Namecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे?
वर्डप्रेस ब्लॉग सुरु करण्यासाठी सर्वप्रथम डोमेन आणि होस्टिंगची आवश्यकता असते. वर्डप्रेस ब्लॉग तयार करतांना होस्टिंगची निवड सर्वाधिक महत्त्वाची ठरते. याआधीच्या ब्लॉगमध्ये आपण cPanel द्वारे वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे हे जाणून घेतले होते. परंतु अनेक वर्डप्रेस होस्टिंग कंपन्या cPanel न देता त्याचा स्वतःचा डॅशबोर्ड देतात. यामुळे नवीन युजर्स गोंधळतात. यासाठीच काही प्रसिद्ध होस्टिंग कंपन्यांच्या होस्टींगवर वर्डप्रेस…
वर्डप्रेस ब्लॉग सुरु करण्यासाठी सर्वप्रथम डोमेन आणि होस्टिंगची आवश्यकता असते. वर्डप्रेस ब्लॉग तयार करतांना होस्टिंगची निवड सर्वाधिक महत्त्वाची ठरते. याआधीच्या ब्लॉगमध्ये आपण cPanel द्वारे वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे हे जाणून घेतले होते. परंतु अनेक वर्डप्रेस होस्टिंग कंपन्या cPanel न देता त्याचा स्वतःचा डॅशबोर्ड देतात. यामुळे नवीन युजर्स गोंधळतात. यासाठीच काही प्रसिद्ध होस्टिंग कंपन्यांच्या होस्टींगवर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे हे यावर एक विशेष लेखमाला सुरु करत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण Namecheap ने खास वर्डप्रेस वेबसाईटसाठी सुरु केलेल्या EasyWP या होस्टींगवर वर्डप्रेस कसे सेटअप करावे हे जाणून घेऊ.
Namecheap विषयी
Namecheap हि ICANN मान्यताप्राप्त डोमेन आणि होस्टिंग विक्री करणारी कंपनी आहे. २००० साली केवळ डोमेन विक्री करण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या Namecheap ने २००७ पासून होस्टिंग सेवा देखील सुरु केली. सध्या कंपनी १ कोटींपेक्षा जास्त डोमेन मॅनेज करत असल्याचा दावा करते. नेट न्यूट्रिलिटी या चळवळीला Namecheap चा खुला पाठिंबा असून यासाठी नुकतेच त्यांनी २ कोटींपेक्षा जास्त रक्कम दान केली होती.
Namecheap ची EasyWP होस्टिंग म्हणजे काय?
होस्टिंग म्हणजे काय? या आपल्या ब्लॉगमध्ये आपण होस्टिंगचे विविध प्रकार जाणून घेतले आहेत. आता वर्डप्रेस वेबसाईटसाठी आता होस्टिंग कंपन्या विशेष होस्टिंग प्लॅन्स सुरु करत आहेत. या होस्टिंग केवळ वर्डप्रेसलाच डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेल्या असल्यामुळे या फार ऑप्टिमाइझ असतात. यावर तुमचा वर्डप्रेस ब्लॉग अधिक जलद व सुरक्षित राहू शकतो. असेच Namecheap ने देखील खास वर्डप्रेस वापरकर्त्यांसाठी EasyWP हि नवीन होस्टिंग सेवा सुरु केली आहे.
Namecheap EasyWP वर वर्डप्रेस कसे सेटअप करावे?
Namecheap च्या EasyWP वर वर्डप्रेस सेटअप करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
१. सर्वप्रथम येथे क्लिक करून Namecheap EasyWP ची वेबसाईट उघडा.
२. यानंतर EasyWP Starter, EasyWP Turbo आणि EasyWP Turbo पैकी तुम्हाला हवा तो प्लॅन निवडा.
३. Get बटनावर क्लिक केल्यावर पुढील स्क्रिनवर तुम्हाला अकाउंट तयार करण्यासाठी फॉर्म दिसेल. यात आवश्यक ती सर्व माहिती भरून तुमचे अकाउंट तयार करा. अगोदरच अकाउंट असेल तर तुम्ही साइन इन करू शकता.
४. अकाउंट तयार झाल्यावर पुढील स्टेपमध्ये तुम्हाला पेमेंटची पद्धत नोंदवावी लागेल. तुम्ही क्रेडिट कार्ड, PayPal किंवा बिटकॉइनच्या माध्यमातून पैसे भरू शकता.
५. पैसे भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्लॉगसाठी डोमेन निवडावे लागेल. जर तुमच्याकडे डोमेन लगेच उपलब्ध नसेल तर तुम्ही मोफत मिळणाऱ्या सबडोमेनवर देखील वर्डप्रेस सेटअप करू शकता. मी आता या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी मोफत मिळणाऱ्या सबडोमेनवरच वर्डप्रेस इन्स्टॉल करणार आहे. तुम्हाला हवे असणारे सबडोमेन टाकून Continue बटनावर क्लिक करा.
६. पुढील स्क्रिनवर तुम्हाला तुम्ही निवडलेले डोमेन दिसेल. एकदा ते तपासून घ्या. योग्य असेल तर Create WordPress Website यावर क्लिक करून वर्डप्रेस इन्स्टॉल करा. Show Advance Options यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या ब्लॉगचे नाव, तुम्हाला हवे असणारे काही प्लगिन्स, मूळ थीम आधी सेटिंग करून शकता. पण त्या नंतरही शक्य असल्याने त्यात वेळ न घालवता Create WordPress Website यावर क्लिक करून वर्डप्रेस इन्स्टॉल करा.
७. बस झाले, लगेच २-३ मिनिटात तुमचे वर्डप्रेस इंस्टाल होईल.
८. आता तुमच्यासमोर Namecheap चे एक डॅशबोर्ड उघेल. यात तुम्ही डोमेन नेम बदलवू शकता, SSL इन्स्टॉल करू शकता यासोबतच बॅकअप वगैरे देखील घेऊ शकता.
९. Namecheap डॅशबोर्डमधील WP Admin वर क्लिक करून तुम्ही तुमच्या वर्डप्रेसच्या डॅशबोर्डला लॉगिन करू शकता.
हा ब्लॉग वाचून आता तुम्ही सहजरित्या Namecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस इंस्टॉल करू शकता. यानंतरही काही शंका असल्यास कमेंट करा. ब्लॉग आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद!
तुषार भांबरे.
खूप चांगल्या प्रकारे सांगितले आहे.