वर्डप्रेस पोस्टमध्ये व्हिडीओ कसा टाकावा?
नवीन ब्लॉग किंवा वेबसाईट सुरु केल्यावर अनेकदा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि व्हिडीओ कसा टाकायचा? एका सर्वेनुसार व्हिडीओ तुमच्या युजरला ब्लॉगवर खिळवून ठेवतात तसेच यामुळे बाउंस रेट देखील कमी होतो. जर तुमचा ब्लॉग/वेबसाईट वर्डप्रेसवर असले तर यात व्हिडीओ टाकणे अतिशय सोपे आहे. YouTube, Vimeo, Facebook, Twitter यासारख्या अनेक सर्व्हिसेसवरील व्हिडीओ वर्डप्रेसवर सहजपणे एम्बेड करता…
नवीन ब्लॉग किंवा वेबसाईट सुरु केल्यावर अनेकदा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि व्हिडीओ कसा टाकायचा? एका सर्वेनुसार व्हिडीओ तुमच्या युजरला ब्लॉगवर खिळवून ठेवतात तसेच यामुळे बाउंस रेट देखील कमी होतो. जर तुमचा ब्लॉग/वेबसाईट वर्डप्रेसवर असले तर यात व्हिडीओ टाकणे अतिशय सोपे आहे. YouTube, Vimeo, Facebook, Twitter यासारख्या अनेक सर्व्हिसेसवरील व्हिडीओ वर्डप्रेसवर सहजपणे एम्बेड करता येतात. आजच्या ब्लॉगमध्ये आपण व्हिडीओ कसा एम्बेड करावा हे जाऊन घेऊ.
वर्डप्रेसवर आता ऑटो-एम्बेड सुविधेमुळे अतिशय सोप्या पद्धतीने व्हिडीओ टाकता म्हणजेच एम्बेड करता येतात. यासाठी तुम्हाला केवळ व्हिडिओची लिंक वर्डप्रेस एडिटरमध्ये पेस्ट करायची आहे. युआरएल पेस्ट केल्यावर आपोआप व्हिडीओ एम्बेड होईल.
अधिक माहितीसाठी खालील GIF पहा.
खालील वेबसाईटवरील व्हिडीओ वर्डप्रेसवर ऑटो-एम्बेड होतात…
- Amazon
- Animoto
- Cloudup
- CollegeHumor
- Crowdsignal
- Dailymotion
- Flickr
- Hulu
- Imgur
- Issuu
- Kickstarter
- Meetup.com
- Mixcloud
- ReverbNation
- Screencast
- Scribd
- Slideshare
- SmugMug
- Someecards
- SoundCloud
- Speaker Deck
- Spotify
- TED
- Tumblr
- VideoPress
- Vimeo
- WordPress.tv
- YouTube
डायरेक्ट वर्डप्रेसवर व्हिडीओ का अपलोड करू नये?
अनेकांचे ब्लॉग हे शेयर्ड होस्टींगवर असतात. व्हिडीओ डायरेक्ट वर्डप्रेसवर अपलोड केल्याने तुमच्या सर्व्हरवर जास्त लोड येऊ शकातो. तसेच युट्युबसारख्या व्हिडीओ होस्टिंग साईटचे सर्व्हर व्हिडीओ चालवण्यासाठी बनवलेले असल्याने ते योग्यरित्या ऑप्टिमाइझ असतात. मुख्य म्हणजे युट्युबवरून व्हिडीओसाठी मिळणाऱ्या आयत्या ट्रॅफिकचा फायदा तुम्हाला मिळणार नाही.
तुम्हाला आता वर्डप्रेस पोस्टमध्ये व्हिडीओ टाकतांना कोणतीही अडचण येणार नाही अशी आशा आहे. यानंतरही काही शंका असल्यास कमेंट करा. ब्लॉग आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा.
तुषार महेश भांबरे.
धन्यवाद सर, मराठीत वर्डप्रेस बद्दल माहिती देत आहात. व्हीडिओ एनेबल्ड कसा करावा याविषयी माहिती उपयोगात आली.