व्हाटसॲपवर कलरफुल फॉन्ट कसे वापरावे?

व्हाटसॲपवर कलरफुल फॉन्ट कसे वापरावे? । मराठी टेक ब्लॉग

व्हाटसॲपवर टेक्स्ट फॉर्मेटींग (WhatsApp Text Formating) अर्थात अक्षर *बोल्ड* / _इटालिक_ / ~स्ट्राइकथ्रू~ करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आता अनेक थर्ड पार्टी ॲप्स याहून पुढे जात आकर्षक व कलरफुल फॉन्ट (Colorful Font for WhatsApp) वापरण्याची सुविधा देत आहेत. या ॲप्सच्या मदतीने अधिक आकर्षक मेसेज पाठवणे शक्य होणार आहेत. थर्ड पार्टी ॲप असल्याने यात मोठ्या प्रमाणावर जाहिराती ओपन होतात. त्यामुळे थोड इर्रिटेटेड होत. गरज नसेल तेव्हा हे ॲप फोर्स क्लोज करणे आवश्यक आहे.

खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही कलरफुल फॉन्ट वापरू शकतात.

१. प्ले स्टोरवरून Fancy Text Generator Pro #FREE हे ॲप डाऊनलोड करा.

fancy-text-generator-pro-free-app-guid-in-marathi

२. ॲप ओपन केल्यावर इनपुट टेक्स्टमध्ये तुम्हाला हवे ते टाईप करा.

३. खाली वेगवेगळ्या २० फॉन्टसमध्ये तुम्ही टाईप केलेला मजकूर दिसेल.

४. त्यावर केवळ एक क्लिक केल्यावर तो मजकूर क्लीप बोर्डवर कॉपी होईल. यानंतर तुम्हाला हव्या त्या ठिकाणी ते पेस्ट करा.

अशा प्रकारे तुम्ही व्हाटसॲपवर कलरफुल फॉन्ट्स वापरू शकता. यानंतर तुमचे काही प्रश्न असल्यास कॉमेंट करू शकता. धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *