टॉप ५ वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स कोणते?

वेबसाईट / ब्लॉग सुरु करायचं म्हंटल कि अनेक जण भीती व्यक्त करतात की वेबसाईट तर करून टाकू पण जर वेबसाईट हॅक झाली तर काय? कोणी आमच्या वेबसाईटवर काही अपलोड केलं तर? आणि असं अनेकदा होतंही. वेबसाईट हॅक झाल्यामुळे पैसा, वेळ आणि त्यापेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे डेटाच नुकसान होत. वेबसाईट सुरु करणे सोपं असलं तरी त्याची सुरक्षितता देखील त्याहून जास्त महत्त्वाची आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण टॉप ५ वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स विषयी जाणून घेऊ.

वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स का वापरावेत?

एका सर्व्हेनुसार एका आठवड्यात १८.५ दशलक्ष वेबसाईट्सवर मालवेअर हल्ले होतात. सरासरी एका वेबसाईटवर दिवसभरात ४४ वेळा व्हायरसचा हल्ला होतो. वेबसाईट हॅक झाल्यास ती रिकव्हर करण्यासाठी शक्यतो प्रोफेशनल सर्व्हिस घ्यावीच लागते. जर तुम्ही प्रोफेशनल नसाल तर ते तुम्हाला शक्य होणार नाही. यासाठी वेबसाईट हॅक होण्याआधीच काळजी घेणे कधीही उत्तम.

आता आपण वर्डप्रेस वेबसाईटच्या सेक्युरिटीसाठी वेबसाईटवर असायलाच हवे अशा प्लगिन्सविषयी जाणून घेऊ. परंतु एक लक्षात ठेवा एका वेळी खालीलपैकी कोणतेही एकच प्लगिन ऍक्टिव्ह करा.

१. All In One WP Security & Firewall

All In One WP Security & Firewall हे एक मोफत व प्रसिद्ध सेक्युरिटी वर्डप्रेस प्लगिन आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे प्लगिन वापरायला अतिशय सोपे आहे यासाठी तुम्हाला तांत्रिक माहिती असण्याची आवश्यकता नाही.

या प्लगिनच्या मदतीने तुम्ही लॉगिन पेजचे नाव, URL यात सहजपणे बदल करू शकता. Brute Force Attack, Login Captcha, Database Security, Database Backup, Firewall यासारख्या अनेक आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे प्लगिन पूर्णपणे मोफत आहे.

येथे क्लिक करून तुम्ही All In One WP Security & Firewall प्लगिन मोफत इन्स्टॉल करू शकता.

२. Wordfence Security

Wordfence Security हे एक विश्वासार्ह्य आणि सर्वसमावेशक वर्डप्रेस सुरक्षा प्लगिन आहे. याच्या मोफत पर्यायांमध्ये देखील अनेक महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध आहेत. यातील ऑटोस्कॅन सारख्या सुविधा फार उपयोगी आहेत.

यात Brute Force Attack, लॉगिन पेज सुरक्षा, 2-factor Authentication यासारख्या अनेक सुविधा आहेत. एखाद्या IP वरून खूप वेळा चुकीचा पासवर्ड अथवा युजरनेम टाकण्याचा प्रयत्न झाल्यास Wordfence Security आपोआप तो IP ब्लॉक करते. यातील firewall हि आपल्यास सर्व्हरवरून काम करत असल्याने ती फार उपयोगी ठरत नाही.

Wordfence Security चे मोफत व्हर्जन तुम्ही येथे क्लिक करून इन्स्टॉल करू शकता. विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.

३. iThemes Security

iThemes Security हे आधी Better WP Security या नावाने ओळखले जात होते. मोफत व विकत अशा दोघे पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या प्लगिनचा इंटरफेस अतिशय सुटसुटीत व सोपा आहे.

iThemes मध्ये फायरवॉल उपलब्ध नाहीये. याच्या विकत असणाऱ्या पर्यायामध्ये अनेक चांगले ऑप्शन्स आहेत. यात तुम्हाला वर्डप्रेसच्या कोर फाईल्स आणि त्यातील बदल देखील पाहता येतील. ठराविक कालावधीने युजर पासवर्ड बदलण्याची सोय देखील यात आहे.

तुम्ही येथे क्लिक करून iThemes Security चे मोफत व्हर्जन डाउनलोड करू शकता. प्लगिन विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.

४. Sucuri Security

Sucuri Security हे मोफत आणि विकत अशा दोन्ही पर्यायात उपलब्ध असले तरी याचे विकत असणारे व्हर्जनच कामाचे आहे. Sucuri ची सपोर्ट टीम अतिशय जलद आहे.

याच्या मोफत व्हर्जनमध्ये वेबसाईट मालवेअर स्कॅनिंग, सर्च इंजिन ब्लॉकिंग यासारखे फार उपयोगी फीचर्स आहेत. जर तुम्ही विकत व्हर्जन घेऊ शकत असाल तर Sucuri Security हि नक्कीच एक चांगली सर्व्हिस आहे.

Sucuri Security प्लगिन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. विकत घेण्याआधी त्यांचे प्लॅन्स जाणून घेण्याकरिता येथे करा.

५. Jetpack

वर्डप्रेस वापरणाऱ्या प्रत्येकाने जेटपॅक हे नाव ऐकलेच असेल. Automattic या कंपनीने जेटपॅक प्लगिन बनवले आहे. हे प्लगिन पूर्णपणे सुरक्षा प्लगिन नसले तरी यातील काही फीचर्स सुरक्षततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत.

एखाद्या संशयित IP वरून लॉगिन करण्याचा प्रयन्त होत असल्यास जेटपॅक आपोआप तो IP ब्लॉक करतो. तसेच वेबसाईट बंद झाल्यास त्याची ई-मेलद्वारे सूचना देण्यात येते. वेबसाईट लोडींग स्पीड, इमेज CDN यासारखे अनेक उपयोगी फीचर्स मोफत पर्यायासोबत उपलब्ध आहेत.

जेटपॅकचे फ्री व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच त्यांचे पेड प्लॅन्स जाणून घ्यायचे असल्यास येथे क्लिक करा.

यात तुमच्या आवडीचे काही प्लगिन जोडायचे असल्यास कमेंट करा. ब्लॉग कसा वाटलं हे नक्की सांगा तसेच आवडल्यास मित्रांसोबत शेअर करा.

तुषार भांबरे.
आवडल्यास नक्की शेअर करा:

६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.

4 thoughts on “टॉप ५ वर्डप्रेस सेक्युरिटी प्लगिन्स कोणते?”

  1. Mast website banvili Rav
    Pan Kay Marathi madhe articles read karayla organic traffic yeto?

    Majh pan vichaar AAHE ek new Marathi language madhe website banvaychi.

    Tumcha margdarshan havay. Karan mi pahilayndanch eka Marathi website baghitla.

    Reply
    • हो येतो… मराठी ऑनलाईन वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्या मराठी वेबसाईटसाठी शुभेच्छा…! काहीही मदत हवी असल्यास मेसेज करा. धन्यवाद!

      Reply
  2. नमस्कार सर मला वर्डप्रेस बद्दल टाकलेली माहिती फार आवडली आहे, सर मला स्वतःला एक वेबसाईट तयार करायची आहे पण ती सुरक्षित राहणे गरजेचे आहे,तसेच त्या वेबसाईटवर मला स्वतःला इमेज अपलोड करणे व व्हिडीओ अपलोड करणे ऑनलाईन टेस्ट टाकणे बदल करणे, वेबसाईट ची डिजाईन तयार करणे ई-मेल जोडणं वेबसाईटवर वेगवेगळे page तयार करणे सर php व वर्डप्रेस कसे शिकायचे याबद्दल आपल्याकडे मराठी भाषा मध्ये pdf स्वरूपात माहिती असेल तर पाठव सर आपणास विनंती आहे

    Reply
    • प्रवीणजी धन्यवाद! सध्या तरी मी अशी PDF तयार केली नाहीये. पण विचार सुरु आहे. तयार केल्यावर नक्की पाठवेल.

      Reply

Leave a Comment