सध्याच्या युगात लोकांना व्यक्त होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात सोशल मीडिया खालोखाल ब्लॉगिंग हे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम आहे. आता लॉकडाउनच्या काळात काही जण ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी तर काही छंद जोपासण्यासाठी ब्लॉगिंग कडे वळताय. ब्लॉगिंग सुरु करण्यासाठी वर्डप्रेस, ब्लॉगर यासारखे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. या आधीच्या लेखात आपण वर्डप्रेस की ब्लॉगर? याविषयी सविस्तर माहिती घेतली आहेच. ब्लॉगरपेक्षा मला स्वत:ला वर्डप्रेस जास्त उजवे वाटत असल्याने मी जास्तीत जास्त त्यावरच लिहणार आहे. या लेखात wordpress.org च्या मदतीने ब्लॉग कसा तयार करावा याविषयी माहिती घेणार आहोत.
आधी सांगितल्याप्रमाणे वर्डप्रेसवर ब्लॉग तयार करण्यासाठी आपल्याला होस्टिंग व डोमेन खरेदी करावे लागते. सर्वसाधारणपणे डोमेन + होस्टिंग मिळून वर्षाला ३,५०० रुपयांपासून खर्च येतो. इतका खर्च करण्याची इच्छा नसेल तर blogger.com देखील चांगला पर्याय आहे.
मार्केटमध्ये १ रुपये दिवसापासून १००० रुपये प्रती दिवस किंमत असणाऱ्या अनेक होस्टिंग आहेत. परंतु आजवरच्या माझ्या अनुभवावरून होस्टिंगसाठी BlueHost हा एक चांगला व स्वस्त पर्याय आहे. वर्डप्रेस अधिकृतरित्या होस्टिंगसाठी ब्ल्यूहोस्टची शिफारस करत.
होस्टिंग घेत असतांना त्याच्या किंमतीबरोबरच डिस्क स्पेस, ब्रांडविड्थ, लोकेशन, सीडीएन आदी गोष्टी देखील तपासून घेणे करण गरजेच आहे. अनेकदा होस्टिंग कंपनीच्या सेल्स टीमशी संपर्क साधल्यास तुम्हाला किमतीत सूट मिळू शकते.
डोमेन व होस्टिंग विकत घेण ई-कॉमर्स साईट्सवरून शॉपिंग करण्याइतकच सोप आहे. खाली काही स्क्रीनशॉटसद्वारे होस्टिंग कशी विकत घ्यावी हे तुम्हाला लक्षात येईल.
जर तुम्हाला इतके कष्ट घ्यायचे नसतील तर नाममात्र शुल्क घेऊन मी हे सर्व सेटअप तुम्हाला करून देऊ शकतो. अधिक माहितीसाठी तुम्ही येथे क्लिक करून मला फेसबुकवर संपर्क साधू शकता.
जवळपास सर्वच होस्टिंग कंपन्यांची होस्टिंग विकत घेण्याची पद्धत सारखीच आहे. मी खाली ब्लूहोस्टची प्रोसेस दाखवणार आहे.
वर्डप्रेससाठी डोमेन-होस्टिंग कशी विकत घयायची?
१. BlueHost ची वेबसाईट उघडा.

२. होस्टिंग टॅबवर क्लिक करून लिनक्स होस्टिंग निवडा. यात तुम्हाला हवा असणारा प्लॅन तपासा.

३. Buy Now बटनावर क्लिक करा. यानंतर तुमच्याकडे डोमेन आहे कि नाही असं विचारल्यावर तुम्ही आधीच डोमेन घेतलेले असल्यास Yes हा पर्याय निवडा. BlueHost अनेकदा पाहिल्यावर्षासाठी डोमेन फ्री देते.

४. पुढील स्क्रिनवर तुमचे डोमेन नेम टाका. सर्वसाधारण ई-कॉमर्स साईटसारखी पेमेंट प्रोसेस केल्यावर तुमच्या डॅशबोर्डमध्ये होस्टिंग व डोमेन ॲड होईल.

होस्टिंग घेतल्यावर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करायचे?
७. यानंतर तुमचे अकाउंट लॉगिन केल्यावर My Order मध्ये जाऊन तुमच्या डोमेन नेमवर क्लिक करा. यानंतर होस्टिंगचा डॅशबोर्ड ओपन करण्यासाठी Manage Web Hosting यावर क्लिक करा.

८. आता तुमच्यासमोर तुमच्या होस्टिंगचे cPanel उघडेल. यात Softaculous Apps Installer वर क्लिक करा. cPanel मध्ये वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे याविषयी मी सविस्तर लिहलेला ब्लॉग तुम्ही येथे क्लिक करून वाचू शकता.

९. Softaculous Apps Installer मध्ये गेल्यावर WordPress Install वर क्लिक करा. त्यात तुमचे डोमेन नेम, ई-मेल आयडी, युजरनेम, पासवर्ड इत्यादी माहिती टाकून वर्डप्रेस इन्स्टॉल करा.

बस झालं. तुमचा वर्डप्रेस ब्लॉग रेडी.
माझ्या मते तुम्ही आता स्वतःचा वर्डप्रेस ब्लॉग कोणाचीही मदत न घेता बनवू शकता. तरी देखील यानंतर काही अडचण असल्यास कधीही निसंकोच मेसेज करा. धन्यवाद!
तुषार भांबरे
सर मी ब्लॉगिंग साठी bluehost वरून होस्टिंग विकत घेऊ का आणि bluehost.in का bluehost.Com वरून?
हेल्प मी सर
My blog : https://technoshridas.blogspot.com
रुपयात पेमेंट करण्यासाठी bluehost.in वरून होस्टिंग घ्यावी लागेल.
Sir marathi blog la oraganic traffic कसे आणायचे
सोशल मीडिया, कोरा यासारखे अनेक पर्याय आहेत.
सर,ब्लाॅग साठी काॅपीराइट फ्री इमेजेस कशा तयार करायच्या…
मी wordpress वर अकाउंट उघडला आहे. त्यात सिलेक्ट केलेली theme change करता येत नाहीये. प्लीज मदत करा.