प्रत्येक व्यवसाने आणि वेबसाइटच्या मालकाने Google वर नंबर १ रँक येण्याचं स्वप्न पाहिलं आहे पण ते नेमकं होईल कसं? तुम्ही वेबसाईट सुरु केली आपल्या वेबसाईटवर जास्त ट्राफिक येईल कसा? जास्तीत जास्त ट्राफिक आणण्यासाठी जास्तीत जास्त पोस्ट टाकाव्या लागतील कि जास्तीत जास्त शेयर करावं लागेल? तुम्हाला सांगतो, वेबसाईटवर अधिकतम ट्राफिक हा गुगल सर्च वरून येतो आणि गुगलवरून जास्तीत जास्त ट्राफिक आणण्यासाठी तुमच्या वेबसाईटचा SEO (Search Engine Optimization) चांगला असला पाहिजे.
नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम दातारकर आहे आणि आज या ब्लॉग-पोस्ट मध्ये मी तुम्हाला आपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची? हे सांगणार आहे. अर्थातच मी हे तुम्हाला हे सांगू शकतो कारण या क्षेत्रात मला अनुभव आहे.

गुगलवर उच्च रँकिंग एकदम आणि अचानकरित्या क्वचितच घडते. सर्वात कुशल आणि ज्ञानी मार्केटर्स देखील टॉप-रेटिंग स्पॉट मिळविण्यास संघर्ष करत राहतात. तर, एखाद्या व्यावसायिकाने किंवा नवशिक्या ब्लॉगरने ही कामगिरी कशी साध्य करावी? खाली दिलेल्या गोष्टी केल्याने वेबसाईट नंबर १ येईलच याची पूर्णपणे हमी देत नाही पण ही पोस्ट तुम्हाला आपला सध्याचा कॉन्टेंटची/वेबसाईटची रँक सुधारण्यात नक्कीच मदत करेल.
महत्त्वाचे: फ्री ब्लॉग सुरु करण्यासाठी सर्वोत्तम १० वेबसाईट कोणत्या, हे तुम्हाला माहिती आहे का?
१. निश निवडा (Select Niche)

एसइओमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचा निश निवडत येणे खूपच महत्त्वाचे आहे. लहान व्यवसाय मालक म्हणून, तुम्ही काही मोठ्या संस्थांशी आणि कंपन्यांशी स्पर्धा करणे काही नंबर १ होण्याचा योग्य मार्ग नाहीच. यासाठी अमर्यादित मार्केटिंग बजेट लागतो. तुम्हाला नेहमीच संधी मिळण्याची शक्यता असते परंतु या प्रक्रियेत तुम्ही तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाया घालवू शकता.
म्हणून “एका लहान तलावात मोठी मासे” कोणती आहेत ते शोधा आणि त्यांवर लक्ष द्या, ना कि “मोठ्या समुद्रातील लहान मासे” शोधून काढण्यात; आपण उदाहरणासहित समजावून घेऊ –
मराठी बातम्या लिहिणाऱ्या खूप वेबसाईट आहेत पण थोडक्यात मराठी बातम्या लिहिणाऱ्या खूपच कमी; थोर व्यक्तींबद्दल इंग्रजीत लिहिणाऱ्या खूप वेबसाईट आहेत पण मराठी किंवा हिंदी मध्ये लिहिणाऱ्या खूपच कमी. जर तुम्ही असं काहीतरी निवडलं तर तुम्हाला तुमची वेबसाईट Google वर नंबर १ रँक करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही.
२. कीवर्ड निवडा

जर तुम्ही योग्य कीवर्ड निवडले तर Google वर शीर्षस्थानी येण्यास तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. उदाहरणार्थ, जर मी “ब्लॉग कसा सुरु करावा” या आर्टिकलसाठी एक पेज ऑप्टिमाइझ केले असेल तर ब्लॉग, ब्लॉगिंग यांसारख्या कीवर्डसाठी मी कदाचित काही दिवसात टॉप स्टॉप मिळवू शकेन पण जर तुम्ही त्याच जागी होस्टिंग, ऑनलाइन सर्विसेस यांसारखे कीवर्ड वापरले तर मग मला शीर्षस्थानी यायला वेळ लागेलच.
माझा मुद्दा हा आहे: नेहमी महत्त्वाचे आणि सगळ्यांनी वापरलेलेच कीवर्ड निवडून आपला ब्लॉग किंवा वेबसाईट गुगलवर दिसली पाहिजे असं गृहीत धरून चालणे योग्य नाही. कधी कधी तुम्हाला आपल्या एखाद्या विषयाशी निगडीत कीवर्ड वापरून वेबसाईट शीर्षस्थानी आणावी लागते; फक्त विषय वापरून नाही.
गृहीत धरून चालू कि तुमचा एक ब्लॉग आहे ज्यावर तुम्ही ब्लॉगिंग आणि डिजिटल मार्केटिंग बद्दल लिहिता; आपण त्याला “कलमवाला.इन” म्हणू. तर, कलमवाला.इन तुम्ही या वेबसाईटवर एक लेख लिहिला कि “मराठी वेबसाईटसाठी एसईओ कसा करायचा” “How to Do SEO for Marathi Website”. अर्थातच तुम्ही फक्त एकटे नाही कि ज्यांनी हे आर्टिकल लिहिलं असेल. अशा वेळी जर तुमचे प्रतिस्पर्धी “How to Do SEO” “SEO for Marathi Website” यांसारख्या कीवर्ड साठी रँक करत असेल तर मग अशा वेळी तुम्ही “SEO Tips” “SEO Guide for Marathi Portals” यांसारख्या कीवर्डसाठी रँक करायला सुरुवात करायला पाहिजे.
Google च्या कीवर्ड प्लॅनर किंवा KeywordTool.io सारख्या साधनांचा वापर करून योग्य ते कीवर्ड तुम्ही शोधू शकता. या विषयी काही मदत पाहिजे असेल तर लेखाच्या खाली माझा संपर्क आहेच.
३. आपल्या कीवर्डसाठी कन्टेंट ऑप्टिमाइझ करा

तुम्ही तुमचा विषय निवडला, तुम्ही तुमचे कीवर्ड निवडले आणि आता वेबसाईट रँक करायला सुरुवात देखील सुरुवात केली. प्रत्येक पेजवर तुम्ही तुमचे कीवर्ड ऑप्टिमाइझ करत आहात पण तरीही ते रँक करायला पुरेसे नाही. तुम्हाला आता आपल्या प्रत्येक पेजवरील प्रत्येक कॉन्टेंट ऑप्टिमाइझ करावा लागेल. आग त्यात Links, Tags, Categories, Images, and Alt Tags सगळंच आलं.
- URL: उदाहरणार्थ, www.kalamawala.in/?p=123 ऐवजी https://www.kalamwala.in/how-to-start-blog-in-marathi/ असं वापरा.
- शीर्षक टॅग: शक्य होईल तेवढं एच 1, एच2 च शीर्षकासाठी वापरा.
- फोटोसाठी Alt टॅग जोडा.
महत्त्वाचे: प्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स तुम्ही सुद्धा वापरताय ना?
४. आपल्या साइटवर इतर कन्टेंट जोडा

कंटेंट मार्केटिंग इन्स्टिट्यूटच्या मते, ८८% B2B कंपन्या त्यांच्या मार्केटिंग प्रक्रियेचा भाग म्हणून आता कंटेंट मार्केटिंग करतात. संभाव्य ग्राहकांना आणि इच्छुक वाचकांना आकर्षित करण्यासाठी यात विविध प्रकारचे कंटेंट मार्केटिंग केल्या जाते. यात ब्लॉग पोस्ट, वृत्तपत्रे, वेबिनार, इन्फोग्राफिक्स, व्हिडिओ इत्यादींचा समावेश आहे. तुम्हालाही जर Google वर शीर्ष रँकिंग वर यायचं असेल तर तुमच्या वेबसाईटवर साइटवर नियमितपणे नवीन सामग्री जोडणे आवश्यक आहे. फक्त जोडायची म्हणून जोडू नका तर उपयुक्त आणि उच्च-गुणवत्तेची सामग्री जोडा जी खरोखर तुमच्या ग्राहकांना महत्व देईल, त्यांना महत्त्वाची वाटेल.
५. आपल्या साइटवर लिंक मिळवा

Backlinks, Backlinks, Backlinks… एसईओच्या दृष्टीने बॅकलिंक्स खूपच महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. खरं तर, MOZच्या २०१५ मधील सर्च इंजिन रँकिंग फॅक्टर्सच्या अहवालानुसार, इनबाउंड लिंक्स उच्च रँकिंग प्राप्त करण्यासाठी एक सर्वात महत्वाचा घटक आहे. तुमच्या साइटवरील लिंक मिळविण्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या करू शकता. ते मी तुम्हाला या सिरीजच्या पुढल्या लेखात सांगेन. सुरुवातीला तुम्ही तुमची साइट स्थानिक व्यवसाय निर्देशिकांमध्ये (In Local Business Directories) जोडा आणि Yelp, TripAdvisor आणि Google Business यासारख्या पुनरावलोकने साइटवर जोडा. असं केल्याने तुम्हाला चांगल्या लिनक्स मिळतील.
तर या आहेत काही गोष्टी ज्या तुम्ही वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायच्या वेळी लक्षात घेतल्या पाहिजे. आजच सुरु केलं आणि उद्या नंबर १ वर यायला लागलो असं होत नाही; त्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो, मेहनत करावी लागते आणि संयम देखील बाळगावा लागतो.
ब्लॉग आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू, आणखी एसइओ टिप्स सोबत, धन्यवाद.
शुभम दातारकर
संपर्क – [email protected]
+91-8788051227
wonderful.. well written n explained
Thank you, Sagar.
Its really appreciable…….. You explained whole content in very easy way…. Nice..☺☺☺☺
Thank you so much, Prem
Good Shubham.
Nicely explained.
मी एक नवीन मराठी ब्लॉगर आहे.
आपण खुप छान माहिती. आपल्या मातृभाषेतून मराठीतुन हा विषय जास्त चांगला लक्षात येतो.
असेच मार्गदर्शन करत राहा.
कृपया या विषयावर अजुन सखोल लेख लिहा,उदा. मेटा टॅग,साईट मॅप , बॅकलिंक इ.इ.
माझ्या ब्लॉग वर मी नक्की याचा वापर करीन .
-धन्यवाद .
https://maitrinmanatali.com
धन्यवाद अश्विनी! हो, बऱ्याच विषयांवर लिहायचं आहे.
सुंदर माहिती !
धन्यवाद