नंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा?

व्हाटसॲप वापरत नाही किंवा माहित नाही असा या जगात शोधून सापडणार नाही. ‘व्हाटसॲप कर’ हा शब्द आता इतक्या सहजपणे वापरला जातो कि एसएमएसची आठवण पण येत नाही. आजकाल व्हाटसॲपवर काय होत नाही हा एक मोठा प्रश्न आहे. चॅटिंग, ऑडिओ/व्हिडीओ कॉल, पेमेंट पाठवणे इथपासून व्हाटसॲप ग्रुपमध्ये लग्न जोडण्यापर्यंत व्हाटसॲपने मजल मारली आहे.

रोजच्या कामांमध्ये अनेकदा एखाद्या नवीन व्यक्तीला आपल्याला एकदाच मेसेज करायचा असतो. पण त्यासाठी आधी त्याचा नंबर फोनबुकमध्ये सेव्ह करावा लागतो. यानंतर त्याचा नंबर व्हाटसॲपवर आल्यावर आपण त्याला मेसेज करू शकत होतो. परंतु एखाद्याला केवळ एकदाच मेसेज करायचा असल्यास हि पद्धत डोकेदुखीची ठरत होती. यामुळे अनेकदा अनावश्यक कॉन्टॅक्टस फोनबुकमध्ये सेव्ह लागतात. आजच्या ब्लॉगमध्ये आपण नंबर सेव्ह न करता समोरच्याला व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा हे जाणून घेणार आहोत.

१. तुमच्या मोबाईलमधील ब्राउझर उघडा. जसे की गुगल क्रोम, सफारी…

२. यात https://wa.me/<number> अशी लिंक तयार करा. <number> च्या जागी तुम्हाला ज्याला मेसेज करायचा आहे त्याचा नंबर टाकावा. नंबर इंटरनॅशल फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक आहे.

असा असावा : https://wa.me/91987654321

असा नसावा : https://wa.me/987654321 किंवा https://wa.me/+91-987654321

3. हि लिंक उघडल्यावर तुमच्यासमोर खालील स्क्रिनशॉटप्रमाणे स्क्रिन उघडेल. यात Open this page in WhatsApp? असा मेसेज दिसेल . यानंतर Open वर क्लिक केल्यावर तुमच्या व्हाटसॲपमध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या नंबरची चॅट उघडेल. यानंतर तुम्हाला हवा तो मेसेज पाठवा आणि चॅट सुरु करा.

याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही व्हाटसॲपच्या अधिकृत ब्लॉगला येथे क्लिक करून भेट देऊ शकता.

अशा प्रकारे तुम्ही समोरच्याचा नंबर सेव्ह न करता त्याच्याशी व्हाटसॲपवर चॅट करू शकता. यासाठी प्ले स्टोरवर अनेक ॲपस् देखील उपलब्ध आहेत परंतु त्याचा वापर करणे टाळावे. यानंतरही काही शंका असल्यास कमेंट करा. ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद!

तुषार भांबरे

6 Comments

  1. वाह उपयुक्त माहिती, हे कधीच ऐकलं नव्हतं

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या पोस्ट

Related Stories