जीमेल अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे?

ई-मेल म्हंटल कि जीमेल असं समीकरणच झालंय. आपल्यातील जवळपास सर्वांचेच ईमेल आयडी हे गुगलचेच म्हणजेच जीमेलवर असतील. ऑनलाईन कुठं हि अकाउंट उघडवायचं असेल तर ईमेल आयडी लागतोच. अँड्रॉइड स्मार्टफोन्समुळे आपले कॉन्टॅक्ट, पासवर्डस सर्वच जीमेलला सेव्ह होत असतात. बँकिंग असो की ई-कॉमर्स वेबसाईट सर्वीकडे आपण आपला ई-मेल आयडी रजिस्टर केलेला असतो, याचमुळे आपले जीमेल अकाउंट सुरक्षित करणे फार महत्त्वाचे आहे.

आजच्या लेखात आपण जीमेल अकाउंट अधिक सुरक्षित कसे करावे? याविषयी जाणून घेऊ.

१. २ स्टेप व्हेरिफिकेशन

google-2-step-verification-voice-or-text-message

गुगलसह अनेक वेबसाईट्सवर २ स्टेप व्हेरिफिकेशन सेटिंग खूप जुनी असली तरी अनेकांना अजूनही याविषयी माहिती नाही. २ स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही लॉगिन करता तेव्हा पासवर्ड बरोबर असल्यावर देखील दर वेळी तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे OTP (One Time Password) येईल. तो बरोबर टाकल्याशिवाय लॉगिन करता येणार नाही.

२ स्टेप व्हेरिफिकेशन कसे सुरु करावे?

हे सुरु करण्यासाठी https://myaccount.google.com या लिंकवर क्लिक करा. Sign-in & Security टॅबमधील Signing in to Google वर क्लिक करा. यानंतर Voice or text message यात जाऊन मोबाईल नंबर व्हेरिफाय करावा.

google-2-step-verification-process

अथवा http://accounts.google.com/SmsAuthConfig या लिंकवर जाऊन देखील २ स्टेप व्हेरिफिकेशन सुरु करता येईल.

२. गुगल ऑथेंटिकेटर ॲप

google-authenticator-app

हा एक २ स्टेप व्हेरिफिकेशनचाच प्रकार असून यात एसएमएसद्वारे ओटीपी न येता तो ऍपमध्ये येतो. परंतु यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन सुरु असणे आवश्यक आहे.

गुगल ऑथेंटिकेटर ॲप कसे सुरु करावे?

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अँड्रॉइड मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोर अथवा ॲपल मोबाईलमध्ये ॲप स्टोरमधून  गुगल ऑथेंटिकेटर ॲप डाउनलोड करावे लागेल. यानंतर २ स्टेप व्हेरिफिकेशन प्रमाणेच https://myaccount.google.com या लिंकवर जाऊन Authenticator app वर क्लिक करावे. यानंतर डाउनलोड केलेल्या गुगल ऑथेंटिकेटर अॅपमधून समोर दिसणारा क्युआर कॉड स्कॅन करावा.

अनेकदा घाई असताना या सर्व्हिसेस थोड्या कटकटीच्या वाटतात. परंतु आपल्या गुगल अकाउंटच्या सुरक्षितेसाठी या अत्यावश्यक आहे.

या लेखाविषयी तुमच्या काही शंका अथवा सूचना असल्यास खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. ब्लॉग आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.धन्यवाद!

तुषार भांबरे
आवडल्यास नक्की शेअर करा:

६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.

Leave a Comment