ब्लॉग लिहून घरबसल्या पैसे कमवता येतात, हे तुम्ही सर्वांनी नक्कीच ऐकलं असेल, नाही का? घर बसल्या फावल्या वेळेत, आपल्या आवडीच्या विषयावर लिहून एक चांगले उत्पन्न मिळवण्याचे स्वप्न आज अनेक जण पाहत आहेत. पण या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकतांना एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो – “ब्लॉगसाठी ‘वर्डप्रेस’ निवडू की ‘ब्लॉगर’?”
हा तुमच्या ब्लॉगिंग प्रवासातील सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. कारण चुकीचा प्लॅटफॉर्म निवडल्यास, भविष्यात पैसे कमवण्याच्या संधी मर्यादित होऊ शकतात किंवा टेक्निकल अडचणी वाढू शकता.
पण काळजी करू नका! आजच्या या ब्लॉगद्वारे मी तुमचा वर्डप्रेस की ब्लॉगर हागोंधळ दूर करणार आहे. या ब्लॉगमध्ये आपण, पैसे कमवण्याच्या दृष्टीने कोणता प्लॅटफॉर्म तुम्हाला योग्य राहील, वर्डप्रेस आणि ब्लॉगर यांचे फायदे आणि तोटे समजून घेऊया.
गोष्ट दोन मित्रांची: हे समजून घेण्यासाठी, माझ्या दोन मित्रांची गोष्ट वाचा
माझा एक मित्र आहे, युवराज. त्याला कविता आणि कथा लिहिण्याची खूप आवड आहे. त्याला फक्त त्याचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे होते, वेबसाईटच्या तांत्रिक गोष्टीत त्याला अजिबात पडायचे नव्हते आणि मुख्य म्हणजे, त्याला एकही रुपया खर्च करायचा नव्हता. मी त्याला ब्लॉगर (Blogger) वापरायचा सल्ला दिला. आज तो तिथे आनंदाने ब्लॉगिंग करत आहे.
माझा दुसरा मित्रा गिरीश. त्याला स्वतःचा एक ब्लॉग हवा होता सोबतच ई-कॉमर्सच्या मदतीने शेती विषयक साहित्य देखील विकायचे होते. गिरीशला स्वतःच्या वेबसाईटवर पूर्ण नियंत्रण हवे होते. त्याच्यासाठी वर्डप्रेस (WordPress) हा सर्वोत्तम पर्याय ठरला.
तुम्हाला युवराज सारखे फक्त लिहिण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे की गिरीश सारखे एक व्यावसायिक विश्व निर्माण करायचं आहे? तुमचे उत्तरच तुम्हाला योग्य प्लॅटफॉर्म निवडायला मदत करेल.
ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडतांना खालील काही मुद्दे अभ्यासले पाहिजे :
- वापरायला सोपे : तुम्ही सर्वच फार टेक्निकल असाल असे नाही. त्यामुळे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची निवड करतांना तुम्हाला तो सहजरित्या हाताळता यायला हवा. जेणेकरून भविष्यात तुम्हाला काही अडचण यायला नको.
- खर्च : ब्लॉग सुरु करतांना काही मोफत पर्याय उपलब्ध असले तरी अनेकदा काही गोष्टींसाठी खर्च करावाच लागतो. यामुळे तुम्ही जो प्लॅटफॉर्म निवडणार आहेत त्याला भविष्यात किती खर्च येईल हे आधीच पाहिलेले योग्य राहील.
- मदत (Support) : तुम्ही निवडत असणाऱ्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मसाठी सपोर्ट उपलब्ध आहे कि नाही हे आवश्य तपासून घ्या. कारण बऱ्याचदा काही तंत्रक अडचणी उद्धभल्या आणि योग्य मदत उपलब्ध नसेल तर तुमची गैरसोय होऊ शकते.
- उत्पन्नाचे मार्ग : तुम्ही जरी हौस म्हणून ब्लॉग सुरु करत असाल तरी त्यातून २ पैसे मिळाले तर कोणाला नको असेल. त्यामुळे तुमची निवडत असणारा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म तुम्ही मॉनिटाईज करू शकाल का हे तपासून घ्या. ब्लॉगवरून पैसे कमावण्यासाठी Google AdSense सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे यावर मी याआधीच सविस्तर ब्लॉग लिहलेला आहे.
वर्डप्रेस काय आहे?

वर्डप्रेस हे मोफत असले तरी त्यावर ब्लॉग किंवा वेबसाईट तयार करण्यासाठी डोमेन आणि होस्टिंग घेणे गरजेचे असते. सुरवातीला हे थोडं टेक्निकल वाटत असलं तरी नंतर हे फार सोपं आहे. वर्डप्रेस शिकण्यासाठी इंटरनेटवर अनेक स्रोत उपलब्ध आहेत.
वर्डप्रेस हे एक मुक्त स्रोत (Open Source) CMS आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे ब्लॉग, वेबसाईट किंवा ई-कॉमर्स स्टोअर देखील तयार करू शकता. जगातील ४३.६% वेबसाईट या वर्डप्रेसवर आहेत.
सर्वात स्वस्त आणि मस्त होस्टिंग घेण्यासाठी येथे क्लिक करा
होस्टींगर होस्टिंग घेतांना माझा कुपन कोड ONLINETUSHAR वापरल्यास तुम्हाला १०% अधिक सूट मिळेल.
ब्लॉगर काय आहे?

ब्लॉगर हा गुगलचा मोफत ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. १९९९ साली Pyra Labs या कंपनीने ब्लॉगर सुरु केले होते. २००३ साली गुगलने Pyra Labs या कंपनीला अधिग्रहित केल्याने गुगलकडे ब्लॉगरचे मालकी हस्तांतरित झाली.
ब्लॉगर हा पूर्णपणे मोफत ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. यात तुम्ही सबडोमेनवर (yourname.blogspot.in) तुमचा ब्लॉग तयार करू शकता. परंतु जर स्वतःच्या डेमनवर हवा असेल तर तुम्हाला डोमेन विकत घ्यावे लागेल.
वर्डप्रेस vs ब्लॉगर: मुख्य फरक काय आहे?
चला, आता दोन्ही प्लॅटफॉर्ममधील मुख्य फरक एका सोप्या चार्टद्वारे समजून घेऊया.
मुद्दा (Feature) | वर्डप्रेस (WordPress.org) | ब्लॉगर (Blogger) |
---|---|---|
मालकी (Ownership) | तुमची स्वतःची | गुगल (Google) |
खर्च (Cost) | होस्टिंग आणि डोमेनचा खर्च येतो | पूर्णपणे मोफत |
नियंत्रण (Control) | अमर्याद (Unlimited) | मर्यादित (Limited) |
डिझाइन आणि थीम्स | हजारो मोफत आणि प्रीमियम पर्याय | काही मर्यादित थीम्स |
प्लगइन्स | ५९,०००+ प्लगइन्स उपलब्ध | कोणताच बाह्य पर्याय नाही |
SEO | उत्तम (Best) eg. Rank Math/Yoast | साधारण (Average) |
पैसे कमवणे | अनेक पर्याय (जाहिराती, एफिलिएट, ई-कॉमर्स) | फक्त गुगल ऍडसेन्स |
सुरक्षितता | तुमची जबाबदारी पण मदतीला अनेक सेक्युरिटी प्लगइन्स उपलब्ध | गुगलची भक्कम सुरक्षा |
भविष्य | नियमित नवनवीन अपडेट्स | अनिश्चित, फारसे अपडेट्स नाहीत |
कोणासाठी उत्तम? | व्यावसायिक ब्लॉगर्स, बिझनेस वेबसाईटसाठी | छंद म्हणून लिहिणारे, विद्यार्थी, नवशिक्यांसाठी |
माझा वैयक्तिक अनुभव (Personal Opinion)
मी माझ्या onlinetushar.com सह इतर सर्व ब्लॉगसाठी वर्डप्रेस वापरतो. यामागे कारण असं आहे की, मला माझ्या ब्लॉगच्या डिझाइन, SEO आणि उत्पन्नावर पूर्ण नियंत्रण हवे होते. वर्डप्रेसवर सुरुवातीला थोडा खर्च आणि शिकण्याची तयारी ठेवावी लागते, पण भविष्याचा विचार करता ही गुंतवणूक फायदेशीर ठरते.
BuiltWith च्या रिपोर्ट नुसार वर्डप्रेस हा जगात सर्वाधिक वापरले जाणारे CMS (कन्टेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम) आहे. आपण गुगल ट्रेंड्सद्वारे देखील पाहू शकतो कि वर्डप्रेस कायमच ब्लॉगरला वरचढ राहिलेलं आहे.

भविष्य (Future)
२३ ऑगस्ट १९९९ रोजी Pyra Labs या कंपनीने ब्लॉगर सेवा सुरु केली. २००३ मध्ये गुगलने Pyra Labs विकत घेतले. तेव्हापासून यात कोणतेही विशेष अपडेटस करण्यात आले नाही. याउलट वर्डप्रेस ओपन सोर्स असल्याने वेळोवेळी अपडेट व नविन फीचर्स येत असतात. याचमुळे वर्डप्रेस जगातील सर्वात पंसतीचा सीएमएस ठरला आहे. केवळ ब्लॉगीगसाठी मर्यादित असणारे वर्डप्रेस आता बिझनेस, ई-कॉर्मस यासाठी देखील वापरण्यात येत आहे.
तुमच्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म कोणता? (Actionable Conclusion)
आता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. चला शेवटचा निर्णय घेऊया:
ब्लॉगर (Blogger) निवडा, जर:
- तुम्हाला फक्त लिहिण्याची आवड आहे.
- तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाही.
- तुम्हाला एक साधा-सरळ आणि वापरण्यास सोपा ब्लॉग हवा आहे.
वर्डप्रेस (WordPress) निवडा, जर:
- तुम्हाला ब्लॉगिंगला एक व्यवसाय म्हणून बघायचे आहे.
- तुम्हाला भविष्यात पैसे कमवायचे आहेत.
- तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर आणि ब्रँडवर १००% नियंत्रण हवे आहे.
यासोबतच तुम्ही माझा टॉप ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची तुलना करणारा ब्लॉग येथे क्लिक करून वाचू शकता.
वरील माहीतीवरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतीलच. वर्डप्रेस की ब्लॉगर हे ठरवत असतांना सर्वप्रथम आपली आवश्यकता जाणून घ्या. माझा स्वतःचा ब्लॉग जरी वर्डप्रेसवर असला तरी ब्लॉगरवरही माझ्या १५ हून अधिक वेबसाईटस आहेत. त्यामुळे ब्लॉगर वापरूच नये असे नाही. यानंतर तुमचे काही प्रश्न असल्यास कॉमेंट करू शकता. हा ब्लॉग तुम्हाला उपयोगी वाटल्यास नक्की शेयर करा. धन्यवाद!
– तुषार भांबरे
well written… good read… thank you
Thank you so much 🙂
चांगली माहिती मिळाली
धन्यवाद! 🙂
What can you recommend for website with blog post?
of course WordPress. 🙂
नमस्कार,
मला माझी वेबसाईट वर्डप्रेसवर शिफ्ट करावयाची आहे, आपण मदत कराल काय? बेस्ट हॉस्टिंग सुचवावे.
होस्टींगर हि होस्टिंग तुमच्यासाठी सुरवातीला योग्य राहील. येथे क्लिक करून तुम्ही त्या विषयी अधिक माहिती घेऊ शकता. मदत हवी असल्यास व्हाटसॲप करा : 9579794143
Good
SEO friendly पोस्ट कशी लिहायची..
खूप छान ! अशीच माहिती देत चला….
धन्यवाद विशाल
Nice information.
मस्त लिहिलंय. चांगली माहिती मिळाली