine ThemeNewspaper ThemesWordPressWordPress Themeवर्डप्रेसवर्डप्रेस थीम्स
SendShare99Tweet10
ADVERTISEMENT
Previous Post

आपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची?

Next Post

वर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड कसा बदलायचा?

Tushar Bhambare

Tushar Bhambare

६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.

Related Posts

digital-ocean-wordpress-marathi
वर्डप्रेस

DigitalOcean VPS वापरून ५ मिनिटात तयार करा वर्डप्रेस वेबसाईट

22 June 2020
973
hostinger-wordpress-hosting-review-marathi
वर्डप्रेस

स्वस्त आणि मस्त वर्डप्रेस होस्टिंग : होस्टिंगर

21 June 2020
416
how-to-install-wordpress-on-Namecheap-EasyWP-hosting
वर्डप्रेस

Namecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे?

15 September 2019
359
Next Post
how-to-change-wordpress-password-marathi

वर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड कसा बदलायचा?

Comments 2

  1. Shubham Gote says:
    1 year ago

    आपला ब्लॉग छान बनवला आहे, मला काही टिप्स द्याल का ब्लॉग बद्दल – माझा ब्लॉग https://themarathiblog.com/

    Reply
  2. Amir says:
    11 months ago

    adsense approval kasa ky ghetala marthi blog sathi
    marthi blog varun income hotey kaa
    plz reply

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माझ्याविषयी

Online Tushar

तुषार महेश भांबरे

पत्रकार, ब्लॉगर

नमस्कार,
मी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.




How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

  • how-to-rank-1-on-google-marathi-guindance

    आपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची?

    193 shares
    Share 136 Tweet 24
  • नंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा?

    210 shares
    Share 158 Tweet 22
  • वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा?

    130 shares
    Share 80 Tweet 21
  • गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे?

    185 shares
    Share 143 Tweet 18
  • प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स

    209 shares
    Share 168 Tweet 17

© 2019. Made with ❤️ using WordPress

No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल

© 2019. Made with ❤️ using WordPress