वर्डप्रेस वेबसाईटवर पुश नोटिफिकेशन कसे सुरु करावे?
एका सर्वे नुसार ७०% वाचक तुमच्या वेबसाईटवर पुन्हा येत नाही. यासाठी वाचकांपर्यंत वेबसाईटवरील नवनवीन अपडेट पोचवणे आवश्यक आहे. पुश नोटिफिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगवरील नवीन पोस्टबाबत तुमच्या वाचकांना कळवू शकता. सर्वेनुसार एसएमएस, ई-मेल व सोशल मीडियापेक्षा पुश नोटिफिकेशन अधिक परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. पुश नोटिफिकेशनचा वापर करतांना त्याने वाचक इरिटेड होणार नाही याची काळजी…
एका सर्वे नुसार ७०% वाचक तुमच्या वेबसाईटवर पुन्हा येत नाही. यासाठी वाचकांपर्यंत वेबसाईटवरील नवनवीन अपडेट पोचवणे आवश्यक आहे. पुश नोटिफिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगवरील नवीन पोस्टबाबत तुमच्या वाचकांना कळवू शकता. सर्वेनुसार एसएमएस, ई-मेल व सोशल मीडियापेक्षा पुश नोटिफिकेशन अधिक परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. पुश नोटिफिकेशनचा वापर करतांना त्याने वाचक इरिटेड होणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल.
वर्डप्रेसवर पुश नोटिफिकेशन सुरु करणे अतिशय सोपे आहे. यासाठी सध्या अनेक सुविधा उपलब्ध असल्या तरी त्यातल्या त्यात वनसिग्नल हे जास्त प्रचलित आहे. आज आपण वर्डप्रेसवर वनसिग्नल कसे इन्स्टॉल करावे हे पाहणार आहोत.
१. वनसिग्नल अकाउंट तयार करणे
वनसिग्नलच्या वेबसाईटवरील Web Push Notifications या पर्यायासमोरील Get Started वर क्लिक करा. फॉर्ममधील माहिती भरून अकाउंट तयार करा.
२. वनसिग्नल ॲप तयार करणे
वनसिग्नलवर अकाउंट तयार केल्यावर Add App वर क्लिक करून तुमच्या ॲपला नाव देऊन ॲप तयार करा.
यानंतर ॲपसाठीचा प्लॅटफॉर्म निवडावा लागेल. यासाठी Web Push सिलेक्ट करा.
पुढील स्टेपमध्ये WordPress Plugin or Website Builder वर क्लिक करून वर्डप्रेस निवडा.
यानंतर पुढच्या स्टेपमध्ये वेबसाईटचे नाव आणि वेबसाईट URL टाका. जर तुमचा ब्लॉग सेक्युअर (https://) नसेल तर My site is not fully HTTPS या पर्याय निवडा.
अशा प्रकारे आपले वनसिग्नल ॲप तयार झाले आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या ॲपची आयडी आणि एपीआय की मिळेल.
आता तुमच्या वर्डप्रेस वेबसाईटवर याला जोडण्यासाठी तुम्हाला वनसिग्नलचे प्लगिन इन्स्टॉल करावे लागेल. वर्डप्रेसवर प्लगिन कसे इन्स्टॉल करावे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
वनसिग्नल प्लगिन इन्स्टॉल केल्यानंतर वर्डप्रेस डॅशबोर्डमध्ये OneSignal Push हा नवीन पर्याय दिसेल. त्यात तुमचा वनसिग्नल ॲप आयडी आणि एपीआय की टाका.
सफारी ब्राऊजरसाठी तुम्हाला सफारी वेब आयडी टाकावा लागेल. तो तुम्हाला ॲप सेटिंग मधून मिळेल. वर्डप्रेस डॅशबोर्ड मधून तुम्ही वनसिग्नल नोटिफिकेशनची भाषा व इतर काही सेटिंग्स बदलवू शकता.
अशा प्रकारे तुम्हाला वर्डप्रेस वेबसाईटवर पुश नोटिफिकेशन सुरु करता येईल. यानंतर तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंटद्वारे विचारू शकता. धन्यवाद!
तुषार भांबरे.
साध्या सोप्या शब्दात गुंतागुंतीच्या टेक्निकसची मांडणी लाभदायी ठरेल नक्कीच असच लिहित रहा छान माहीती देताय
धन्यवाद प्रतीक्षा…!
Hi! कॉन्टॅक्ट फॉर्म ७ हे प्लगइन उत्तमरीत्या कसे सेटअप करावे याविषयी मार्गदर्शन करावे.
नमस्कार संकेत,
लवकरच त्यावर सविस्तर ब्लॉग लिहतो.
सर्व माहिती छान आहे .
उत्तमजी, धन्यवाद!