Best WordPress Security Plugins 2023 | आजकाल आपल्यापैकी सर्वांच्याच स्वतःच्या वेबसाईट किंवा ब्लॉग असतील. यापैकी बहुसंख्य लोकांच्या वेबसाईट या वर्डप्रेसवर असतील. कारण वर्डप्रेस हा जगात सर्वाधिक लोकप्रिय असा CMS आहे. वेबसाईट तयार केल्यावर आपण नकळतपणे वेबसाईटच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत असतो. जगभरातील ४.१ मिलियन वेबसाईटवर मालवेअर असल्याचे साईटलॉकच्या रिपोर्टद्वारे समोर आले आहे. वेबसाईट हॅक झाल्यामुळे पैसा, वेळ आणि त्यापेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे डेटाच नुकसान होत. वेबसाईट सुरु करणे सोपं असलं तरी त्याची सुरक्षितता देखील त्याहून जास्त महत्त्वाची आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण टॉप वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स विषयी जाणून घेऊ.
वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स का वापरावेत?
एका सर्व्हेनुसार एका आठवड्यात १८.५ दशलक्ष वेबसाईट्सवर मालवेअर हल्ले होतात. सरासरी एका वेबसाईटवर दिवसभरात ४४ वेळा व्हायरसचा हल्ला होतो. वेबसाईट हॅक झाल्यास ती रिकव्हर करण्यासाठी शक्यतो प्रोफेशनल सर्व्हिस घ्यावीच लागते. त्याचे चार्जेस जर तुम्हाला परवडणार नसतील तर ते तुम्हाला शक्य होणार नाही. यासाठी वेबसाईट हॅक होण्याआधीच काळजी घेणे कधीही उत्तम.
आता आपण वर्डप्रेस वेबसाईटच्या सेक्युरिटीसाठी वेबसाईटवर असायलाच हवे अशा प्लगिन्सविषयी जाणून घेऊ. परंतु एक लक्षात ठेवा एका वेळी खालीलपैकी कोणतेही एकच प्लगिन ऍक्टिव्ह करा.
१. Anti-Malware Security and Brute-Force Firewall
Anti-Malware Security and Brute-Force Firewall हा एक प्रकारचा वर्डप्रेस अँटीव्हायरस आहे. जर तुमच्या वेबसाईटवर मालवेअर असल्यास याच्या ऑटोमॅटिक स्कॅनरच्या मदतीने तुम्ही त्या स्क्रिप्ट डिलीट करू शकतात. यात इतर प्लगिनसारखे भरमसाठ फीचर्स नसून फक्त अतिशय पावरफुल मालवेअर स्कॅनर आहे. मी स्वतः अनेकदा या प्लगिनच्या मदतीने हॅक झालेल्या वेबसाईट रिकव्हर केल्या आहेत.
२. All In One WP Security & Firewall
All In One WP Security & Firewall हे एक मोफत व प्रसिद्ध सेक्युरिटी वर्डप्रेस प्लगिन आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे प्लगिन वापरायला अतिशय सोपे आहे यासाठी तुम्हाला तांत्रिक माहिती असण्याची आवश्यकता नाही.
या प्लगिनच्या मदतीने तुम्ही लॉगिन पेजचे नाव, URL यात सहजपणे बदल करू शकता. Brute Force Attack, Login Captcha, Database Security, Database Backup, Firewall यासारख्या अनेक आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे प्लगिन पूर्णपणे मोफत आहे.
३. Wordfence Security
Wordfence Security हे एक विश्वासार्ह्य आणि सर्वसमावेशक वर्डप्रेस सुरक्षा प्लगिन आहे. याच्या मोफत पर्यायांमध्ये देखील अनेक महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध आहेत. यातील ऑटोस्कॅन सारख्या सुविधा फार उपयोगी आहेत.
यात Brute Force Attack, लॉगिन पेज सुरक्षा, 2-factor Authentication यासारख्या अनेक सुविधा आहेत. एखाद्या IP वरून खूप वेळा चुकीचा पासवर्ड अथवा युजरनेम टाकण्याचा प्रयत्न झाल्यास Wordfence Security आपोआप तो IP ब्लॉक करते. परंतु यातील firewall आपल्यास सर्व्हरवरून काम करत असल्याने फार उपयोगी ठरत नाही.
४. iThemes Security
iThemes Security हे आधी Better WP Security या नावाने ओळखले जात होते. मोफत व विकत अशा दोघे पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या प्लगिनचा इंटरफेस अतिशय सुटसुटीत व सोपा आहे.
iThemes मध्ये फायरवॉल उपलब्ध नाहीये. याच्या विकत असणाऱ्या पर्यायामध्ये अनेक चांगले ऑप्शन्स आहेत. यात तुम्हाला वर्डप्रेसच्या कोर फाईल्स आणि त्यातील बदल देखील पाहता येतील. ठराविक कालावधीने युजर पासवर्ड बदलण्याची सोय देखील यात आहे.
५. Sucuri Security
Sucuri Security हे मोफत आणि विकत अशा दोन्ही पर्यायात उपलब्ध असले तरी याचे विकत असणारे व्हर्जनच कामाचे आहे. Sucuri ची सपोर्ट टीम अतिशय जलद आहे.
याच्या मोफत व्हर्जनमध्ये वेबसाईट मालवेअर स्कॅनिंग, सर्च इंजिन ब्लॉकिंग यासारखे फार उपयोगी फीचर्स आहेत. जर तुम्ही विकत व्हर्जन घेऊ शकत असाल तर Sucuri Security हि नक्कीच एक चांगली सर्व्हिस आहे.
६. Jetpack
वर्डप्रेस वापरणाऱ्या प्रत्येकाने जेटपॅक हे नाव ऐकलेच असेल. Automattic या कंपनीने जेटपॅक प्लगिन बनवले आहे. हे प्लगिन पूर्णपणे सुरक्षा प्लगिन नसले तरी यातील काही फीचर्स सुरक्षततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत.
एखाद्या संशयित IP वरून लॉगिन करण्याचा प्रयन्त होत असल्यास जेटपॅक आपोआप तो IP ब्लॉक करतो. तसेच वेबसाईट बंद झाल्यास त्याची ई-मेलद्वारे सूचना देण्यात येते. वेबसाईट लोडींग स्पीड, इमेज CDN यासारखे अनेक उपयोगी फीचर्स मोफत पर्यायासोबत उपलब्ध आहेत.
जेटपॅकचे फ्री व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच त्यांचे पेड प्लॅन्स जाणून घ्यायचे असल्यास येथे क्लिक करा.
यात तुमच्या आवडीचे काही प्लगिन जोडायचे असल्यास कमेंट करा. ब्लॉग कसा वाटलं हे नक्की सांगा तसेच आवडल्यास मित्रांसोबत शेअर करा.
तुषार भांबरे.
Mast website banvili Rav
Pan Kay Marathi madhe articles read karayla organic traffic yeto?
Majh pan vichaar AAHE ek new Marathi language madhe website banvaychi.
Tumcha margdarshan havay. Karan mi pahilayndanch eka Marathi website baghitla.
हो येतो… मराठी ऑनलाईन वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्या मराठी वेबसाईटसाठी शुभेच्छा…! काहीही मदत हवी असल्यास मेसेज करा. धन्यवाद!
नमस्कार सर मला वर्डप्रेस बद्दल टाकलेली माहिती फार आवडली आहे, सर मला स्वतःला एक वेबसाईट तयार करायची आहे पण ती सुरक्षित राहणे गरजेचे आहे,तसेच त्या वेबसाईटवर मला स्वतःला इमेज अपलोड करणे व व्हिडीओ अपलोड करणे ऑनलाईन टेस्ट टाकणे बदल करणे, वेबसाईट ची डिजाईन तयार करणे ई-मेल जोडणं वेबसाईटवर वेगवेगळे page तयार करणे सर php व वर्डप्रेस कसे शिकायचे याबद्दल आपल्याकडे मराठी भाषा मध्ये pdf स्वरूपात माहिती असेल तर पाठव सर आपणास विनंती आहे
प्रवीणजी धन्यवाद! सध्या तरी मी अशी PDF तयार केली नाहीये. पण विचार सुरु आहे. तयार केल्यावर नक्की पाठवेल.
अतिशय उत्तम माहिती आणि ती सुद्धा मराठी मध्ये वा
एक मदत हवी होती मला वर्डप्रेस थिम बनवायची कशी तेही प्रोफेशनल आणि ती themeforest वर कशी विकायची याची माहिती हवी आहे