Sunday, March 7, 2021
Online Tushar
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल
No Result
View All Result
Online Tushar
No Result
View All Result

टॉप ५ वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स कोणते?

Tushar Bhambare by Tushar Bhambare
22 May 2019
in वर्डप्रेस
Reading Time: 5min read
A A
5
top-5-wordpress-security-plugins-in-marathi
81
SHARES
387
VIEWS
व्हाटसॲपवर शेअर कराफेसबुकवर शेअर कराट्विटरवर शेअर करा
ADVERTISEMENT

वेबसाईट / ब्लॉग सुरु करायचं म्हंटल कि अनेक जण भीती व्यक्त करतात की वेबसाईट तर करून टाकू पण जर वेबसाईट हॅक झाली तर काय? कोणी आमच्या वेबसाईटवर काही अपलोड केलं तर? आणि असं अनेकदा होतंही. वेबसाईट हॅक झाल्यामुळे पैसा, वेळ आणि त्यापेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे डेटाच नुकसान होत. वेबसाईट सुरु करणे सोपं असलं तरी त्याची सुरक्षितता देखील त्याहून जास्त महत्त्वाची आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण टॉप ५ वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स विषयी जाणून घेऊ.

अनुक्रमणिका

  • वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स का वापरावेत?
  • १. All In One WP Security & Firewall
  • २. Wordfence Security
  • ३. iThemes Security
  • ४. Sucuri Security
  • ५. Jetpack

वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स का वापरावेत?

एका सर्व्हेनुसार एका आठवड्यात १८.५ दशलक्ष वेबसाईट्सवर मालवेअर हल्ले होतात. सरासरी एका वेबसाईटवर दिवसभरात ४४ वेळा व्हायरसचा हल्ला होतो. वेबसाईट हॅक झाल्यास ती रिकव्हर करण्यासाठी शक्यतो प्रोफेशनल सर्व्हिस घ्यावीच लागते. जर तुम्ही प्रोफेशनल नसाल तर ते तुम्हाला शक्य होणार नाही. यासाठी वेबसाईट हॅक होण्याआधीच काळजी घेणे कधीही उत्तम.

आता आपण वर्डप्रेस वेबसाईटच्या सेक्युरिटीसाठी वेबसाईटवर असायलाच हवे अशा प्लगिन्सविषयी जाणून घेऊ. परंतु एक लक्षात ठेवा एका वेळी खालीलपैकी कोणतेही एकच प्लगिन ऍक्टिव्ह करा.

ADVERTISEMENT

१. All In One WP Security & Firewall

All In One WP Security & Firewall हे एक मोफत व प्रसिद्ध सेक्युरिटी वर्डप्रेस प्लगिन आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे प्लगिन वापरायला अतिशय सोपे आहे यासाठी तुम्हाला तांत्रिक माहिती असण्याची आवश्यकता नाही.

या प्लगिनच्या मदतीने तुम्ही लॉगिन पेजचे नाव, URL यात सहजपणे बदल करू शकता. Brute Force Attack, Login Captcha, Database Security, Database Backup, Firewall यासारख्या अनेक आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे प्लगिन पूर्णपणे मोफत आहे.

येथे क्लिक करून तुम्ही All In One WP Security & Firewall प्लगिन मोफत इन्स्टॉल करू शकता.

२. Wordfence Security

Wordfence Security हे एक विश्वासार्ह्य आणि सर्वसमावेशक वर्डप्रेस सुरक्षा प्लगिन आहे. याच्या मोफत पर्यायांमध्ये देखील अनेक महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध आहेत. यातील ऑटोस्कॅन सारख्या सुविधा फार उपयोगी आहेत.

यात Brute Force Attack, लॉगिन पेज सुरक्षा, 2-factor Authentication यासारख्या अनेक सुविधा आहेत. एखाद्या IP वरून खूप वेळा चुकीचा पासवर्ड अथवा युजरनेम टाकण्याचा प्रयत्न झाल्यास Wordfence Security आपोआप तो IP ब्लॉक करते. यातील firewall हि आपल्यास सर्व्हरवरून काम करत असल्याने ती फार उपयोगी ठरत नाही.

Wordfence Security चे मोफत व्हर्जन तुम्ही येथे क्लिक करून इन्स्टॉल करू शकता. विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.

३. iThemes Security

iThemes Security हे आधी Better WP Security या नावाने ओळखले जात होते. मोफत व विकत अशा दोघे पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या प्लगिनचा इंटरफेस अतिशय सुटसुटीत व सोपा आहे.

iThemes मध्ये फायरवॉल उपलब्ध नाहीये. याच्या विकत असणाऱ्या पर्यायामध्ये अनेक चांगले ऑप्शन्स आहेत. यात तुम्हाला वर्डप्रेसच्या कोर फाईल्स आणि त्यातील बदल देखील पाहता येतील. ठराविक कालावधीने युजर पासवर्ड बदलण्याची सोय देखील यात आहे.

तुम्ही येथे क्लिक करून iThemes Security चे मोफत व्हर्जन डाउनलोड करू शकता. प्लगिन विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.

४. Sucuri Security

Sucuri Security हे मोफत आणि विकत अशा दोन्ही पर्यायात उपलब्ध असले तरी याचे विकत असणारे व्हर्जनच कामाचे आहे. Sucuri ची सपोर्ट टीम अतिशय जलद आहे.

याच्या मोफत व्हर्जनमध्ये वेबसाईट मालवेअर स्कॅनिंग, सर्च इंजिन ब्लॉकिंग यासारखे फार उपयोगी फीचर्स आहेत. जर तुम्ही विकत व्हर्जन घेऊ शकत असाल तर Sucuri Security हि नक्कीच एक चांगली सर्व्हिस आहे.

Sucuri Security प्लगिन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. विकत घेण्याआधी त्यांचे प्लॅन्स जाणून घेण्याकरिता येथे करा.

५. Jetpack

वर्डप्रेस वापरणाऱ्या प्रत्येकाने जेटपॅक हे नाव ऐकलेच असेल. Automattic या कंपनीने जेटपॅक प्लगिन बनवले आहे. हे प्लगिन पूर्णपणे सुरक्षा प्लगिन नसले तरी यातील काही फीचर्स सुरक्षततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत.

एखाद्या संशयित IP वरून लॉगिन करण्याचा प्रयन्त होत असल्यास जेटपॅक आपोआप तो IP ब्लॉक करतो. तसेच वेबसाईट बंद झाल्यास त्याची ई-मेलद्वारे सूचना देण्यात येते. वेबसाईट लोडींग स्पीड, इमेज CDN यासारखे अनेक उपयोगी फीचर्स मोफत पर्यायासोबत उपलब्ध आहेत.

जेटपॅकचे फ्री व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच त्यांचे पेड प्लॅन्स जाणून घ्यायचे असल्यास येथे क्लिक करा.

यात तुमच्या आवडीचे काही प्लगिन जोडायचे असल्यास कमेंट करा. ब्लॉग कसा वाटलं हे नक्की सांगा तसेच आवडल्यास मित्रांसोबत शेअर करा.

तुषार भांबरे.
Tags: iThemes SecurityJetpackSucuri SecurityWordfence SecurityWordPressWordPress PluginsWordPress Security PluginsWordPress Tutorials in Marathiवर्डप्रेसवर्डप्रेस प्लगिन्स
SendShare67Tweet6
ADVERTISEMENT
Previous Post

क्रेडिट कार्डचं पेमेंट करा आणि कॅशबॅक मिळवा

Next Post

ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा?

Tushar Bhambare

Tushar Bhambare

६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.

Related Posts

digital-ocean-wordpress-marathi
वर्डप्रेस

DigitalOcean VPS वापरून ५ मिनिटात तयार करा वर्डप्रेस वेबसाईट

22 June 2020
880
hostinger-wordpress-hosting-review-marathi
वर्डप्रेस

स्वस्त आणि मस्त वर्डप्रेस होस्टिंग : होस्टिंगर

21 June 2020
364
how-to-install-wordpress-on-Namecheap-EasyWP-hosting
वर्डप्रेस

Namecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे?

15 September 2019
343
Next Post
blogger-to-wordpress-migration-in-marathi

ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा?

Comments 5

  1. Yuvraj Kore says:
    2 years ago

    Mast website banvili Rav
    Pan Kay Marathi madhe articles read karayla organic traffic yeto?

    Majh pan vichaar AAHE ek new Marathi language madhe website banvaychi.

    Tumcha margdarshan havay. Karan mi pahilayndanch eka Marathi website baghitla.

    Reply
    • तुषार महेश भांबरे says:
      2 years ago

      हो येतो… मराठी ऑनलाईन वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्या मराठी वेबसाईटसाठी शुभेच्छा…! काहीही मदत हवी असल्यास मेसेज करा. धन्यवाद!

      Reply
  2. Pravin Ghuge says:
    2 years ago

    नमस्कार सर मला वर्डप्रेस बद्दल टाकलेली माहिती फार आवडली आहे, सर मला स्वतःला एक वेबसाईट तयार करायची आहे पण ती सुरक्षित राहणे गरजेचे आहे,तसेच त्या वेबसाईटवर मला स्वतःला इमेज अपलोड करणे व व्हिडीओ अपलोड करणे ऑनलाईन टेस्ट टाकणे बदल करणे, वेबसाईट ची डिजाईन तयार करणे ई-मेल जोडणं वेबसाईटवर वेगवेगळे page तयार करणे सर php व वर्डप्रेस कसे शिकायचे याबद्दल आपल्याकडे मराठी भाषा मध्ये pdf स्वरूपात माहिती असेल तर पाठव सर आपणास विनंती आहे

    Reply
    • Tushar Bhambare says:
      2 years ago

      प्रवीणजी धन्यवाद! सध्या तरी मी अशी PDF तयार केली नाहीये. पण विचार सुरु आहे. तयार केल्यावर नक्की पाठवेल.

      Reply
  3. Pingback: वर्डप्रेस की ब्लॉगर? यापैकी तुमच्यासाठी योग्य काय? । तुषार भांबरे

Leave a Reply to Yuvraj Kore Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माझ्याविषयी

Online Tushar

तुषार महेश भांबरे

पत्रकार, ब्लॉगर

नमस्कार,
मी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.




How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi How to start WordPress blog in Marathi

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

  • how-to-rank-1-on-google-marathi-guindance

    आपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची?

    186 shares
    Share 133 Tweet 22
  • नंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा?

    206 shares
    Share 156 Tweet 21
  • वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा?

    124 shares
    Share 78 Tweet 19
  • प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स

    207 shares
    Share 167 Tweet 17
  • गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे?

    181 shares
    Share 141 Tweet 17

© 2019. Made with ❤️ using WordPress

No Result
View All Result
  • होम
  • वर्डप्रेस
  • ब्लॉगिंग
  • एसईओ (SEO)
  • कसे करावे?
  • सोशल मीडिया
  • उपयोगी ॲप्स
  • माझ्या बद्दल

© 2019. Made with ❤️ using WordPress