गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे?
नुकतेच गुगलने मराठी वेबसाईटसाठी देखील ऍडसेन्सची परवानगी देणे सुरु केले आहे. यामुळे मराठी ब्लॉगर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण गुगल ऍडसेन्स हा ब्लॉगर्स आणि पब्लिशर्ससाठी एक हक्काचा इन्कम सोर्स आहे. गुगल ऍडसेन्सला अनेक पर्याय उपलब्ध असले तरी त्याच्याइतके चांगले पैसे दुसऱ्या पर्यायातून मिळत नाही. काही ब्लॉगर्स असेही आहेत कि ते ऍडसेन्सच्या माध्यमातून महिन्याला लाखो कमवितात. ऍडसेन्सच्या…
नुकतेच गुगलने मराठी वेबसाईटसाठी देखील ऍडसेन्सची परवानगी देणे सुरु केले आहे. यामुळे मराठी ब्लॉगर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण गुगल ऍडसेन्स हा ब्लॉगर्स आणि पब्लिशर्ससाठी एक हक्काचा इन्कम सोर्स आहे.
गुगल ऍडसेन्सला अनेक पर्याय उपलब्ध असले तरी त्याच्याइतके चांगले पैसे दुसऱ्या पर्यायातून मिळत नाही. काही ब्लॉगर्स असेही आहेत कि ते ऍडसेन्सच्या माध्यमातून महिन्याला लाखो कमवितात. ऍडसेन्सच्या माध्यमातून लाखोंची कमाई करणाऱ्या हर्ष अग्रवाल या ब्लॉगर विषयी तुम्ही येथे क्लिक करून माहिती घेऊ शकता.
आजच्या ब्लॉगमध्ये आपण गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे? हे सध्या सोप्या भाषेत जाणून घेऊ.
गुगल ऍडसेन्स म्हणजे नेमकं काय?
गुगलने २००३ साली ऍडसेन्स हि सेवा सुरु केली होती. ज्याच्या मदतीने ब्लॉगर, वेबसाईट मालक आपल्या वेबसाईटवर जाहिराती दाखवून पैसे कमावू शकता.
आपण अनेकदा काही वेबसाईट्सला भेट देतो तेव्हा आपल्याला काही जाहिराती दिसतात. त्या जाहिराती गुगलकडून देण्यात येतात. या जाहिराती आपण पाहिल्यावर अथवा यावर क्लिक केल्यावर यांचे पैसे त्या वेबसाईटच्या मालकाला भेटत असतात.
गुगल आपल्याला ट्रॅक करत असल्याने आपल्याला काय हवं काय नको हे त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टींची आवड आहे त्याच्याच जाहिराती आपल्याला दिसतात. त्यामुळे यावर क्लिक करण्याचे प्रमाण इतर जाहिरातींपेक्षा जास्त असते. यामुळेच गुगल ऍडसेन्समधून ब्लॉगर्सला सर्वाधिक पैसा मिळतो.
गुगल ऍडसेन्स अकाउंट कोणाला मिळू शकते?
जर तुमची एखादी वेबसाईट किंवा ब्लॉग असेल तर तुम्ही गुगल ऍडसेन्स अकाउंटसाठी अर्ज करू शकता. फक्त एक लक्षात तेव्हा तुमच्या साईटवरील ब्लॉग्स हे तुम्ही स्वतः लिहलेले असायला हवेत. जर तुमच्या वेबसाईटवरील माहिती कॉपी पेस्ट असले तर तुम्हाला ऍडसेन्स अकाउंट मिळणार नाही.
तुमच्या वेबसाईटचा लेआऊट हा सर्वाना कळेल असा साधा सोपा हवा. याविषयी तुम्ही येथे क्लिक करून गुगल ऍडसेन्स मदत केंद्रावर सविस्तर जाणून घेऊ शकता. तसेच तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईट Adsense प्रोग्राम धोरणे व अटी आणि नियम यांची पूर्तता करत असल्याची खात्री करून घ्या.
Adsense साठी अर्ज करतांना तुम्ही वयाची १८ वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. १८ वर्ष पूर्ण नसल्यास तुम्ही तुमच्या पालकांच्या नावाने अकाउंट उघडू शकता.
जर तुमच्याकडे वेबसाईट किंवा ब्लॉग नसेल तर तुम्ही तुमच्या युट्युब चॅनेलसाठी देखील गुगल ऍडसेन्स अकाउंट मिळवू शकता. युट्युब चॅनेलसाठी थोडे वेगळे नियम आहेत.
Google Adsense अकाउंटसाठी अर्ज कसा करायचा?
गुगल ऍडसेन्ससाठी अर्ज करण्याअगोदर तुमच्याकडे एक जीमेलचा ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
१. https://www.google.com/adsense/start या वेबसाईट जाऊन करून Sign up now वर क्लिक करा.
२. Sign up now वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल. त्यात तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाईटचा URL व तुमचा ई-मेल आयडी नोंदवा.
३. पुढील स्टेपमध्ये तुमच्या देशाचे नाव निवडून गुगल ऍडसेंच्या नियम आणि अटी मान्य करा.
४. यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल. त्यात तुमचा पत्ता बरोबर असल्याची खात्री करून घ्या. कारण नंतर या पत्त्यावर व्हेरिफिकेशनसाठी गुगलतर्फे एक पत्र पाठवण्यात येईल.
५. आता तुमच्या वेबसाईटला गुगल ऍडसेन्स जोडण्यासाठी तुमच्यासमोर एक कोड दिसेल. तो तुम्हाला तुमच्या वेबसाईटच्या <head> भागात अपलोड करावा लागेल. यासाठी एकतर तुमच्या थीममध्ये यासाठी सुविधा असेल अन्यथा तुम्ही यासाठी एखादे प्लगइन देखील वापरू शकता.
६. गुगल ऍडसेन्स कोड तुमच्या वेबसाईटच्या हेडरमध्ये यशस्वीरित्या अपलोड केल्यावर तुम्हाला The code was fount असा संदेश दिसेल.
७. यानंतर गुगलतर्फे तुमच्या वेबसाईटची पडताळणी करण्यात येते. जर त्यांना सर्व योग्य वाटले तर तुमचे ऍडसेन्स अकाउंट सुरु होते. हे सर्व बऱ्याचदा २४ तासात पूर्ण होते परंतु काही वेळा याला २ आठवड्यांपर्यन्तचा वेळ लागू शकतो.
तुमचे ऍडसेन्स अकाउंट सुरु झाल्यावर तुम्हाला गुगलकडून एक मेल मिळेल. यानंतर तुम्ही ऍडसेन्स कोड तुमच्या वेबसाईटवर लावू शकता.
फक्त एक लक्षात ठेवा गुगल Adsense अकाउंट सुरु झाल्यावर जास्त पैसे उद्देशाने स्वतःच्या ब्लॉगवरील जाहिरातींवर स्वतःच क्लिक करू नका. असं केल्याने काही तसातच गुगल तुमची वेबसाईटवरील जाहिराती बंद करेल. भविष्यात तुम्ही गुगलच्या नियम व अटींचा भंग करत असल्याचे गुगलच्या लक्षात येताच तुमच्या ब्लॉगवरील जाहिरात कधीही बंद होऊ शकता.
जर तुम्हाला Earnings at risk – You need to fix some ads.txt file issues to avoid severe impact to your revenue. असा मेसेज दिसत असेल तर Fix now वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ads.txt डाउनलोड करण्याचा मेसेज दिसेल. ती फाईल डाउनलोड करून तुमच्या होस्टिंगच्या होम डीरेक्टरीत अपलोड करा.
काही दिवसानंतर तुम्हाला Identity Verification साठी एक मेसेज दिसेल. यावेळी तुम्हाला तुमचे एखादे सरकारी ओळखपत्र अपलोड करावे लागेल. यासाठी आधार कार्ड चालत नाही. पॅन कार्ड चालत असल्याचे गुगल सांगत असेल तरी पॅन कार्डमुळे माझे व्हेरिफिकेशन अनेकदा अपयशी झाले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स अथवा पासपोर्ट वापरून तुमचे आयडेंटी व्हेरिफिकेशन करून घ्या. आयडेंटी व्हेरिफिकेशन नंतर तुम्ही दिलेल्या पत्यावर गुगलतर्फे एक पिन पाठवण्यात येईल. तो टाकून तुमचे ऍडसेन्स अकाउंट पूर्णपणे ऍक्टिव्ह होईल.
जाहिराती तर सुरु झाल्या आता पैसे केव्हा मिळतील?
व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर पेमेंट मिळण्यासाठी तुम्हाला १०० अमेरिकन डॉलर ऍडसेन्सला जमा असणे आवश्यक आहे. १०० USD जमा झाल्यावर पुढील महिन्याचा २१ तारखेला गुगलतर्फे तुमच्या बँक अकाउंटला पैसे पाठवण्यात येतील. साधारपणे २-३ दिवसानंतर ते आपल्या स्टेटमेंटमध्ये दिसतात. २४-२५ तारखेपर्यन्त पैसे दिसत नसल्यास बँकेत संपर्क साधा.
इंटरनेटवर Google Adsense अकाउंट लवकर मिळवण्यासाठी अनेक युक्त्या दिलेल्या आहेत. परंतु यांचा वापर करू नये. या केवळ काही वेळेसाठीच काम करतात. गुगलच्या लक्षात आल्यावर लगेच तुमचं अकाउंट ब्लॉक होऊ शकते.
अशा पद्धतीने तुम्ही केवळ ५ मिनिटात गुगल ऍडसेन्स अकाउंटसाठी अर्ज करू शकता. आशा आहे कि तुम्हाला या ब्लॉगचा नक्की फायदा होईल. यानंतरही तुमच्या काही शंका असल्यास कमेंट करून विचारू शकता. ब्लॉग आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा.
तुषार भांबरे
atishay chhan mahiti ahe aani samjel ashi information ahe.
धन्यवाद दीपकदादा…!
धन्यवाद! सर खूप उपयुक्त माहिती दिली आहे तुम्ही. माझी सुद्धा एक वेबसाईट आहे. गूगल Adsense ला कधी अर्ज करू.
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
सर माझा एक samavesgitshikshan.blogspot.com हा ब्लॉग आहे. मी अडसेन्स साठी अपलाय करू शकतो का?
धन्यवाद तुषार सर. मी नवीनच सुरुवात केली आहे आणि तंत्राद्यानाविषयी लिहितो. गुगल ऍडसेन्स साठी मला apply करता येईल का? वेबसाईट http://www.alotmarathi.com
खुप चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे, छान सर माझी एक वेबसाइट आहे http://www.directmarathi.com तर या वेबसाइट साठी adsense साठी कधी apply करू ?
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
सर माझा http://www.marathikaushalya.in हा ब्लॉग आहे.
खुप छान माहिती दिली तुशार भाऊ…
ब्लॉगिंग आणि SEO शिकण्याची इच्छा असनार्यांनी online tushar ब्लॉग वाचायला हवा…
खूप छान सर, गुगल ऍडसेन्स बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे… धन्यवाद
छान माहिती दिली सर धन्यवाद
खुप छान सविस्तर माहिती दिली आहे तुशार Sir…. धन्यवाद