cPanel मध्ये वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे?
ब्लॉग सुरु करण्यासाठी वर्डप्रेस हा सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. याआधीच्या ब्लॉग्समध्ये मी ब्लॉगर आणि वर्डप्रेसमध्ये फरक काय? तसेच वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा? याविषयी लिहले आहे. होस्टिंग म्हणजे नेमकं काय असत हे देखील मी आधीच्या ब्लॉगमध्ये समजावून सांगितलं आहे. आता आजच्या ब्लॉगमध्ये डोमेन – होस्टिंग घेतल्यानंतर cPanel च्या मदतीने वर्डप्रेस कसं इन्स्टॉल करावं…
ब्लॉग सुरु करण्यासाठी वर्डप्रेस हा सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. याआधीच्या ब्लॉग्समध्ये मी ब्लॉगर आणि वर्डप्रेसमध्ये फरक काय? तसेच वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा? याविषयी लिहले आहे. होस्टिंग म्हणजे नेमकं काय असत हे देखील मी आधीच्या ब्लॉगमध्ये समजावून सांगितलं आहे. आता आजच्या ब्लॉगमध्ये डोमेन – होस्टिंग घेतल्यानंतर cPanel च्या मदतीने वर्डप्रेस कसं इन्स्टॉल करावं हे आपण जाणून घेऊ.
cPanel म्हणजे नेमकं काय?
थोडक्यात cPanel म्हणजे तुमची होस्टिंग मॅनेज करण्यासाठीचे एक पॅनल आहे. ज्यांना काहीच टेक्निकल माहिती नाही अशांना देखील या पॅनेलच्या मदतीने होस्टिंग मॅनेज करणे शक्य होते. यातून तुम्ही डोमेन DNS, SSL सर्टिफिकेट, डेटाबेस, मेल अकाउंट इत्यादी मॅनेज करू शकता.
वन-क्लिक वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे?
१. सर्वप्रथम तुमच्या होस्टिंग पॅनल मधून cPanel उघडा. शक्यतो तुमच्या डोमेनच्या शेवटी :2083 किंवा /cpanel टाकून उघडता येते. उदा. https://www.yourdomain.com:2083
२. जर तुम्हाला ज्या डोमेनवर वर्डप्रेस इन्स्टॉल करायचे आहे, ते तुमचे प्रायमरी डोमेन असेल तर तुम्हाला पॅनलमध्ये डोमेन जोडण्याची आवश्यकता नाही. परंतु जर प्रायमरी डोमेन व्यतिरिक्त अजून डोमेन जोडायचे असल्यास आधी तुम्हाला ते Domain -> Addon Domain मध्ये जाऊन जोडावे लागेल. या डोमेनचे नेम सर्व्हर किंवा A रेकॉर्ड या होस्टिंगचेच असल्याची खात्री देखील करून घ्या.
३. आता वर्डप्रेस इन्स्टॉल करण्यासाठी तुमच्या cPanel मध्ये Software नावाचा एक पर्याय असेल. यात QuickInstall अथवा Softaculous Apps Installer असे पर्याय असतील. आता तुम्ही वापरात असलेल्या होस्टिंग कंपनीनुसार हे पर्याय थोडे बदलू शकता. खाली Hostgator आणि BlueHost च्या होस्टिंग मधील स्क्रिनशॉट तुम्ही पाहू शकता.
यात तुम्हाला Install WordPress हा पर्याय सापडेल. यात तुमचे डोमेन निवडून वर्डप्रेस इन्स्टॉल करा. यात तुम्हाला वर्डप्रेस कुठे इन्स्टॉल करायचा याचा पाथ विचारला जाईल. तिथे काहीच न टाकता वर्डप्रेस इन्स्टॉल करायचे आहे. अधिक माहितीसाठी स्क्रिनशॉट तपासा. यानंतर तुम्हाला तुमच्या वर्डप्रेसच्या लॉगिन डिटेल्स मिळतील.
अशा प्रकारे तुम्ही फक्त ५ मिनटात cPanel द्वारे वर्डप्रेस इन्स्टॉल करू शकता. यानंतरही तुमच्या काही शंका असल्यास कमेंट करा. वर्डप्रेसविषयी नवनवीन शिकण्यासाठी ब्लॉगला नियमित भेट देत रहा. ब्लॉग आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा.
तुषार भांबरे
सर C panel मध्ये आपण वर्डप्रेस इन्स्टॉल केल्यानंतर भविष्यात जेव्हा आपल्याला आपली वेबसाईट अपडेट करायची असेल, उदा. एखादे नवीन पेज वेबसाईटवर प्रदर्शित करायचे असेल तर काय करायचे
वर्डप्रेस डॅशबोर्डमधून तुम्ही ते अगदी सहजरित्या ते करू शकता.