वेब होस्टिंग म्हणजे काय?
आजच्या लेखात सोप्या भाषेत आपण होस्टिंग म्हणजे नेमकं काय असतं? होस्टिंग कशी काम करते? त्याचे प्रकार कोणते? याविषयी जाणून घेऊ.
डोमेन नेम / वेब होस्टिंग म्हणजे काय? अनेकांना हा प्रश्न पडत असतो. ब्लॉग अथवा वेबसाईट तयार करत असतांना सर्वात बेसिक गोष्ट म्हणजे डोमेन आणि होस्टिंगची गरज पडत असते. बऱ्याचदा होस्टिंग आणि त्याच्या प्रकाराविषयी माहिती नसल्यांने काहींची फसगत होते. आजच्या लेखात सोप्या भाषेत आपण होस्टिंग म्हणजे नेमकं काय असतं? होस्टिंग कशी काम करते? त्याचे प्रकार कोणते? याविषयी जाणून घेऊ.
आपल्या ब्लॉगच्या वाचकांसाठी होस्टगेटोरतर्फे विशेष ५०% सवलत आहे. विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.
वेब होस्टिंग म्हणजे काय?
या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. आपल्याला घर बांधायचे असेल तर नेमकी कशाची गरज पडते?
१. आपल्याला कोणतं लोकेशन योग्य आहे आपण ते ठरवतो.
२. हव्या असणाऱ्या लोकेशनवर जागा ठरवतो.
३. त्याची योग्य ती किंमत देऊन जागा विकत घेतो.
४. यानंतर त्या जागेवर घर बांधतो.
वेबसाईटच देखील असंच असतं. आपल्याला हवं असणार लोकेशन (पत्ता) म्हणजे डोमेन नेम. जागा म्हणजे होस्टिंग ज्यावर आपलं घर उभं असतं. आणि घर म्हणजेच होस्टिंग. आता आपल्याला तितकं मोठं घर हवं तितकी मोठी जागा देखील हवी. याचप्रमाणे जितकी मोठी वेबसाईट तितकी मोठी होस्टिंग त्यासाठी आवश्यक असते. आपल्या वेबसाईटवरील सर्व कोड, फोटो, लेख हे होस्टींगवर सेव्ह होत असतात.
वर्डप्रेस विषयी मराठीतून सर्व काही जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
वेब होस्टिंगचे प्रकार कोणते?
होस्टिंगचे प्रामुख्याने ३ प्रकार पडतात.
१. शेअर्ड होस्टिंग
२. व्हीपीएस होस्टिंग
३. डेडीकेटेड होस्टिंग
वेब होस्टिंगचे प्रकार समजून घेण्यासाठी अजून एक सोपं उदाहरण पाहता येईल.
१. शेअर्ड होस्टिंग म्हणजे एक कुटुंब समजा. अशा वेळी तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी सर्व जण मिळून घेतात. यामुळे येणारा खर्च विभागला गेल्यामुळे प्रत्येकाच्या वाटेला कमी येतो. याच्या नावातच शेअर्ड आहे. चांगली शेअर्ड होस्टिंग घेण्यासाठी येथे क्लिक करा.
२. व्हीपीएस होस्टिंग म्हणजे एक अपार्टमेंट समजून घेता येईल. यात जागा अधिक मिळते परंतु यासाठी थोडी जास्त किंमत मोजावी लागते. विश्वसार्ह व्हपीएस सर्व्हर घेण्यासाठी येथे क्लिक करा.
३. डेडीकेटेड होस्टिंग म्हणजे एक कॉलनी. यात खूप जास्त स्पेस असला तरी सर्व सुरळीत चालावं यासाठी जास्त मेहनत लागते. यामुळे यासाठी येणारा खर्च देखील अधिक असतो. मॅनेज्ड डेडीकेड सर्व्हर घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लिनक्स किंवा विंडोज होस्टिंग म्हणजे काय?
लिनक्स आणि विंडोज हे ऑपरेटिंग स्टिस्टीमचे प्रकार आहेत. दोघांच काम जवळपास सारखंच असतं. किमतीचा विचार केला असता लिनक्स होस्टिंग विंडोज होस्टिंगपेक्षा स्वस्त असते. पूर्वी लिनक्स होस्टिंग मॅनेज करणं थोडं किचकट टेक्निकल होत. परंतु आता ओपन सोर्स टूल्सच्या मदतीने जास्तीत जास्त काम वन क्लिक शक्य झालं आहे.
मला वाटत आता तुम्हाला होस्टिंग म्हणजे नेमकं काय हे कळालं असेलच. यानंतर हि होस्टिंग विषयी काही शंका असल्यास खाली कमेंट करा. ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद!
तुषार भांबरे
मी गेल्या 8 वर्षापासून वर्डप्रैस आणि blogger मध्ये वर्क करतोय. वर्डप्रेस मधे काही वेबसाईट devlop केल्या. आपल्या मराठी माहितीमुळे अभ्यासात भर पडली. धन्यवाद
धन्यवाद…!
Dhanyawad apan maràthimadye sapurn mahiti dilyabaddal ,tumhi dilelya mahitimule nakkich anakhi khup kahi navin Marathi bhashetun shikayala miltil .
Krupaya ek video ha Google AdWords baddal Marathi madhe sanga ki.
धन्यवाद राजेंद्रजी… व्हिडीओबद्दल नक्कीच लवकरच काही तरी करतो.
सर मला वेब होस्टिंग म्हणजे काय माहित नव्हते. तुम्ही तुमच्या लेखात हे सविस्तर माहिती दिलात त्यामुळे मला वेब होस्टिंग बद्दल माहिती कळली. धन्यवाद