प्ले स्टोअरवरील पेड अॅप्स् घ्या फुकट
गूगलच्या काही सर्व्हिसेस अशा आहेत की त्याद्वारे आपण घरबसल्या पैसे कमवू शकतो.
ऑनलाईन पॆसे कसे कमवता येतील हे अनेक जण नेहमीच सर्च करतात. याचाच फायदा घेण्यासाठी अनेक फेक वेबसाईट व अॅप इंटरनेटवर उपलब्ध आहेत. परंतु गूगलच्या काही सर्व्हिसेस अशा आहेत की त्याद्वारे आपण घरबसल्या पैसे कमवू शकतो.
‘गूगल ऍडसेन्स’ प्रमाणेच गुगलने अँड्रॉइड युजरससाठी ‘गूगल ओपिनियन रिवॉर्ड’ नावाने एक अॅप लॉन्च केले आहे. सध्या हे अॅप फक्त अँड्रॉइड मोबाईलसाठी उपलब्ध आहे. तसे तर हे अॅप जुनेच आहे. परंतु भारतीय युजर्ससाठी हे नुकतेच खुले करण्यात आले आहे. परंतु ‘गूगल ऍडसेन्स’ सारखे हे पैसे बँकेत जमा होणार नसून याद्वारे ‘गूगल प्ले स्टोअर’वर तुम्हाला खरेदी करता येईल.
काय आहे ‘गूगल ओपिनियन रिवॉर्ड’?
१. ‘गूगल ओपिनियन रिवॉर्ड’ हे एक सर्वे अॅप असून याद्वारे गूगल युजर्स कडून विविध सर्वेद्वारे माहिती गोळा करणार आहे.
२. प्रत्येक सर्वे पूर्ण झाल्यावर एक विशिष्ट रक्कम युजरच्या अकाउंटमध्ये ऍड होते.
३. यापैशांद्वारे युजर प्ले स्टोअरवरील पेड अॅप्स् विकत घेऊ शकतात.
अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.