अखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु
बहुप्रतीक्षित गुगल ऍडसेन्स आता मराठीसाठी (Google Adsense for Marathi Websites) देखील सुरु झाले आहे. मराठी डिजीटल प्रकाशक (Marathi Publishers) गेल्या अनेक वर्षांपासून गुगल ऍडसेन्स मराठी वेबसाईटसाठी सुरू होण्याची वाट पाहत होते. सध्या गुगल, फेसबुक यासारख्या कंपन्यांनी स्थानिक भारतीय भाषांवर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात पुण्यात सर्च कॉन्फरन्स झाली होती. त्यावेळीच लवकरच मराठी…
बहुप्रतीक्षित गुगल ऍडसेन्स आता मराठीसाठी (Google Adsense for Marathi Websites) देखील सुरु झाले आहे. मराठी डिजीटल प्रकाशक (Marathi Publishers) गेल्या अनेक वर्षांपासून गुगल ऍडसेन्स मराठी वेबसाईटसाठी सुरू होण्याची वाट पाहत होते.
सध्या गुगल, फेसबुक यासारख्या कंपन्यांनी स्थानिक भारतीय भाषांवर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात पुण्यात सर्च कॉन्फरन्स झाली होती. त्यावेळीच लवकरच मराठी संकेतस्थळांची गुगल ऍडसेन्सची सुविधा देईल अशी चर्चा सुरु होती. भारतात याआधी हिंदी, बंगाली, तामिळ आणि तेलगू या स्थानिक भाषांसाठी गुगल ऍडसेन्स सुरु होते. आता यात मराठीची भर पडली आहे.
गुगल ऍडसेन्स म्हणजे काय?
२००३ साठी गुगलने ऍडसेन्स हि सुविधा सुरु केली होती. आपण जेव्हा एखाद्या वेबसाईटला भेट देतो तेव्हा त्यात आपल्याला काही जाहिराती दिसतात. या जाहिराती आपण पाहिल्यावर अथवा यावर क्लिक केल्यावर त्याचे पैसे त्या वेबसाईटच्या मालकाला मिळतात. अनेक ब्लॉगर यातूनच महिन्याला लाखों रुपये कमवतात. याविषयी तुम्ही येथे क्लिक करून वाचू शकता.
गुगल ऍडसेन्स कसे सुरु करावे? याविषयी जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा. गुगल ऍडसेन्स मराठीसाठी सुरु झाल्याने मराठी डिजीटल प्रकाशक, ब्लॉगर्स, न्यूजपोर्टल्स यांना एक हक्काच इन्कम सोर्स सुरू झालंय हे नक्की.
तंत्रज्ञानातील असेच अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करू शकता.
Sir माझं ब्लॉगर वरील adsense दोनदा reject झालं, आणि सेटिंग मध्ये मराठी भाषा निवडल्यास earning ची tab व adsense च gadget गायब होत आहे . कृपया सहकार्य करा.
नमस्कार विनायकजी,
तुमच्या ब्लॉगची लिंक द्या.
सर,शक्य असेल तर वर्डप्रेस मधे मराठी त कसे लिहावे,काय ओप्शन आहेत,मदत करा.