मोफत बिझनेस ई-मेल आयडी कसा तयार करावा?
ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी ई-मेल हा सर्वात स्वस्त आणि प्रचलित मार्ग आहे. परंतु अनेकदा फेक ई-मेलमुळे फसवणूक झाल्याच्या घटना देखील अधूनमधून घडत असतात. तुमचा जर व्यवसाय असेल तर त्यासाठी बिजनेस ई-मेल आयडी वापरणं अधिक सुरक्षित आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मनात विश्वासार्ह्यता निर्माण होण्यास मदत होते. यासाठी खूप खर्च येत नाही तुम्हाला केवळ एक डोमेन नेम विकत घेणे…
ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी ई-मेल हा सर्वात स्वस्त आणि प्रचलित मार्ग आहे. परंतु अनेकदा फेक ई-मेलमुळे फसवणूक झाल्याच्या घटना देखील अधूनमधून घडत असतात. तुमचा जर व्यवसाय असेल तर त्यासाठी बिजनेस ई-मेल आयडी वापरणं अधिक सुरक्षित आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मनात विश्वासार्ह्यता निर्माण होण्यास मदत होते. यासाठी खूप खर्च येत नाही तुम्हाला केवळ एक डोमेन नेम विकत घेणे आवश्यक आहे.
बिझनेस ई-मेल आयडी म्हणजे काय? आणि ते का महत्त्वाचे आहे?
बिझनेस ई-मेल आयडी म्हणजे @gmail.com, @yahoo.com असे न वापरता तुमच्या कंपनीचे डोमेन (yourdomain.com) आणि तुमचे नाव (username) वापरुन [email protected] असा ई-मेल तयार करता येतो. यामुळे आपल्या व्यवसायाची ब्रॅंड इमेज तयार करण्यास मदत होते. यामुळे ग्राहकांच्या मनात आपल्या व्यवसायाबद्दल विश्वासाची भावना तयार होते. तसेच यासाठी विशेष असा कोणताच खर्च नसून केवळ ५ मिनिटात मोफत बिझनेस ई-मेल आयडी तयार करणे शक्य आहे.
बिझनेस ई-मेल आयडी कसा तयार करायचा?
अनेक वेब होस्टिंग कंपन्या वार्षिक होस्टिंग घेतल्यास त्यासोबत मोफत बिझनेस ई-मेल आयडी देतात. तुमची खर्च करण्याची तयारी असल्यास तुम्ही G Suite च्या मदतीने गुगलकडून बिझनेस ई-मेल आयडी घेऊ शकता. यात एका युजरसाठी वार्षिक १,५०० रुपये खर्च येतो. G Suite विषयी अधिक महितीसाठी येथे क्लिक करा. तसेच पहिल्या वर्षी २०% डिस्काउंट हवे असल्यास मेसेज करा. मी तुम्हाला कुपन कोड देईल. परंतु तुम्हाला खर्च करायचा नसल्यास Zoho Mail कडून मोफत घेता येईल.
Zoho वरून बिझनेस ई-मेल कसा तयार करावा?
१. Zoho Mail वर अकाऊंट ओपन करा
mail.zoho.in या वेबसाइटला भेट द्या. तेथील Sign Up Now या पर्यायावर क्लिक करा. पुढील पेजवर तुम्हाला काही पेड प्लॅन्स दिसतील. त्या खाली Free Plan असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
तुम्ही जे डोमेन विकत घेतले असेल ते टाका आणि तुम्ही इतर माहिती भरा. तुमच्या मोबाइल नंबरवर एक व्हेरिफिकेशन कोड येईल. त्याच्या मदतीने तुमचे अकाऊंट व्हेरिफाय करा.
२. डोमेन व्हेरिफाय करा
या स्टेपमध्ये आपल्याला आपले डोमेन व्हेरिफाय करावे लागेल. तुम्ही डोमेन कुठून घेतले आहे यानुसार पुढील स्टेप वेगवेगळ्या असू शकतात. एक उदाहरण म्हणून cPanel वरील डोमेन कसे व्हेरिफाय करावे हे पाहू.
डोमेन व्हेरिफाय करण्यासाठी CNAME Method वर क्लिक करा व तुमच्या डोमेनचे cPanel लॉगिन करा. त्यात DNS किंवा Zone Editor असा पर्याय असेल. त्यात Zoho चे CNAME रेकॉर्ड टाकून डोमेन व्हेरिफाय करा. यानंतर स्क्रीनवर दिसणार्या पर्यायांद्वारे तुम्हाला हवे ते युजर तयार करा.
३. MX रेकॉर्डस्
ई-मेल पाठवण्यासाठी अथवा मिळवण्यासाठी MX Records अपडेट असणे आवश्यक आहे. यासाठी आधीच्या पद्धतीप्रमाणे cPanel मध्ये जाऊन Zoho चे एमएक्स रेकॉर्ड अपडेट करा.
यानंतर SPF व DKIM रेकॉर्ड अपडेट करा. हे आवश्यक नसले तरी यामुळे तुमचे मेल स्पॅममध्ये जाण्याची शक्यता कमी होते. याच्याविषयी अजून अधिक माहितीसाठी तुम्ही Zoho चा ब्लॉग येथे क्लिक करून वाचू शकता. अशा प्रकारे तुम्ही Zoho Mail च्या मदतीने मोफत बिझनेस ई-मेल आयडी बनवू शकता.
ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद!
तुषार भांबरे.
Hi
तुषार महेश भांबरे !
you are amazing bro, seen your blog, and its really great you share your thoughts and knowledge in your own people language its a big thing. keep it up.
Thank you Sonu