वापरायला हवेच असे १० वर्डप्रेस प्लगिन्स
वर्डप्रेससाठी लाखो प्लगिन्स आणि थीम्स उपलब्ध असल्यामुळेच वर्डप्रेस इतकं झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या प्लगिन्सच्या मदतीने आपल्याला वेबसाईट अधिक पॉवरफुल करता येते. वर्डप्रेसच्या अधिकृत लिस्टिंमध्ये जवळपास ५० हजारांहून अधिक प्लगिन्स उपलब्ध आहेत. अनेकांचे उपयोग सारखेच आहेत. आजच्या ब्लॉगमध्ये आपण यातील टॉप १० असे प्लगिन्स पाहणार आहोत जे सर्वांना उपयोगात येतील. वर्डप्रेसवर प्लगिन कसे इन्स्टॉल करावे हे जाणून…
वर्डप्रेससाठी लाखो प्लगिन्स आणि थीम्स उपलब्ध असल्यामुळेच वर्डप्रेस इतकं झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या प्लगिन्सच्या मदतीने आपल्याला वेबसाईट अधिक पॉवरफुल करता येते. वर्डप्रेसच्या अधिकृत लिस्टिंमध्ये जवळपास ५० हजारांहून अधिक प्लगिन्स उपलब्ध आहेत. अनेकांचे उपयोग सारखेच आहेत. आजच्या ब्लॉगमध्ये आपण यातील टॉप १० असे प्लगिन्स पाहणार आहोत जे सर्वांना उपयोगात येतील.
वर्डप्रेसवर प्लगिन कसे इन्स्टॉल करावे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
१. जेटपॅक (Jetpack)
ऑटोमॅटिक कंपनीचे हे प्लगिन असून याचे अनेक फायदे आहेत. या प्लगिनच्या मदतीने तुम्ही तुमच्या वेबसाईटचे वाचक (Website Statistics) पाहू शकता. यातील साईट एक्सलेटरद्वारे तुमच्या वेबसाईटचा लोड टाइम कमी करण्यास मदत होते. लेझी इमेजमुळे साईटवरील प्रतिमा लवकर लोड होतात. तसेच यात अनेक सेक्युरिटी ऑप्शन्स आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही तुमची वेबसाईट सुरक्षित करू शकता.
जेटपॅक प्लगिन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
२. योस्ट एसईओ (Yoast SEO)
योस्ट एसईओ हे सर्वात महत्त्वाचे प्लगिन आहे. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) साठी या प्लगिनची फार मदत होते. यात किवर्ड सेट करण्यापासून आपली ब्लॉग पोस्ट किती रिडेबल आहे हे याद्वारे तपासता येते. यात वेळोवेळी देण्यात येणाऱ्या टीप्स फार उपयोगी असतात. साईटमॅप, फेसबुक पोस्ट प्रिव्हू यासारखे अनेक महत्त्वाचे फीचर्स यात आहे. या प्लगिनचे फ्री व पेड असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
योस्ट एसईओ प्लगिन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
३. अकीसमीत (Akismet)
अकीसमीतच्या मदतीने वेबसाईटवर येणाऱ्या स्पॅम कमेंट आपोआप ब्लॉक करता येतात. याचा हा एकच उपयोग असला तरी तो फार उपयोगी आहे. सॅम कमेंट्समुळे आपल्या SEO वर देखील निगेटिव्ह प्रभाव पडू शकतो.
अकीसमीत प्लगिन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
४. डब्लूपी सुपर कॅशे (WP Super Cache)
तुमच्या वेबसाईटचा स्पीड फार महत्त्वाचा असतो. डब्लूपी सुपर कॅशे तुमच्या डायनॅमिक वर्डप्रेस साईटवरून स्टॅटिक HTML फाइल्स तयार करते. यामुळे वेब सर्व्हर स्लो PHP स्क्रिप्ट्सऐवजी त्या फाइलचा वापर करेल. याच्या मदतीने तुमच्या वेबसाईटचा स्पीड वाढेल.
डब्लूपी सुपर कॅशे प्लगिन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
५. स्मूश इमेज कॉम्प्रेशन अँड ऑप्टिमायझेशन (Smush Image Compression and Optimization)
बऱ्याचदा इमेजेसमुळे वेबसाईटचा स्पीड कमी होत असतो. या प्लगिनच्या मदतीने तुमच्या ब्लॉगवरील नव्या व जुन्या इमेजेस मोफत ऑप्टिमाइज करू शकता. इमेजेस ऑप्टिमाइझ नसतील तर विनाकारण आपल्या होस्टींगवर देखील अनावश्यक लोड येत असतो.
स्मूश इमेज कॉम्प्रेशन अँड ऑप्टिमायझेशन प्लगिन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
६. वर्डफेन्स सेक्युरिटी (WordFence Security)
वेबसाईट सुरक्षा हि फार महत्त्वाची आहे. वर्डफेन्स सेक्युरिटी हे प्लगिन मोफत व विकत अशा दोघे पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या प्लगिनच्या मदतीने व्हायरस व मालवेअर स्कॅनींग, लॉगिन लिमिट करता येते. छोट्या वेबसाईट व ब्लॉगसाठी वर्डफेन्स सेक्युरिटी प्लगिनचे मोफत व्हर्जन देखील पुरेसे आहे.
वर्डफेन्स सेक्युरिटी प्लगिन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
७. रियली सिम्पल एसएसएल (Really Simple SSL)
आता प्रत्यके वेबसाईटसाठी एसएसएल सक्तीचे झाले आहे. यामुळे प्रत्येक http:// युआरएल https:// ला आपोआप रिडायरेक्ट होईल. यात तुम्हाला कोणतीही सेटिंग करण्याची गरज नाही. याचा फक्त इतकाच उपयोग असला तरी हे फार अत्यावश्यक प्लगिन आहे.
रियली सिम्पल एसएसएल प्लगिन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
८. टेबलप्रेस (TablePress)
टेबलप्रेसच्या मदतीने कोडिंग न वापरता तुम्ही अतिशय सोप्या रीतीने टेबल्स तयार करू शकता. यातील शॉर्टकोडच्या मदतीने जिथे हवे तिथे टेबल टाकणे शक्य होते. यात तुम्ही एक्सल, सीएसव्ही टेबल्स इम्पोर्ट करू शकता.
टेबलप्रेस प्लगिन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
९. इझी गुगल फॉन्ट्स (Easy Google Fonts)
कोणतीही कोडींग न करता हवा तो गुगल फॉन्ट वापरण्यासाठी हे एक उपयुक्त प्लगिन आहे. हे एक मोफत प्लगिन आहे.
इझी गुगल फॉन्ट्स प्लगिन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
१०. डब्लूपी मेल एसएमटीपी (WP Mail SMTP)
मेल पाठवण्यासाठी वर्डप्रेस पीएचपी मेल फंक्शनचा वापर करते. परंतु बऱ्याचदा अनेक होस्टिंग कंपनी याला ब्लॉक करून ठेवतात. त्यामुळे अनेक महत्त्वाचे मेल आपल्याला मिळत नाहीत. यासाठीच डब्लूपी मेल एसएमटीपी हे एक अत्यावश्यक प्लगिन आहे.
डब्लूपी मेल एसएमटीपी प्लगिन डाउनलोड करणाऱ्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हाला या लिस्टमध्ये अजून काही प्लगिन्स सुचवायचे असल्यास नक्की कमेंट करा.