तुषार महेश भांबरे

नमस्कार,

मी तुषार महेश भांबरे. २०१३ पासून पत्रकारितेत काम करीत असलो तरी वर्डप्रेस, डिजिटल मीडिया, तंत्रज्ञान याविषयी विशेष आकर्षण आहे. पत्रकारितेत काम करण्याबरोबर मी स्वतःची ‘टेक ड्रीफ्ट सोल्युशन्स‘ हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग एजन्सी पण सुरु केली आहे.

सायन्स नंतर बी.कॉम. नंतर पत्रकारिता असं भटकत असतांना करियर विषयी काहीच एक फिक्स होत नव्हतं. परंतु दैनिक साईमतमध्ये शेखर पाटील सरांसोबत काम करत असतांना वर्डप्रेससोबत ओळख झाली. माझा बिजनेस पार्टनर सौरभ पुराणिकमुळे वर्डप्रेस अजून चांगल्या पद्धतीने समजून घेता आलं. ‘दैनिक जनशक्ति’ येथे डिजिटल हेड म्हणून ४ वर्ष काम केल्यानंतर मी आता पूर्ण वेळ ब्लॉगर म्हणून काम करीत आहे.. वर्डप्रेसने मला खूप काही दिलंय. त्यामुळे आता वेळ होती कि मी वर्डप्रेसला काही द्यावं, वर्डप्रेस सर्वांपर्यंत पोहचावं.

जगातील ३०% वेबसाईट्स या वर्डप्रेसवर आहेत, वर्डप्रेस हे फेसबुक, ट्विटरपेक्षाही जुने आहे. तरी पण वर्डप्रेसविषयी मराठीतून अजूनही खूप काही उपलब्ध नाही. माझे इंग्लिशचे प्रचंड वांधे होते आणि आजही आहेत. त्यामुळे सुरवातीला वर्डप्रेस शिकतांना थोडी अडचण आली. माझ्यासारखे अनेकांचे इंग्लिशचे वांधे असतील. त्याचमुळे वर्डप्रेस विषयी माहिती देणारा मराठी ब्लॉग सुरु करण्याचे मनात आले.

लवकरच शक्य झाल्यास या ब्लॉगचे युट्युब चॅनेल सुरु करण्यात येईल. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!

You can’t connect the dots looking forward; you can only connect them looking backwards. So you have to trust that the dots will somehow connect in your future. You have to trust in something — your gut, destiny, life, karma, whatever. This approach has never let me down, and it has made all the difference in my life.
steve_jobs
Steve Jobs