आम्ही तर फक्त व्हाटसअॅप वापरतो तरी आमचा इंटरनेट पॅक लवकर संपतो अशी तक्रार अनेक मित्र माझ्याजवळ करत असतात. ते फक्त व्हाटसअॅप वापरात असल्याचे वर वर दिसत असले तरीही आपण फोन इंटरनेटला कनेक्ट करतो, तेव्हा फोनमधील बरीचशी अॅल्पीकेशन्स आपल्या अपरोक्ष इंटरनेटचा वापर करत असतात. त्यांच्याकडून होत असलेल्या डाटा ट्रान्स्फरमुळे इंटरनेट पॅक लवकर संपत असतो. कोणत्या अॅप्लीकेशन्सने किती डाटा वापरला आहे हे My Data Manager सारख्या अॅपच्या माध्यमातून समजू शकते.
इंटरनेट वापरावर नियंत्रण कसे ठेवाल?
फायरवॉल अॅप्लीकेशन्सच्या मदतीने कोणत्या अॅप्लीकेशन्सना डाटा वापरण्याची परवानगी द्यायची व कोणत्या अॅप्लीकेशन्सना नाकारायची यावर आपण नियंत्रण ठेऊ शकतो. गुगल प्ले स्टोरवर यासाठी खूप अॅप्लीकेशन्स उपलब्ध आहेत. त्यातीलच एक आहे No Root Firewall. या अॅप्लीकेशन्सच्या मदतीने आपल्या अपरोक्ष, आपल्या परवानगीशिवाय होत असलेल्या अनावश्यक इंटरनेट डाटा वापरांवर नियंत्रण ठेवता येते खूपच सहज आहे.
नो रुट फायरवॉल कसे वापराल?
केवळ दोन छोट्या स्टेप नंतर तुम्ही तुमच्या इंटरनेट वापरावर कंट्रोल ठेवू शकता.
१. नो रुट फायरवॉल अॅप्लीकेशन्स गुगल प्लेवर मोफत उपलब्ध आहे. डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
२. अॅप्लीकेशन्स सुरु करून स्टार्टवर क्लिक करावे. यांनतर I trust this application येथे टीक करा.
यानंतर कोणत्याही अॅप्लीकेशने इंटरनेट वापरण्याचा पर्यंत केल्यास तुम्हाला नोटिफिकेशन बारमध्ये नो रुट फायरवॉल लगेच याबद्दल सूचना देईल. तुम्ही परवानगी दिल्याशिवाय कोणतेही अॅप्लीकेशन इंटरनेटचा वापर करू शकत नाही.
तुम्ही Access Logच्या मदतीने तुम्ही परवानगी दिलेले अॅप्लीकेशन्सही पाहू शकता.
नो रुट फायरवॉलप्रमाणे पुढील काही अॅप्स् देखील याचप्रकारे काम करतात.
१. Mobiwol
२. LostNet
आवडल्यास नक्की शेअर करा व काही प्रश्न असल्यास बिनधास्तपणे कॉमेंटमध्ये विचारा…